आपले स्वामी बोलतात …..“ अरे त्याला सांग कि, गोमुत्र घे म्हणजे जाईल तुझी व्याधी…!! ” स्वामींचे हे आगळे वेगळे औषध श्री मोरोपंतानी त्वरित नारायण वकील ह्यांस कळविले..

Jul 14, 2021

|| स्वामी लीला ||
नारायण परशुराम सोलापूरकर वकील हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. स्वामींबद्दल त्यांच्या मनात अतूट अभेद्य श्रद्धा होती.. आणि स्वामींचे सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते.. स्वामी महाराज मोठ्या प्रेमाने त्यांना ‘गणपती ’ ह्या नावाने हाक मारत.. श्री नारायण हे स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे डूबलेले होते.. ह्यातच त्यांच्या शरीराला एक व्याधी जडते.. त्यांना मूळव्याधीचा आजार जडतो.. आजार दिवसेंदिवस वाढत जातो.. त्यांनी अनेक डॉक्टर केले.. वैद्य केले परंतु त्यांस काही गुण येत नव्हता.. शेवटी त्यांनी डॉक्टरांकडून त्याचे ओपेरेशन करवून घेतले.. परंतु त्यामुळे ते आणखी बेजार झाले.. त्यांचा त्रास वाढू लागला.. सततचा रक्तस्राव होऊ लागल्याने ते कमालीचे अशक्त झाले.. त्यांना घरातल्या घरात फिरणे सुद्धा अशक्य झाले.. आता काय करावे !! शेवटी त्यांना अक्कलकोट मध्ये सगुण रुपात अवतरलेल्या अनंत कोटी ब्रम्हांडाच्या डॉक्टरची आठवण आली.. आता स्वामींच्या शिवाय दुसरे कोणीच नाही.. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणी साकडे घालण्याच्या निश्चय केला.. परंतु त्रास इतका होता कि, त्यांना अक्कलकोट येथे येणे शक्यच नव्हते.. म्हणून त्यांनी श्री मोरोपंत ह्यांच्याकडे आपल्या आजराबद्दल लिहून पाठवले.. आणि स्वामींनीच काहीतरी औषध सांगावे हि विनंती केली.. मोरोपंताना श्री नारायण वकील ह्यांची चिठ्ठी भेटते.. मोरोपंत चिठ्ठी वाचतात.. आणि दुसऱ्या दिवशी दरबारात येवून महाराजांना सर्व हकीकत सांगतात.. आणि ह्या आजारावर श्री नारायण बुवा ह्यांस काहीतरी औषध सांगावे हि विनंती करतात.. तेव्हा स्वामी हसतात आणि बोलतात.. कि, “ अरे..!! त्याला सांग कि, गोमुत्र घे.. म्हणजे जाईल तुझी व्याधी…!! ” . स्वामींचे हे आगळे वेगळे औषध श्री मोरोपंतानी त्वरित नारायण वकील ह्यांस कळविले.. श्री नारायण वकील ह्याची स्वामींच्या चरणी अनन्य भाव होता.. म्हणून त्यांनी अतिशय श्रद्धेने स्वामींनी सांगितलेले औषध घेतले.. आणि चमत्कार झाला.. स्वामी भक्त हो !! मूळव्याधीच्या आजाराने बेजार झालेले श्री नारायण सोलापूरकर वकील ह्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला.. स्वामींच्या ह्या लीलेचे त्यांना आश्चर्य वाटले.. त्या नंतर पुढे काही दिवसांनी ते अक्कलकोटी आले.. आपला आलेला अनुभव सर्वांना सांगितला.. स्वामींची अतर्क्य लीला बघून सर्व सेवेक-यांचा अनन्य भक्तीचा भाव जागृत झाला आणि सर्वांनी एक घोषात जयजयकार केला..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
स्वामी भक्त हो !! स्वामींच्या लीला खरोखर अतर्क्य आहेत.. बघा ना !! मूळव्याधीच्या आजारावर स्वामींचे औषध काय तर गोमुत्र.. खरोखर आजच्या आधुनिक मेडिकलशास्त्राला सुद्धा नक्कीच ह्याचे आश्चर्य वाटेल ह्यात नवल नाही.. कारण स्वामी तर सर्व ब्रम्हांडाचे डॉक्टर आहेत असो. आणि महत्वाचे म्हणजे आज जर कोणी संबंधित आजाराने त्रस्थ असेल तर कृपया त्यांनी वरील औषधाचा उपयोग करू नये.. कारण हे औषध श्री नारायण वकील ह्यांच्यासाठी दिलेले होते.. कदाचित आपल्यासाठी वेगळे असू शकते.. परंतु हि आगळी वेगळी लीला करून भविष्यातील पिढ्यांसाठी निश्चितच त्यात मार्गदर्शन दडलेले आहे.. आणि आज आपण ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू.. स्वामी