स्वामी लीला
माधवराव दादासाहेब विंचूरकर हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. ते अक्कलकोट संस्थानांत रिजंट होते… स्वामींना सुद्धा दादासाहेबांची भक्ती प्रिय होती.. स्वामीमहाराज कधी कधी विंचूरकर यांचे बिऱ्हाडी जात असत… त्यावेळेला दादासाहेब स्वामींना स्नान घालून,गंध पुष्पादी षोडशोपचारपूजा करून नैवेद्य अर्पण करत आणि त्या नंतर स्वतः प्रसाद घेत… दादासाहेब कधी कधी रात्री सर्व मंडळी जमवुन मृदंग, टाळ वगैरे घेऊन भजन करीत असत… आणि स्वामींच्या मनात आल्यास , स्वामी सुद्धा भजनास येत असत… दादासाहेबांचा नित्यक्रम सुरु होता.. ह्यातच पुढें दादासाहेबांचे मांडीवर अचानक एक श्वेतकुष्ठाचा डाग दिसु लागला.. सफेत डाग बघितल्या नंतर दादासाहेबांना काळजी पडली कीं, हा रोग जास्ती फैलावतो कीं काय ? आणि ते काळजी करू लागले.. त्यानंतर असेच एके दिवशीं दादासाहेब महाराजांचे दर्शनासाठी दरबारात आले… त्या दिवशी स्वामी महाराजांची स्वारी आनंदात होती.. स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले.. आज स्वामी खूपच आनंदात आहेत हे पाहून दादासाहेबांनी आपल्या मांडीवरील आलेला सफेत डाग बरा होण्याबद्दल प्रार्थना केली… त्या वेळेला स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले.. “ अरे.. त्यांचे नांव काय ? ” दादासाहेबांनी उत्तर दिले, “ स्वामी ह्याला लोक श्वेतकुष्ठ म्हणतात…!!”. त्यानंतर महाराजांनी त्यांच्या हाताकडे बघत विचारले, ” तुझ्या हातातील बोटात काय आहे ? “. दादासाहेबांनी उत्तर दिलें, अंगठी”. त्या नंतर स्वामींनी पुन्हा विचारले.. “ त्या अंगठीत हा खडा कसला आहे ? ” हें विचारतांच दादासाहेब पुन्हा उत्तरले “ पांढरा आहे…” त्या नंतर स्वामी जरा हसले आणि बोलले.. ” तो फेकून दे..!! “. स्वामींनी हातातील अंगठी फेकून देण्याची आज्ञा केल्या नंतर दादासाहेबांनी मनांत विचार केला कीं तीनशे रुपये किंमतीची अंगठी फेकून देण्यापेक्षा स्वामींना अर्पण करू.. मग ते त्या अंगठीचे काहीही करोत.. पर्वा नाही…!! आणि असा विचार करून त्यांनीं अंगठी काढून महाराजांचे हातांत घातली.. आणि स्वामींनी ती अंगठी चोळाप्पास दिली… पुढे ती अंगठी विकून मंदिराचे काम चालवले.. स्वामी भक्त हो !! हे होत असतांना काही दिवसांतच चमत्कार झाला.. दादासाहेबांच्या मांडीवरील सफेत रंगाचा डाग अगदी नाहीसा झाला.. स्वामींची हि लीला बघून दादासाहेबांचा भाव अजून दृढ झाला.. ते अनन्य भक्तीच्या भावनेत नाचुच लागले म्हणा..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
खरतर स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य आहेत.. आपल्या सारख्या मूढ लोकांना त्याचा अर्थ लावणे म्हणजे एखाद्या मुंगीने हिमालयाला उचलण्याचे धाडसच होय..!! अहो बघा ना !! दादासाहेब विंचूरकर ह्यांच्या अंगावरील सफेत डाग नाहीसा व्हावा म्हणून स्वामींनी त्यांच्या हातातील अंगठी फेकून देण्यास सांगितले.. आणि दादासाहेबांनी स्वामी आज्ञेचे पालन करताच आश्चर्याने त्यांना स्वामी वाणीचा अनुभव आला..आपले स्वामी गुरुतत्व आहेत.. त्यांनी ह्या लीला केल्या त्यात लाखो पिढ्यांसाठी खूप खोल मार्गदर्शन दडलेले आहे.. ह्यातच आज आपणासाठी आजच्या पिढीसाठी स्वामी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू..!!
आजच्या लीलेत स्वामी दादासाहेबास एक वाक्यात बोलू शकले असते कि, “ हातातील अंगठी फेकून दे..” पण स्वामींनी लीला करत दादासाहेबांस असंख्य प्रश्न विचारले.. खरतर ह्यातून आज आपणास आजच्या पिढीसाठी मनन चिंतन शक्तीचा उपयोग करून आपल्या जीवनात हि समस्या का आली ? ह्याचे मूळ शोधण्याचा हुकुम देत आहेत.. स्वामी भक्त हो !! आज विज्ञान सुद्धा मान्य करत आहेत कि, जसे आपल्या अंतर्मनात दडलेले भाव विचार असतील.. त्या गोष्टी आपल्या जीवनात आकर्षित होतात.. म्हणून जर आपल्या जीवनात जर काही समस्या असेल तर त्याचे मूळ हे आपल्या नकारात्मक मनाद्वारे झालेल्या प्रार्थनेतूनच आहे हि समज ठेवून शोधून काढायचे आहे.. बघा !! जेव्हा आपण त्याच्या मुळा पर्यंत जातो तेव्हा आपल्यातील अनेक सवयी.. चुकीच्या मान्यता.. आदी गोष्टी प्रकाशात येतात.. जसे आपल्याला आरोग्याची समस्या असेल तर चुकीचा आहाराची सवयी प्रकाशात येईल.. आपल्याला पैशाची समस्या असेल तर आपल्या मनात पैशा बद्दल नकारात्मक विचार.. वा कामाचा आळस.. आदी गोष्टी प्रकाशात येईल.. आपणास नाते संबंधाची समस्या असले तर संबंधित व्यक्ती बद्दलची चुकीची धारणा.. त्यांच्या बद्दल असलेले नकारात्मक विचार आदी गोष्टी प्रकाशात येईल..!! स्वामी भक्त हो !! सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी प्रकाशात येतात तेव्हा वरील लीलेत जसे दादासाहेब ह्यांनी क्षणाचा विचार न करता अंगठीचा त्याग केला.. अगदी तसेच अनन्य भक्तीची भावना धारण करून.. “तो फेकून दे..!! ” हा स्वामींचा हुकुम म्हणून त्या सवयी वा मान्यता.. धारणांचा त्याग करायचा आहे.. हीच साधना करायची आहे.. आणि जसे दादासाहेबांचा आजार चमत्कारिक रित्या बरा झाला तसे आश्चर्याने बघायचे आहे कि आपली समस्या कशी विलीन होते..
चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे निराकारा !! तु मला हे शरीर दिले.. ह्यात हे अत्यंत शक्तिशाली मन दिले.. हे आई !! ह्या मनात तुझी अनन्य भक्तीची शक्ती दे.. तुझ्या बद्दलचा अतूट अभेद्य विश्वासाची शक्ती दे.. जेणेकरून ह्या शक्तीने माझे मन शुद्ध होईल.. ह्यातील चुकीचे संस्कार- सवयी विलीन होईल.. आणि तुझ्या आनंदी जीवनाची अभिव्यक्ती होईल.. हे श्री स्वामी समर्था !! तु माझा गुरु आहेस.. असाच माझ्या पाठीशी उभा रहा.. आणि मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे..!!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






