आपले स्वामी बोलतात… “ अरे !! हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका…काळजी नका करू..!! ” .. मात्र तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजार पेक्षा लोक जेवले..

May 19, 2021

स्वामी लीला
अक्कलकोट मध्ये दत्त जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात.. भजन कीर्तन, अन्नदान आदी विविध कार्यक्रम होत.. असेच एकदा दत्तजयंतीच्या दिवशी मात्र तीनशे लोकांचे अन्न शिजवले.. पण येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या संख्येत दिसत होती.. आता तेथील मुख्य सेवेकरी चोळाप्पा ,श्रीपाद भट ,केशव देशपांडे आदी. जरा गोंधळले.. आता फजिती होते कि काय ह्या भीतीने हे स्वामींच्या जवळ आले.. आणि प्रार्थना करू लागले की, ” महाराज , आज प्रसादास गर्दी फार झाली. .तीनशे मनुष्यापुरतेच अन्न शिजले आहे. त्यात हे तीन-चार हजार यात्रेकरू कसे जेवतील ? “. वरिष्ठ मंडळींनी अशी प्रार्थना करताच स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले ” अरे !! हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका… जा काळजी नका करू..!! ” त्यानंतर श्री देशपांडे ह्यांनी स्वामी आज्ञे प्रमाणे देवीचा टाक व कडे पोळ्यांच्या राशीत ठेवले… नंतर मोठ्या थाटाने अंबेची आरती केली… श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थ सिंचन केले व प्रसाद वाटण्यास सुरुवात केली. स्वामी भक्त हो !! आश्चर्य झाले.. पहिली पंगत दोन हजाराची झाली.. दुसरी एक हजाराची झाली… तिसरी पंगत पुन्हा एक हजार भाविकांची झाली… सर्व जाती धर्माचे भाविक पोटभर जेवले.. कोणीही विना प्रसादाचे राहिले नाही… मात्र तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजार पेक्षा लोक जेवले.. स्वामीरायाची हि कृपा बघून सर्वांचे मन भक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरून गेले… त्या नंतर सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर स्वामी बोलले ” अरे , ते कडे आणि टाक इकडे आणा…!! ” श्री स्वामींचे हे वाक्य ऐकून देशपांड्यांनी कडे व टाक श्रीस्वामींन पुढे आणून ठेवले… नंतर महाराजांचे भोजन झाले… रात्री कीर्तन , गायन वगैरे होऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला…!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! अक्कलकोट मध्ये स्वामींचा सगुण अवतार हा मानवाला घडविण्यासाठी होता.. त्याला शिकवण्यासाठी होता.. आणि तेही प्रत्यक्ष कृतीद्वारे.. बघा !! ज्याच्या मात्र उपस्थितीत अनंत कोटी ब्रम्हांडाचे संचलन सुरु आहे.. हि सर्व सृष्टी अतिशय उत्कृष्ट पणे तिची अभिव्यक्ती करते आहे.. त्या परमपित्याच्या उपस्थितीत प्रसादाची कमतरता येणे शक्य आहे का …? सहाजिकच नाही..!! ह्याचाच अर्थ स्वामींना जगदंबेचा टाक आणि कडे आदी ह्याची लीला करून आपल्याला काहीतरी शिकवायचे आहे.. चला तर ह्याचे मनन चिंतन करून समजावून घेण्याचा प्रयत्न करू…!! स्वामी भक्त हो !! स्वामीनी मानवाला खूप शक्तिशाली मन दिले आहे.. आणि ह्या मनामध्ये खूप शक्ती दिलेल्या आहेत त्यातील एक शक्ती म्हणजे अतूट अभेद्य विश्वास.. खरतर प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.. जिथे अनन्य भक्ती असते तिथे अतूट अभेद्य श्रद्धा असते वा जिथे अतूट अभेद्य श्रद्धा असते तिथे अनन्य भक्ती असतेच.. असो. आजच्या स्वामी लीलेतून स्वामी आपणास विश्वासाच्या शक्तीचे महत्व शिकवत आहेत.. ह्या ब्रम्हांडात जे जे चमत्कार झालेत ते मात्र अतूट