|| स्वामी लीला ||
अक्कलकोट नगरीत स्वामींच्या लीला ऐकून असंख्य लोक येत.. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या समज नुसार स्वामी कोण आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करत.. परंतु स्वामी महाराज येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या समजनुसार.. त्याच्या शरीर-मन-बुद्धीच्या पात्रते नुसार.. विविध लीला करून.. प्रत्यक्ष कृती द्वारे.. टप्प्या टप्प्याने.. “ आम्ही निर्गुण निराकार परम महासत्य आहोत.. आणि ह्या महासत्याने मानवासाठी मानव शरीर धारण केले आहे.. आणि आपण सर्व त्याचेच अंश आहोत.. आपण स्वामींची बाळे आहोत.. हीच उच्चतम समज.. देवून त्याच्या मध्ये अतूट अभेद्य विश्वास जागृत करत.. त्याच्या चंचल मनात अनन्य भक्तीचा उपहार देत..!!”. स्वामी भक्त हो !! ह्या साठी कधी कधी स्वामी चिडण्याची कृती करत.. अपशब्द बोलून त्याच्यातील अहंकारावर आघात करत… असो. असेच एकदा साधारणतः १७८६ मध्ये अक्कलकोट येथे एक पंजाबी गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी येतो.. स्वामींच्या लीला ऐकून तो अक्कलकोट मध्ये येतो.. त्या पंजाबी व्यक्तीला महारोगाने पिडलेले होते.. स्वामी महाराज चमत्कार करतात.. असाच एखादा चमत्कार करून स्वामींनी माझा आजार बरा व्हावा ह्या इच्छेने तो स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येतो.. मजल दर मजल करत शरीराने उंच.. बोलण्यात धीट असलेला.. हा पंजाबी व्यक्ती अक्कलकोट मध्ये येतो… त्या दिवशी स्वामी महाराजांची स्वारी साखरविहिरीकडे होती.. तेथे सभोवताली असंख्य सेवेकरी होती.. त्या वेळी हा पंजाबी व्यक्ती तेथे येतो.. स्वामींना बघताच दर्शन घेवून तेथे उभा राहतो आणि बोलतो.. “ आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हुं..!! ”. स्वामी भक्त हो !! त्याने असे बोलताच अचानक स्वामी महाराज रागाने लालबुंध झाले.. आणि बोलले… “चमत्कार गारूडीके खेल मै देखे नही क्या?” त्यानंतर त्याच्याकडे बघत असंख्य शिव्यांचा भडीमार केला.. त्याचे सुरु असलेले सर्व व्यभिचार.. अंत:साक्षित्वाने ओळखून त्याला सांगितले.. स्वामी भक्त हो !! इतकेच नव्हे तर स्वामींनी त्यांच्या कंबरेची लंगोटी काढून फेकून दिली आणि विवस्त्र होऊन… तो करत असलेल्या पापी व्यभिचाराची पातळी त्याला दाखवली.. स्वामी भक्त हो !! स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून आता तो पंजाबी गृहस्थ चांगलाच घाबरला.. स्वामींचे हे अंत:साक्षित्वाचे बोलणे ऐकून तो मनोमन चांगलाच विरघळला.. त्याने स्वामींचे चरण धरले.. स्वामी महाराज कोणी चमत्कार करणारी व्यक्ती नसून प्रत्यक्ष परब्रम्ह अवतारी आहेत ह्याची त्याला खात्री पटते.. त्यानंतर तो अतिशय अनन्य भक्तीच्या भावनेने स्वामींना शरण जातो.. जवळ जवळ दोन महिने अक्कलकोट येथे स्वामींची सेवा करतो.. स्वामी महाराज कोणाचे काहीच ठेवत नाही.. त्यालाही अनुभव येतो.. त्याच्या वर स्वामी कृपा होते.. तो महारोगाच्या आजारातून बरा होतो.. आणि अनन्य भक्तीचा.. अतूट अभेद्य श्रद्धेचा उपहार घेऊन आपल्या देशी निघून जातो..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी लीलेतून स्वामी महाराज पुन्हा आपल्याला स्वामी अनन्य भक्तीची प्रेरणा देत आहेत.. बघा !! आजच्या लीलेत पंजाबी गृहस्थ स्वामींना एक चमत्कार करणारा मानव समजत होता.. कदाचित त्याला वाटले कि, स्वामी हे कोणी मानव आहेत आणि त्या मानवात रिद्धी सिद्धी वगैरे शक्ती जागृत झाल्या असतील.. आणि ह्यांना चमत्कार करून आपला आजार बरा करण्याचे सांगू आणि त्यानंतर त्यांना काहीतरी मोबदला देऊन खुश करू.. असा उर्मट अहंकारी भाव होता..!! स्वामी भक्त हो !! थोडक्यात त्याच्या मनात स्वामींबद्दल प्रेमाचा भाव नव्हता.. तर त्याच्या मनात स्वामींबद्दल व्यवहारीक भाव होता.. स्वामी महाराज हे काय आहे.. ह्या बद्दल त्याच्या मनात चुकीची समज होती.. अर्थात