|| स्वामी लीला ||
मोगलाईत धाराशिवनजिक काजळे नावाच्या गावात श्री गोविंद मोहिते नावाचे गृहस्थ होते.. त्यांची स्वामी चरणी अनन्य भक्ती होती.. स्वामी कृपेने त्यांना कित्येक वर्षांनी संतान प्राप्ती झाली होती… आता दोनाचे चार हात झालेले होते.. संसाराचा गाडा ओढण्यास श्री गोविंद मोहिते ह्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती.. सर्व विश्वाची काळजी घेण्यास जो समर्थ आहे.. अशा श्री स्वामी समर्थांनाच शरण जावू आणि आपली समस्या सांगू ह्या उद्देशाने ते अक्कलकोट येथे आले.. त्या दिवशी स्वामी महाराज दरबारात स्वस्वरूपानंदात रमलेले होते.. श्री गोविंद मोहिते स्वामींच्या जवळ येतात.. स्वामींना साष्टांग दंडवत घालून हात जोडून उभे राहतात आणि स्वामींना अतिशय व्याकुळतेने प्रार्थना करतात “ महाराज..! प्रपंच फार वाढला आहे.. त्या तुलनेने मला प्राप्त होणारे उत्पन्न कमी आहे.. अशा स्थितीत अब्रुने कसे दिवस निघतील.. हे स्वामी राया..! खूप काळजी वाटते आहे.. काय करावे ? ”. श्री गोविंद मोहिते ह्यांनी असे बोलताच स्वामींनी त्यांच्या कडे बघितले.. “ अरे !! तुमचे शेतात विहिर खोदावी.. आणि त्यात ऊस.. हळद लावावी..!! ”. त्यानंतर श्री गोविंदराव बोलले “ स्वामी..!! भरपूर विहिरी खोदल्या.. परंतु पाणीच लागत नाही..!! ”. त्यानंतर समर्थ हसले आणि बोलले “ औदुंबर.. पिंपरी.. पिंपळ.. ह्यांच्या मध्यभागी खोदावे म्हणजे पाणी लागेल..!! ”. स्वामींची अशी आज्ञा होताच श्री गोविंदराव खुश झाले आणि आज्ञेप्रमाणे तेथे विहीर खोदली.. परंतु पाणी लागले नाही.. आता काय करावे ? श्री गोविंदराव हे निराश झाले.. आणि पुन्हा अक्कलकोट येथे आले.. आणि स्वामींच्या दरबारात येवून पुन्हा व्याकुळतेने प्रार्थना करू लागले.. “ स्वामी आपल्या आज्ञेप्रमाणे खोदले.. परंतु तेथे पाणी नाही लागले ..!! ”. श्री गोविंदरावांची हि व्याकुळतेची प्रार्थना ऐकताच स्वामींचे हृद्य कळवळले आणि स्वामींनी त्यांच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले “ अरे , त्या काळ्या हत्तीचे डोके फोडल्यावर धो – धो पाणी वाहील…!!! ”. स्वामी भक्त हो !! स्वामींनी असे बोलताच श्री गोविंदराव जरा गोंधळले.. स्वामींच्या वाणीचा अर्थ त्यांस समजला नाही.. आणि गोंधळलेल्या अवस्थेतच ते बोलेल “ महाराज, हत्तीचे मस्तक म्हणजे काय ?? ” तितक्यात श्रीपाद बोलले “ अहो.. औदुंबराशेजारी हत्ती सारखा दगड आहे,.. तो फोडल्यावर पाणी लागेल..असे स्वामींना बोलायचे आहे..!! ” . स्वामींची हि आज्ञा होताच श्री गोविंदराव पुन्हा गावी आले.. आणि स्वामी आज्ञेप्रमाणे तेथे असलेला दगड फोडून त्या खाली खोदताच चमत्कार झाला…!! अहो !! हत्तीच्या सोंडेतून जसा पाण्याचा फवारा उडावा तसे धो- धो पाणी लागले.. स्वामी महाराज हे एकमेव सत्य आहे त्यांची वाणी सुद्धा सत्यच असणार ह्याची सर्वांना खात्री झाली.. पुढे श्री गोविंदराव हे शेतात प्रचंड मेहनत करू लागले.. आणि स्वामी कृपेने शेतात सुद्धा पुष्कळ धनधान्य पिकू लागले आणि त्यांस जी प्रपंचाची काळजी होती ती पूर्णपणे मिटून गेली..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजची स्वामी लीला खरोखर खूपच प्रेरणादाई आहे.. आजच्या स्वामी लीलेतून तर ज्या स्वामी भक्तांना आज प्रापंचिक आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे.. त्यांच्यासाठी तर स्वामी स्पष्टपणे सांगत आहेत कि “ घाबरू नका तुमच्या प्रपंचाची जबाबदारी मी स्वीकारली आहे.. तुमच्या सर्व प्रापंचिक चिंता मिटलेल्या आहे असे खुशाल समजा.. आता तुम्हाला भेटणाऱ्या कर्म संकेता नुसार कर्म करायचे आहे.. तुमच्या जीवनात ज्या