आपले स्वामी बोलतात….. “ अरे.. ओ हड्डी लेके जाव !! ” स्वामींवर असलेल्या विश्वासाच्या बळाने.. त्याच्या मनात असलेल्या पवित्र – अपवित्र – सोवळे – ओवळे – विटाळ आदी पूर्व धारणांवर विजय मिळवला..

Jul 30, 2021

स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य होत्या.. स्वामींनी जे जे चमत्कार केले ते खरोखर बुद्धीच्या पलीकडील होते.. आणि जेव्हा कोणी समस्याग्रस्त अशा अतर्क्य लीलांचे श्रवण करत.. सहाजिकच त्याच्या मनात स्वामींच्या सामर्थ्याबद्दल असलेला विश्वास दृढ होत.. आणि इतरांप्रमाणे माझी ही समस्या निश्चितच दूर होईल हि निश्चिंतता त्याला येई…असो. असेच एकदा एक दारिद्र्याने पिडलेला गृहस्थ आपले दारिद्र्य दूर व्हावे हि इच्छा मनात ठेवून अक्कलकोट येथे आला… स्वामींच्या अतर्क्य लीलांचे श्रवण केल्याने.. आपले दारिद्र्य सुद्धा नक्कीच दूर होईल ह्या दृढ विश्वासाने तो अक्कलकोट येथे राहू लागला.. मग जिथे स्वामी जातील तिथे तो जात.. पडेल तो सेवा करत.. आणि तासनतास बाजूला हात जोडून उभा रहात.. असा दिनक्रम भरपूर दिवस सुरु होता.. असेच एके दिवशी स्वामी महाराजांची स्वारी हरीजनांच्या वस्तीवर होती.. तेथे असलेल्या हाडांच्या ढिगा-यावर स्वामी बसले.. त्या वेळेला हा गृहस्थ नित्यक्रमा नुसार तेथे हात जोडून उभा राहिला.. भरपूर वेळ झाला तो हातच जोडून उभा होता.. आता स्वामींमाऊलीला त्याची द्या आली.. स्वामींनी त्याच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले..“ अरे.. ओ हड्डी लेके जाव !! ”. स्वामींनी असेल बोलताच.. त्याला क्षणभर काहीच समजले नाही.. आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या मनात विचार आला कि , आपण ह्या अपवित्र हाडांना कसे शिवावे.. परंतु हा स्वामी हुकुम आहे.. आणि स्वामी हुकुम प्रमाण म्हणून त्याने त्यातील एक हाड कसेबसे उचलले आणि आपल्या झोळीत ठेवले.. त्या नंतर पुन्हा तो हात जोडून उभा राहिला.. उभा राहिल्या नंतर स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले “ आप जाव.. कायकू खडे है ? ”. हि स्वामी आज्ञा होताच तो निघाला.. रस्त्याने जातांना एक आश्चर्य घडले.. त्याची झोळी एकाएकी जड वाटू लागली.. आणि स्वामी भक्त हो !! उघडून बघतो तर काय त्यात त्या हाडाचे सोने झाले होते.. स्वामींची हि अतर्क्य लीला बघून त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.. स्वामी आई आहे.. स्वामींना तिच्या बाळाची काळजी आहे.. ह्या अनन्य भक्तीच्या भावनेने तो ओतप्रोत भरून गेला आणि त्याने जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||