त्याला वरील लीलेत स्वामींनी त्याच्या मनाच्या व्यभिचारी.. विकारी वृत्तीचे दर्शन घडवून देवून.. त्यास हेच सांगितले कि, वरील मनाच्या विकारांवर विजय मिळवल्यास.. स्वामींचे खरे स्वरूप लक्षात येईल.. किवां कमीत कमी त्या दिशेने प्रवास सुरु होईल.. आणि स्पष्ट संकेत देत त्याला देवून.. त्याला अनन्य भक्तीच्या वरच्या वर्गात प्रवेश करवून दिला.. स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता आपल्याला अनन्य भक्तीच्या वरच्या वर्गात प्रवेश करायचा आहे.. आपल्याला स्वामी महाराजांच्या सोबत व्यवहारीक उपासनेचे नाते नाही जोडायचे.. अमुक अमुक इतकी सेवा केली म्हणजे स्वामी माझ्यावर इतकी इतकी कृपा करतील.. अमुक अमुक चमत्कार करतील.. वा त्या पेक्षा जास्त सेवा केली म्हणजे अजून जास्त कृपा होईल.. चमत्कार करतील.. वगैरे वगैरे !! स्वामी भक्त हो !! आपल्या मनात जर अशी समज असेल तर आता आपल्याला स्वामी भक्तीच्या वरच्या वर्गात प्रवेश करायचा आहे.. आपण जप वा पारायण सेवा करत असाल.. तर नक्कीच करायचे आहे… पण हे जप पारायण आपण स्वामीप्रती असलेल्या प्रेमापोटी करतो आहे ह्या अनन्य भक्तीच्या समज ने करायचे आहे…. जेव्हा आपण जप करू तेव्हा स्वामी आनंदाचा आस्वाद घ्यायचा आहे.. पारायण म्हणजे स्वामी लीलांचे गुणगान करतांना.. त्यातील माधुर्याचा आस्वाद घायचा आहे.. आणि हो !! आपण प्रापंचिक आहोत.. प्रपंच करता करता आपल्याला स्वामीकडे काही मागायचे असेल तर नक्कीच मागायचे आहे.. पण मागतांना एक बाळ जसे आईकडे हट्ट करते.. अगदी तश्या प्रेमाच्या अधिकाराने मागायचे आहे.. स्वामींना असे मागणे नक्कीच आवडते.. आपल्याला जर काही संकट वा दु:ख असेल तर आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास मनात ठेवायचा आहे.. मी स्वामींचा बाळ आहे.. स्वामींना माझी काळजी आहे.. मी प्रार्थना करताच.. संपूर्ण सृष्टी कामाला लागलेली आहे.. स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत.. माझ्या कडून योग्य वेळी.. योग्य ठिकाणी.. योग्य कर्म करवून घेत आहेत.. आणि माझे प्रत्येक कर्म स्वामी सेवा होते आहे.. हा अतूट अभेद्य विश्वास ठेवायचा आहे.. स्वामी भक्त हो !! जप.. पारायण.. ह्या मागे खूप मोठे विज्ञान आहे.. ह्या गोष्टी तर आपल्या मन:शुद्धी साठी आहेत.. आपल्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आहेत.. कारण जेव्हा आपण आपल्या मनावर जेव्हा आपण विजय मिळवतो.. तेव्हा आपल्याला हा सहज बोध होतो कि, स्वामीच्या म्हणजेच परमशांतीच्या.. त्या परमानंदाच्या मात्र उपस्थितीत आपले जीवन अगदी सहज संथ निर्मळ नदीसारखे वाहत आहे.. ह्या शांतीतूनच आपल्या जीवनात गरज प्रकट करतात.. त्यानंतर विचार देवून प्रार्थना करवून घेतात.. त्यानंतर त्या कर्म संकेत देत.. त्या कर्मासाठी भावनेचे बळ देतात.. आणि त्यांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करतात.. शेवटी हि परमशांती हे सर्व आपल्यातच विलीन करत आहे.. आणि पुन्हा नवीन प्रकट करत आहे.. हा खेळ समजतो.. आणि ह्या खेळात आपणही आनंदाने सहभागी होतो.. आनंदी घटना तर कृपा वाटतातच पण पूर्वी ज्या घटना दु:ख देत होत्या त्यासुद्धा आता कृपा वाटतात.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्रीगुरू समर्था !! मी अज्ञानी आहे.. अडाणी आहे.. मला काही मोह मायेची जड भाषा समजत नाही.. जसे एखादे बाळ आपल्या आईकडे हट्ट करते.. अगदी तसे तु माझी आई आहे आणि ह्या मुळेच माझ्या जीवनात जशी गरज येते.. तसे मी तुझ्याकडे हक्काने मागत असतो.. आणि हे आई !! तु सुद्धा तुझ्या बाळाचे लाड पुरवते.. पण आता हे गुरुराया !! मला तुझ्या अनन्य भक्तीच्या वरच्या वर्गात प्रवेश दे… तुझ्याकडे काय मागायचे.. कसे मागायचे ह्याचा विवेक दे..!! ह्या तुझ्या संसारिक खेळाचे कोडे उलगडवु दे..!! हे समर्था !! तु माझा सर्वस्व आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






