आपले स्वामी बोलतात …..“ अरे.. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे.. त्याचे हातपाय तोडून टाका..!! ” स्वामींची हि वाणी होताच सर्वांचे हातपायाचे कापरे भरले..

Jun 30, 2021

|| स्वामी लीला ||
आपले स्वामी ह्या अनंत कोटी ब्रम्हांडाची आई आहे.. ह्या निर्गुण निराकार परम शांतीच्या उदरातूनच हे अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण झालेले आहे.. ह्या स्वामी मातेनेच मानवासह ह्या निर्सगातील पशु पक्षी वनस्पती आदींना जन्माला घातले आहे.. आणि हि परम शांतीच सर्वांचे पालन पोषण करते आहे.. ह्या मातेचे आपल्या बाळांवर खूप प्रेम आहे आणि तिने अक्कलकोट मध्ये लीला करत असतांना वेळो वेळी ह्याची समज दिली.. असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी गणपतराव जोशी ह्यांच्या घरात बसलेली होती.. स्वामी महाराज गणपतराव जोशी ह्यांच्या सोफ्यावर स्वस्वरुपानंदात रममाण झालेले होते.. जोशी ह्यांच्या अंगणात कडूनिंबाचे झाड होते.. त्या वेळेला घरात जरा आवरासावर सुरु होती.. श्री जोशी ह्यांनी त्यांच्या गड्याला बोलवले आणि बाहेरील त्या कडूलींबाच्या झाडाची एक फांदी तोडण्यास सांगितले.. आणि गड्याने सांगितल्या प्रमाणे कु-हाड हातात घेतली आणि झाडाची फांदी तोडण्यास सुरुवात केली.. तितक्यात स्वामींनी एक लीला केली.. स्वामी महाराज अचानक रागाने लालबुंद झाले.. आणि मोठ्याने आवाज देवून बोलले “ अरे.. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे.. त्याचे हातपाय तोडून टाका..!! ” स्वामी भक्त हो !! स्वामींची हि वाणी होताच सर्वांचे हातपायाचे कापरे भरले.. आणि कडूलिंबाच्या झाडाची फांदी तोडण्याचे काम त्वरित थांबवले.. त्या नंतर सर्वांनी स्वामींची माफी मागितली.. त्याच वेळेला स्वामी महाराज क्रोधीत अवस्थेत बाहेर एका उकिरड्यावर जावून बसले.. स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून सर्वांना खरोखर आश्चर्याच वाटले..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास खूप मोठा संदेश देत आहेत.. ह्या निर्गुण निराकार परब्रम्हाचे सुगुण साकार स्वरूप म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसणारा हा निसर्ग !! हा निसर्ग म्हणजे परमचैतन्य स्वरूप स्वामींचे असीम अनंत शरीर होय..!! जसे मानवाच्या शरीरात प्रत्येक अवयव हा त्याच्या त्याच्या ठिकाणी महत्वाचा आहे.. जर एखाद्या अवयवाला इजा पोहचतास सर्व शरीराचे संतुलन बिघडून जावून अनारोग्य येते.. अगदी तसे वरील स्वामी वाणीत ‘ पालखी ‘ हा शब्द उच्चारून हा निसर्ग म्हणजे स्वामींचे सगुण स्वरूप असून.. ह्या असीम अनंत सगुणाचे, मानव शरीरा सह ग्रह, तारे, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, आदी अवयव आहे.. हे सर्व स्वामींचेच अंश आहेत आणि प्रत्येक अंश स्वामींच्या एका विशिष्ट गुणाची अभिव्यक्ती करत आहे.. जेव्हा आपण आश्चर्याच्या नजरेने बघतो.. तेव्हा खरोखर स्वामींच्या ह्या दिव्य रचनात्मक(creativity) गुणाची मुखातून स्तुतीच होते.. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत ताल सुरात आहे.. ताळमेळ मध्ये आहे.. !! परंतु स्वामी भक्त हो !! ह्या निसर्गाचा अविभाज्य भाग असणारा मानव प्राणी ह्याला विचार करण्याचे, बुद्धीचे असे एक विशिष्ट वरदान लाभलेले आहे.. आणि खेदाची बात हि कि, हे वरदान ह्या निसर्ग चक्रासाठी.. अभिशाप ठरत आहे..!! मानव स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्ग चक्राची पर्वा न करता त्यात हस्तक्षेप करतो आहे.. आणि म्हणूनच आजच्या लीलेत जेव्हा कडूलींबाच्या झाडाची फांदी तोडण्याचा प्रकार सुरु झाला तेव्हा स्वामींनी रागवून त्यांस आमच्या पालखीची दांडी नका तोडू.. म्हणजेच ह्या निसर्ग चक्रात हस्तक्षेप करू नका.. असा अगदी स्पष्ट संकेत दिला. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी आपल्याला आजच्या लीलेतून हा बोध घ्यायचा आहे कि, आपल्याला स्वामींच्या ह्या निसर्गावर प्रेम करायचे आहे.. निसर्गातील प्रत्येक भाग हा स्वामींचा अंश आहे.. हि अनन्य भक्तीची भावना धारण करायची आहे.. आणि निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आदर भाव मनात ठेवायचा आहे.. कारण जेव्हा आपण निसर्गाच्या ताल सुरात – ताळ मेळ मध्ये असू तेव्हा आपल्या प्रार्थनेच्या पूर्ततेसाठी स्वामी आपणास जे कर्म संकेत देतात.. हे कर्म संकेत आपणास सहज समजतील.. कारण जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा सर्व सृष्टी कामाला लागते..असो. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे निराकारा !! हे अनंतकोटी ब्रम्हांड म्हणजे तुझे सगुण स्वरूप शरीरच आहे… हे तुझ्या दिव्य रचनात्मक गुणाची अभिव्यक्ती आहे.. हे स्वामीराया !! ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक घटक तुझाच अंश आहे.. परंतु आम्हा मानवाकडून स्वार्थापोटी ह्या तुझ्या निसर्गचक्रात हस्तक्षेप झाला ह्या बद्दल आम्हाला क्षमा कर.. आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे.. अनन्य भक्तीची भावना दे.. तू चराचरात आहेस हे बघण्याची अनन्य भक्तीची दृष्टी दे.. आणि तुझ्या परमशांती.. परमानंद.. अनन्य भक्ती ह्या दिव्य गुणांचे साम्राज्य अभिव्यक्ती कर…!! हे आई !! तु माझा गुरु आहेस.. मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे !! धन्यवाद स्वामी.. धन्यवाद स्वामी !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News