आपले स्वामी बोलतात “ अरे.. तु शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार , शास्त्र्यांनी कामादी षडरीपुंस जिंकले आहे काय ? ”

May 9, 2021

स्वामी लीला
आपले स्वामी परमचैतन्य गुरुतत्व आहे.. हे गुरुतत्व चराचरात व्यापलेले आहे.. अनंत कोटी ब्रम्हांडात ह्याच गुरुतत्वाची सत्ता आहे.. ह्याच्याच इच्छेने सर्व सुरु आहे.. असो.अक्कलकोट मध्ये स्वामींनी हा आगळा वेगळा अवतार घेतला होता.. स्वामींच्या प्रत्येक लीले मध्ये खूप गूढ अर्थ दडलेला असत.. स्वामी कधी कधी जमदग्नी सारखे तप्त होत.. तेव्हा चांगल्या चांगल्या लोकांची स्वामींच्या समोर येण्याची हिंमत होत नसे.. तर कधी कधी अगदी लहान बाळा प्रमाणे लीला करत.. असेच एके दिवशी शृंगेरी मठातील शास्त्री स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आले.. त्यावेळेला स्वामींच्या ह्या बाळचेष्टा बघुन त्यांना हसूच आले म्हणा.. तेव्हा ते श्री बावडेकर पुराणिक ह्यांना बोलले “ अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहता ? यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल, असे मला नाही वाटत.. ह्या पेक्षा तुम्ही आमच्याकडे या.. आम्ही तुम्हाला शास्त्र शिकवु ..!! ”. शृंगेरी मठातील शास्त्री ह्यांचे असे बोलणे ऐकताच श्री बावडेकर पुराणिक हे तयार झाले..स्वामी भक्त हो !! स्वामींना अंत:साक्षित्वाने हा प्रकार लगेच समजला.. स्वामींच्या शाळेत श्री बावडेकर पुराणिक ह्यांना घडविण्याचे काम सुरु होते.. स्वामींनी एक लीला केली.. त्या रात्री श्री बावडेकर बुवा झोपलेले असतांना स्वामी एकाएकी त्याच्या खोली जवळ आले.. दरवाजाची आतील कडी लावलेली होती.. स्वामींनी दरवाजास हात लावताच कडी आपोआप आतून पडली आणि त्या आवाजाने श्री बावडेकर बुवांना जाग आली.. आणि बघतात तर काय स्वामी महाराज प्रत्यक्ष उभे आहेत.. त्यांनी लगबगीने स्वामींच्या चरणांचे दर्शन घेतले.. तेव्हा स्वामींनी त्यांच्या कडे अतिशय करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले ” अरे.. तु शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस..? असे पहा कि ह्या, शास्त्र्यांनी कामादी षडरीपुंस जिंकले आहे काय ? ”. असे बोलून स्वामी एकाएकी गुप्त झाले.. स्वामींची हि वाणी ऐकताच श्री बावडेकर बुवांस खूप पश्चताप झाला.. दुसरे दिवशी त्यांनी दरबारात येवून स्वामींची माफी मागितली.. शृंगेरी मठातील शास्त्रीसोबत जाण्याचा बेत रद्द केला.. ते स्वामींच्या सोबत राहिले..