ज्या संधी मी देतो आहे त्याचे सोने करायचे आहे..!! ”. स्वामी भक्त हो !! बघा आजच्या लीलेत श्री गोविंदराव ह्यांस प्रापंचिक चिंता होती.. त्यांनी स्वामींना प्रार्थना केली.. अगदी तसेच आपण सर्व प्रापंचिक आहोत.. आणि जेव्हा आपल्याला प्रापंचिक समस्या भेडसावते तेव्हा आपण सुद्धा स्वामींना प्रार्थना करत असतो.. आणि त्यानंतर स्वामी महाराज आपणास अनेक कर्म संकेत देतात.. जसे गोविंदरावांस विहीर खोदण्याचे कर्म संकेत दिले.. अगदी तसेच आपणास सुद्धा स्वामी कर्म संकेत देत असतात.. आणि आपण त्या प्रमाणे कर्म सुद्धा करतो.. परंतु कर्म करत असतांना कधी कधी आपणास यश येत नाही.. आपले संकट दूर होण्याचे कोणतेच संकेत दिसत नाही.. आणि आपले नशीबाला दोष देत.. आपण हताश होऊन प्रयत्न सोडून देतो.. खरतर आजच्या लीलेतून आज आपणास आजच्या पिढीसाठी स्वामींना “ त्या काळ्या हत्तीचे डोके फोडल्यावर धो – धो पाणी वाहील…!!!” ह्या स्वामी वाणी तून हेच सांगायचे आहे कि, निरंतरतेने शेवट पर्यंत कर्म करत राहा.. स्वामी भक्त हो !! जेव्हा आपण कर्म सुरु करतो.. तेव्हा काही कर्म फळाची तयारी असते.. काही कर्म हे फळ साध्य करण्याचा प्रवास असतो तर शेवटचे कर्म हे फळ प्रगट करणारे असतात.. जसे एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत प्रथम क्रमांक आणायचा असेल.. तर योग्य पाठ्य पुस्तक निवडणे हे फळाची तयारी करणारे कर्म.. त्यानंतर अभ्यास करणे हे फळासाठी प्रवास असलेले कर्म आणि प्रत्यक्ष परीक्षागृहात परीक्षा देणे हे फळ साध्या करणारे कर्म.. पण बहुतेक लोक दुसऱ्या प्रकारच्या कर्मामध्येच हताश होतात आणि शेवटचे कर्म म्हणजेच “ काळ्या हत्तीचे डोके फोडण्याचे” कर्मच करत नाही असो. थोडक्यात आपल्याला आपल्या मनाला सतत सांगायचे आहे कि, “ अरे मना.. ज्या अर्थी अजून आपल्याला यश भेटले नाही ह्याचा अर्थ स्वामींनी आपणास अजून प्रयत्न थांबवण्याची आज्ञा दिलेली नाही.. निश्चितच शेवटचे कर्म घडेल.. काळ्या हत्तीचे डोके फोडण्याचा घाव बसेल आणि स्वामींनी सांगितल्या प्रमाणे कृपेचे धो धो पाणी वाहील..!! ” . स्वामी भक्त हो !! बस्स आपल्यला आपल्यातील विश्वासाने भारलेल्या कर्माला सर्वोच्च उंचीवर न्यायचे आहे.. जितकी जास्त विश्वासयुक्त कर्माची उंची तितके मोठे यश..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी राया !! जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो.. त्यानंतर तु आम्हाला लगेचच कर्म संकेत देतो.. आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्म संकेता प्रमाणे कार्य सुरु सुद्धा होते.. पण हे समर्था !!! हे सुरु असतांना कधी कधी मन खचुन जाते.. हताश होते.. म्हणून हे श्री गुरुदत्तात्रेया !! सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अतूट अभेद्य विश्वासाची शक्ती दे.. मला निरंतेची शक्ती दे.. ह्या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल.. आणि माझ्या प्रार्थनेचे जे नियोजित फळ देण्याचे ठरविलेले आहे.. ते भेटेल.. हे आई !! मला माहित आहे.. आमच्या कडून प्रार्थना करवून घेणारा तूच आहेस.. त्या प्रार्थनेचे फळ देणारा तूच आहेस आणि फळ आल्यानंतर आनंदी होणारा तूच आहेस.. कारण ह्या ब्रम्हांडात फक्त ‘तूच’ आहेस.. ‘मी’ नाही.. फक्त ‘तूच’ आहेस.. ‘मी’ नाही.. धन्यवाद स्वामी !
धन्यवाद स्वामी !! धन्यवाद स्वामी !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
२९ सप्टेंबरला विहंगम योग तर्फे नाशिक मध्ये भव्य आध्यात्मिक सत्संग सोहळा
Nashik : येत्या नोव्हेंबर महिन्यात विहंगम योग संस्थान आपला १०२ वा वार्षिकोत्सव वाराणसी येथील...