भक्त हो !! खरतर स्वामींच्या एका एका लीलेचे हजारो बोध आहेत.. पैकी जर आपल्या जीवनात सतत अपयश येत असेल.. संकट येत असतील तर त्या मागे असलेली “ मूळव्याधी ” कोणती आहे हे आज स्वामी आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.. स्वामी भक्त हो !! जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात सतत अपयश येते.. अशांतीच्या घटना घडतात तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या मनाच्या ह्या मूळव्याधीचा समूळ नाश करायचा आहे.. आणि हि मूळव्याधी आहे.. आपल्या अंतर्मनात कोरला गेलेला “ आपला नकारात्मक विश्वास ”. स्वामी भक्त हो !! जेव्हा आपण नकारात्मक भावनेने कोणतेही कर्म करतो.. मग ते भावनिक असेल वा वैचारिक स्तरावरील असेल.. त्याचे फळ म्हणजे आपण आपल्या जीवनात फक्त नकारात्मक घटना वा माणसच आकर्षित करतो.. आणि त्यानंतर जसे श्री नारायण वकील ह्यांनी आजारापासून मुक्ती मिळावी म्हणून भरपूर उपाय केले परंतु उलट आजार वाढतच गेला.. अगदी तसे आपण ह्या नकारात्मक भावनेच्या चक्रात पूर्णपणे अडकतो आणि मग नकारात्मक घटनाच आकर्षित व्हायला सुरुवात होते.. उदा. बघा जसे एखादी नको असलेली व्यक्ती आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा येत असते.. आणि जितके जास्त त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करतो ती तितकी आपल्या जीवनात येत असते.. आणि म्हणून स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणी तून स्वामींनी ह्यावर सोपा उपाय सांगितला कि “ गोमुत्र घे !! ”. अर्थात गोमुत्र हे पावित्र्याचे प्रतिक आहे.. आज आपणासाठी प्रतीकात्मक रित्या बोध घेता गोमुत्र घे.. म्हणजे सकारात्मक.. मंगलकारी.. कल्याणकारी भावना धारण करायची आहे… जसे वरील उदाहरण मध्ये आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक भाव ठेवायचे आहे.. बघा एकतर ती व्यक्ती बदलेल अथवा आपल्या जीवनातून कायमची जाईल.. स्वामी भक्त हो !! जर आपल्याला आपल्या जीवनात कायम स्वरूपी बदल हवा असेल तर स्वामींच्या प्रती असलेली भक्तीची भावना स्वामींच्या प्रती असलेली अतूट अभेद्य विश्वासाची भावना धारण करायची आहे कारण हि भावना ब्रम्हांडातील सर्वोच्च सकारात्मक भावना आहे.. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता स्वामी हेच सांगत आहेत कि जर जीवनात नकारात्मक घटना वा प्रसंग येत असेल तर त्याचे मुळ हे आपल्या मनातील नकारात्मक भावना.. विचार आहेत.. आणि हे घालविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अनन्य भक्तीची.. अतूट अभेद्य श्रद्धेची.. दिव्य सकारात्मक भावना धारण करायची आहे.. आणि “ मी स्वामींचा बाळ आहे.. माझे चांगलेच होत आहे ” हा सकारात्मक विश्वासाने भारलेला विचार सतत करायचा आहे.. आणि आपले प्रामाणिक कर्म करत यशाच्या शिखरावर आरूढ व्हायचे आहे.. चला तर मग आज आपण स्वामिना प्रार्थना करू या “ हे समर्था !! आमच्या हृदयात तुझ्याबद्दल असलेल्या बेशर्त प्रेमाच्या भावनेच्या तरंगांचा संचार कर.. अतूट अभेद्य विश्वासाच्या भावनेच्या तरंगांचा संचार कर.. हे आई..!! ह्या तरंगांचा संचार इतका वेगाने कर कि, ह्या शरीराच्या पेशी अन पेशीला छेदून हे तरंग ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात पसरतील.. विश्वातील नकारात्मकता विलीन करतील..आणि ह्या पृथ्वीवर फक्त तुझ्या अनन्य भक्तीचे आनंदाचे साम्राज्य आकर्षित करतील..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

 

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News