बोला !! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
आजच्या स्वामी वाणीतून स्वामी जो बोध देत आहेत.. खरोखर आजच्या पिढीसाठी खूपच अत्यावश्यक आहे.. श्री बावडेकर बुवा हे स्वामींना अतिशय प्रिय होते.. कारण त्यांचा सत्यप्राप्तीची तळमळ.. त्यांचा भाव अतिशय शुद्ध होता.. परंतु त्यांच्या मनात स्वामींबद्दल अज्ञान होते.. स्वामींना ते शरीर समजत होते.. म्हणुन स्वामींच्या बालचेष्टा बघुन त्यांच्या मनात संशय आला आणि ते शास्त्र शिकण्यासाठी जाण्यास निघाले.. खरतर स्वामींनी त्यांना जावू पण दिले असते.. कारण स्वामी हे गुरुतत्व आहेत.. तेच विविध शरीरातून कार्य करत आहेत.. पण ज्या शास्त्री सोबत निघाले.. तेच मुळात अज्ञानी होते… भलेही वेद.. शास्त्र.. उपनिषद त्यांचे तोंड पाठ असतील पण त्यांचे अनुकरण नव्हते.. आचरण नव्हते.. शास्त्रां मध्ये जे सांगितले त्याचा अनुभव नव्हता.. त्यांचा स्वतःच्या मनावर संयम नव्हता.. ते अजूनही षडरीपुंच्या आहारी गेलेले होते.. त्यांना अजूनही चराचरात ईश्वर बघण्याची दृष्टी नव्हती.. अहो..!! स्वामी महाराज हे प्रत्यक्ष परब्रम्ह आहेत हे त्यांना ओळखता आले नाही.. ह्याला अज्ञान नाही तर काय म्हणावे ? असो.थोडक्यात आजच्या स्वामी वाणी तून आज आपणास आजच्या पिढीसाठी स्वामींनी आपल्याला हेच संकेत दिले आहेत कि, आज गल्लो गल्लीत गुरु भेटतील.. पण त्या शरीरधारी श्री गुरूंना ह्या ब्रम्हांडातील स्वामींचा खेळ समजला आहे का.. ? त्या गुरूंना खरोखर ज्ञान आहे का.. ? इथे ज्ञानाचा अर्थ शास्त्र.. उपनिषद.. ग्रंथ किती पाठांतरीत आहेत असा नाही.. इथे ज्ञान म्हणजे त्या निर्गुण निराकारचा आत्मानुभव आहे का..? त्यांच्या मनात खरोखर दिव्य-स्थिर-अचल-अभेद्य विश्वास जागृत आहे का ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.. ते श्री गुरु जर स्वत: मुक्त नसतील तर ते बाकी त्यांच्या शिष्यांना काय मुक्त करतील.. असो. आणि जर आपणास खरोखर असे श्री गुरु भेटले तर निशंक होऊन त्यांना शरण जा.. आपल्याला त्यांच्या बाह्य आचरणावर जावून शंका कुशंका नाही घ्यायच्या.. त्यांच्या द्वारे आपले स्वामी गुरुतत्व च कार्य करत आहेत.. हा दृढ विश्वास ठेवा.. मग ते कोणत्याही पंथ.. जाती.. वा धर्माचे असू दे… स्वामी भक्त हो !! आपणास खरोखर असे शरीरधारी श्री गुरु भेटण्याची प्यास असेल तर ह्याची पहिली पायरी स्वामींना प्रार्थना करणे.. प्रार्थना हि खूप मोठी शक्ती आहे.. आपल्या तळमळीच्या प्रार्थनेने नक्कीच आपल्या जीवनात ते श्री गुरु आकर्षित होतील.. आणि आपल्याला आपल्या अंतरंगात असलेल्या स्वामी गुरुतत्वाचे दर्शन करवून देतील आणि आपल्याला आत्मनिर्भर बनवतील.. आपल्याला अनन्य भक्तीचा उपहार देतील.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्री स्वामी समर्था !! तु गुरुतत्व आहेस.. तु चराचरात व्यापलेला आहेस.. मी अज्ञानी आहे.. तुझी ओळख होण्यासाठी माझ्यासाठी तु जे शरीरधारी श्री गुरु नेमलेले आहेस.. ते माझ्या जीवनात येवू दे.. आणि जर आलेले असतील तर मला त्यांची ओळख होऊ दे.. त्यांच्या प्रती विश्वास माझ्या मनात येवू दे.. त्यांच्या प्रती भक्ती माझ्या मनात येवू दे.. आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करत.. तुझ्या असीम अनंत स्वरूपाचे दर्शन होऊ दे..!! ”
बोला !! अनंत कोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News