आपले स्वामी बोलतात ….“ निर्लज्जो गुरुसंन्निधौ !! ” स्वामी वाणी होताच.. बाळप्पास स्वामींची आज्ञा समजली..

Jun 2, 2021

|| स्वामी लीला ||
अनन्य भक्त बाळप्पा..!! सद्गुरूंच्या प्राप्ती साठी आपल्या घरादाराचे त्याग करून अक्कलकोट येथे स्वामी चरणी आपले जीवन समर्पित करणारे.. अनन्य भक्त बाळप्पा..!! स्वामींच्या परब्रम्हत्वाची अनुभूती आल्या नंतर बाळप्पा अक्कलकोट येथेच राहू लागले.. हळू हळू बाळप्पा स्वामी सेवेच्या जबाबदाऱ्या घेत होते.. अक्कलकोट मध्ये स्वामींच्या दरबारात सेवेची कामे नियोजित असत.. जसे गणपतरावांनी स्वयंपाक करावा.. नरसप्पाने पाणी तापवावे.. सुंदराबाईने स्वामींच्या जेवणाचे बघावे… श्रीपादभटाने पूजा करावी.. आणि बाळप्पा ह्यांनी सर्व वस्तूंची त्या त्या ठिकाणी जमवा जमव करून वेळच्या वेळी व्यवस्था करावी.. मग स्वामी महाराज कोठेही असोत.. जंगलात.. मशीदमध्ये.. हरिजनांच्या वस्तीत.. देवळात.. कोणाच्याही घरी.. रस्त्यात वा शेतात.. त्या त्या ठिकाणी बाळप्पा सर्व व्यवस्था उत्तम ठेवत.. स्वामी भक्त हो !! स्वामींचे बाळप्पावर खूप प्रेम होते.. स्वामींच्या शाळेत बाळप्पा घडत होते.. अनेक घटना प्रसंगातून स्वामी बाळप्पाच्या मनातील जुने संस्कार काढून टाकून त्यात सतत अनन्य भक्तीचे.. सेवेचे संस्कार रुजवत होते.. ह्यातच आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्ट पणे पार पाडत असतांना बाळप्पा ह्यांना तेथे पाणी आणण्याची लाज वाटत असे.. श्री बाळप्पा ह्यांचा हा प्रकार स्वामींच्या लक्षात आला.. आणि एके दिवशी बाळप्पा ह्यांच्यावर पाणी आणण्याचा प्रसंग आला.. आणि त्यांस जरा त्याची लाज वाटू लागली.. तेव्हा स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले “ निर्लज्जो गुरुसंन्निधौ !! ”. स्वामी भक्त हो !! श्री बाळप्पा ह्यांना गुरुकृपेची तळमळ होती.. ह्यामुळे त्यांचे मन संवेदनशील झालेले होते.. आणि म्हणूनच त्यांना स्वामींचे संकेत सहज समजत होते.. ह्यातुनच वरील स्वामी वाणी होताच.. बाळप्पास स्वामींची आज्ञा समजली.. त्यांचे मन अजून शुद्ध झाले.. त्या नंतर त्यांचे प्रत्येक कर्म स्वामी सेवा झाली.. जी जी कामे करण्यात त्यांना लाज वाटत असे.. ती सर्व कामे ते अतिशय आनंदाने स्वामी सेवा म्हणून करू लागले.. आणि स्वामी भक्तीच्या वरच्या वर्गात त्यांनी प्रवेश केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आजची स्वामी वाणी तर प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यास तर खूपच मार्गदर्शक आहे.. आजच्या लीलेतून आज आपणास आजच्या पिढी साठी स्वामी आपणास असंख्य बोध देत आहेत पैकी हे लक्षात येते कि, स्वामी कृपा सतत होत आहे.. आपल्या मनातील विकारच स्वामी कृपा ग्रहण करण्यासाठी बाधा ठरत असतात.. जेव्हा आपण त्या विकारांवर विवेकाचे शस्त्रा सह अनन्य भक्तीच्या शक्तीचा उपयोग करून मात करतो तेव्हा आपणास गुरु कृपेचा बोध होतो.. आणि हा बोध जेव्हा जीवनात उतरतो तेव्हा आपले जीवन सोनेरी होते.. आजच्या लीलेत श्री बाळप्पा ह्यांस पाणी वगैरे आणण्याची लाज वाटत होती.. स्वामी सेवेत ते नुकतेच रुजू झालेले असल्याने त्यांच्या मनात असलेले जुने संस्कारामुळे त्यांना कदाचित कमीपणा वाटत असावा…. आणि हा प्रकार ओळखून “ श्री गुरु सदैव निर्लज्ज शिष्या सोबत असतात ” हि स्पष्ट समज स्वामींनी त्यांस दिली.. खरतर वरील स्वामी वाणीत निर्लज्जचा अर्थ म्हणजे… श्री गुरूंच्यासाठी काहीही करण्याची तयारी.. त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याची तयारी… म्हणजे संपूर्ण समर्पण असा होय.. जेव्हा संपूर्ण समर्पण होते.. तेव्हा आपले मन पूर्ण पणे शुद्ध होते.. आपल्या मनाची पाटी पूर्ण पणे कोरी होते आणि त्यानंतर त्यावर श्री गुरुकृपेचा बोध सहज उमटतो.. आपले प्रत्येक कर्म हे सेवा होते.. आणि आपण विकासाची शिडी सतत चढत जातो असो. स्वामी भक्त हो !! आजही आपल्या जीवनात असेच घडत असते… जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी आपणास कर्म संकेत देत असतात.. आज्ञा देत असतात.. आणि आपल्याला त्या आज्ञा समजतात सुद्धा परंतु आपले मन हे पूर्व संस्कारांनी इतके भरलेले असते कि , “ लोक काय म्हणतील ?? ” हा नकारात्मक विचार सतत आपल्याला मागे ओढत असतो.. आणि ह्या मुळे आपला विकास खुंटतो.. स्वामी भक्त हो !! अशा वेळी आपल्याला वरील स्वामी वाणीचे स्मरण करायचे आहे.. आणि प्रत्येक कर्म उत्कृष्टपणे स्वामी हुकुम म्हणून करायचे आहे..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्री गुरुतत्वा !! आम्ही तुला प्रार्थना करताच तु आम्हाला कर्म करण्याचा हुकुम देतोस.. तुझा हुकुम आम्हाला समजतो सुद्धा पण जेव्हा कृती करायला जातो तेव्हा ‘ लोक काय म्हणतील ? ’ हा नकारात्मक विचार मागे ओढतो.. कर्माचे बळ कमी करतो.. पण हे स्वामी आई !! आता ‘ निर्लज्जो गुरुसंन्नीधौ ’ ह्या तुझ्या स्वामी वाणीने प्रेरणा भेटते आहे.. आमच्या प्रत्येक कर्मात अनन्य भक्तीची शक्ती संचारित होते आहे.. आणि हे जीवन स्वामीमय होते आहे..!! तुझ्या ह्या समज साठी कोटी कोटी धन्यवाद स्वामी ! धन्यवाद स्वामी !! धन्यवाद स्वामी !!!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News