अभेद्य विश्वासाच्या शक्तीनेच झालेले आहे.. आजच्या लीलेत जेव्हा तेथील वरिष्ठ मंडळीना तीनशे लोकांचाच प्रसाद आणि येणारी भाविक तर ह्जारोत आहेत ह्याची जाणीव झाली… तेव्हा वरिष्ठ मंडळीना प्रसाद पुरेल किवा नाही हि भीती वाटू लागली .. त्यांचा आत्मविश्वास कमी होवू लागला आणि असे होणे सहाजिकच होते.. आणि त्यानंतर त्यांचे मन सतत कमतरतेच्या भावनेने.. अविश्वासाच्या भावनेने स्वयंपाकाकडे बघत होते.. आणि स्वामी भक्त हो !! जसा आपला विश्वास तसे फळ हा स्वामींचा कायदा आहे.. हा सर्व प्रकार स्वामींनी ओळखला आणि जगदंबेचा टाक आणि कडे पोळ्यांच्या राशीत ठेवण्यास सांगितले आणि काळजी करू नका हे अभय वचन दिले….!! बघा !! त्या सर्वांचा स्वामी वाणी वर विश्वास होता आणि स्वामीनी सांगितले म्हणजे आता प्रसाद सर्वांना पुरणारच हा दृढ विश्वास सर्वांमध्ये आला.. त्यांनी आनंदाने आरती वगैंरे करून आपला विश्वास प्रगट केला आणि काही वेळा पूर्वी जे नकारात्मक मन अभावाच्या नजरेने स्वयंपाकाकडे बघत होते.. ते आता अन्न भरपूर आहे.. ह्या विश्वासच्या नजरेने बघू लागले.. आणि चमत्कार झाला.. स्वामी जगदंबेने त्यांच्या विश्वासास न्याय दिला.. आणि तीनशे लोकांच्या स्वयंपाकात हजारो लोक जेवले.. स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढी साठी स्वामी आपणास हाच बोध देत आहेत कि, आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडतात त्या मात्र आपल्यातील विश्वास प्रगट करण्यासाठीच येतात.. अतूट अभेद्य विश्वास हा स्वामींचा गुण आहे.. आपल्याला अतूट अभेद्य विश्वास प्रगट करायचा आहे… ह्या विश्वासाच्या शक्तीनेच चमत्कार होतात… जीवनात परिस्थिती कितीही विपरीत असू दे.. त्यात एक आशेचा किरण असतोच.. त्याकडे अतिशय विश्वासाने बघत रहा.. बघा !! स्वामी जगदंबा त्या किरणाचे रुपांतरण तेजो प्रकाशात करेल आणि संकटरुपी अंधार त्यात नष्ट होईल.. कारण त्या विश्वास रुपी बीजाचे वटवृक्षात रूपांतरण करण्याचे काम तर स्वामीच करतात.. फळ देणारे स्वामीच आहेत.. स्वामी भक्त हो !! आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या रूढी , परंपरा , पूजा , विधी बनवल्या त्यांचा उद्देश मात्र आपल्या मधील सर्वोच्च प्रेम-विश्वास-कृतज्ञता प्रगट व्हावा हाच होता.. आणि ज्यांना ज्यांना त्याचा अनुभव आला किवा येत आहेत ते मात्र विश्वास प्रगट झाल्यानेच आला.. परंतु हे सुद्धा लक्षात असू द्या कि , आपल्या विश्वासाला नेहमी विवेकाची जोड हवी.. कमीत कमी सामान्य बुद्धीची जोड हवी.. बघा !! ह्या अतूट अभेद्य विश्वासाला विवेकाची जोड असल्यास जीवन सोनेरी होते ह्यात शंका नाही..चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमपित्या श्री गुरु समर्था !! आम्ही तुझे भक्त आहोत.. तुझे सेवेकरी आहोत.. तुझी भक्ती आणि तुझ्यावरील विश्वास हेच आमचे आभूषण आहे.. हेच आमचे दागिने आहेत… हे स्वामीराया !! अरे , आता आम्हाला तुझा खेळ समजायला लागला.. तुला नेहमी वाटते कि हे तुझे बाळ सुंदर दिसावे.. आणि म्हणूनच तु आमच्या जीवनात विविध घटनां देवून.. तुझ्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती.. श्रद्धा प्रगट करतो आहेस.. तुच ह्या दागिन्यांना चकाकी देत असतो.. हे आई !! तुझ्या लीला खरोखर अतर्क्य आहेत.. आम्ही मूढ आहोत.. असेच आम्हाला तुझ्या लीलेचा बोध दे.. असेच तुझे गुणगान गात तुझ्या चरणाजवळ ठेव.. स्वामी आई !! धन्यवाद.. धन्यवाद.. धन्यवाद !! ”

बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News