आजची स्वामी लीला खरोखर प्रेरणा देणारी आहे.. आजच्या स्वामी लीलेतून स्वामी महाराज पुन्हा आज आपणास आजच्या पिढीसाठी प्रार्थना- कर्मसंकेत आणि येणारे फळ कसे ग्रहण करायचे.. ह्याची कला शिकवत आहेत.. स्वामी हेच सांगत आहेत कि, जेव्हा आपण मन:पासून निरंतरतेने प्रार्थना करतो.. त्या प्रार्थनेचे फळ आपल्याला भेटतेच.. फक्त ती प्रार्थना अतिशय हृदयाच्या तळापासून आणि अतूट अभेद्य विश्वासाने केलेली हवी.. बघा !! आजच्या लीलेत तो गृहस्थ तळमळीने स्वामींना निरंतरतेने प्रार्थना करत आणि स्वामींच्या समोर मात्र हात जोडून उभा रहात.. ह्या प्रसंगातून प्रतिकात्मकरित्या स्वामी आपणास हेच सांगत आहेत कि, आपल्याला आपल्या प्रार्थनेत निरंतरता ठेवायची आहे.. आणि प्रार्थना करताच.. आपल्याला ग्रहणशील बनायचे आहे.. ग्रहणशील म्हणजे आपल्याला आपल्या मनाल शांत ठेवायचे आहे.. जर आपल्या मनात नकारात्मक तणावाच्या भावना येवू लागल्या तर त्या मनाला प्रेरणा द्यायची आहे.. बघा !!आजच्या लीलेत तो गृहस्थ सतत स्वामींच्या सानिध्यात असल्याने.. नित्य होणाऱ्या चमत्कारिक लीलांमुळे तो सहज त्याच्यातील नकारात्मक मनावर विजय मिळवत असेल.. परंतु आज आपल्याला “मी स्वामींचा बाळ आहे.. ब्रम्हांडातील सर्वोच्च शक्ती माझ्या पाठीशी आहे.. माझे चांगलेच होत आहे.. सतत जिंकन हा माझा स्वभाव आहे.. ” अशी स्वामीं प्रेरणादाई बोध वचन उच्चारून.. स्वामी लीलांचे वाचन मनन चिंतन करून.. आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर विजय मिळवायचा आहे.. कारण जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा मनाच्या पलीकडील स्वामी चैतन्य आपणास जे जे कर्म संकेत देत आहेत ते स्पष्ट समजात.. !! स्वामी भक्त हो !! पण हे होत असतांना कधी कधी एक गडबड होते.. ती अशी कि, आपल्यातील मन हे जुन्या सवयी वा संस्कारांनीच कार्य करत असते.. ते घडणाऱ्या घटने बद्दल काहीतरी पूर्वानुमान लावत असते.. आणि त्या मुळे स्वामींनी दिलेल्या कर्म संकेतांसाठी लागणारे कर्मबळ कमी पडते.. आणि त्यानंतर आपण त्यावर कृती करायची किवां नाही अशी संभ्रम अवस्था तयार होते… जसे आजच्या लीलेत स्वामींनी त्या गृहस्थास “हाड उचलण्यास सांगितले”.. परंतु त्याच्यातील अनन्य भक्तीनच्या बळाने.. स्वामींवर असलेल्या विश्वासाच्या बळाने.. त्याच्या मनात असलेल्या पवित्र – अपवित्र – सोवळे – ओवळे – विटाळ आदी पूर्व धारणांवर विजय मिळवला.. आणि ह्या भक्तीच्या शक्तीने स्वामी हुकुम म्हणून त्याने ते हाड उचलले.. स्वामी भक्त हो !! अगदी तसेच आपल्याला जे जे कर्मसंकेत येतील त्या कर्मांना अनन्य भक्तीचे बळ द्यायचे आहे.. अतूट अभेद्य श्रद्धेचे बळ द्यायचे आहे.. आपल्याला नि:शंक होऊन कार्य करायचे आहे.. हे कर्म म्हणजे स्वामी हुकुम आहे.. हे कर्म म्हणजेच स्वामी सेवा आहे.. ह्या भावनेने ते करायचे आहे.. बघा..!! जसे आजच्या लीलेत हाडाचे सोने झाले.. अगदी तसे त्या नंतर आपल्याला जे फळ येईल ते सोनेरी फळ असेल.. यात तिळमात्र शंका नाही..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या…“ हे समर्था !! तु आम्हा मानवांना विचार शक्तीचे वरदान दिले.. जसे एका बीजात संपूर्ण जंगल निर्माण करण्याची संभावना असते.. अगदी तसे मात्र एका विचारात ‘संपूर्ण आनंदी जीवन’ अभिव्यक्त करण्याची संभावना आहे.. पण हे स्वामी आई !! त्या विचाराला जर भावनेचे बळ नसेल तर तो विचार म्हणजे जणू काही हवा नसलेल्या फुग्यासारखा आहे.. हे परमपित्या !! आम्हा स्वामी भक्तांचे भाग्याच आहे कि , तु आमच्या मनात आगवूपणे ब्रम्हांडातील सर्वोच्च शक्तिशाली अनन्य भक्तीची भावना दिली.. अतूट अभेद्य विश्वासाची भावना दिली.. ह्या भावनेच्या शक्तीनेच.. तु अशक्य हि शक्य करतोस.. आमचे जीवन सोनेरी करतोस.. हे कृपेच्या सागरा !! ह्या तुझ्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद स्वामी ! अनंत कोटी धन्यवाद !! अनंत कोटी धन्यवाद !!! ”

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News