शेमारू मराठीबाणा वाहिनीवर विनोदी बॉलीवूडपटांची मराठमोळी मेजवानी ; ऑगस्ट महिन्याच्या सलग ३ रविवारी या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आनंद

Jul 31, 2021

नाशिक :  शेमारू मराठीबाणा वाहिनीने बॉलीवूडच्या कॉमेडी चित्रपटांचा अस्सल फिल्मी नजराणा प्रेक्षकांसाठी आणला आहे. मनोरंजनाला आता भाषेची अट नाही, आणि म्हणूनच बॉलीवूडचे गाजलेले तुफान विनोदी चित्रपट प्रेक्षकांना शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर आपल्या मराठी भाषेत पाहता येणार आहेत. त्यामुळे हास्याचा आणि आपल्याच भाषेत चित्रपटाचा आनंद घेण्याचा हा डबल बुस्टर प्रेक्षकांचे ‘पैसा वसूल’ मनोरंजन करणार हे नक्की.ऑगस्ट महिन्याच्या सलग ३ रविवारी या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे. रविवार १ ऑगस्टला वेलकम (‘एक झिंगाट कॉमेडी’), रविवार ८ ऑगस्टला ‘फिर हेराफेरी (‘पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’) आणि रविवार १५ ऑगस्टला ‘भागमभाग‘ (‘राडा झाला रे’) असे ३ लोकप्रिय चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. पाहता येतील. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या या चित्रपटांच्या निमित्ताने, प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजाची जादू मराठी मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आता बॉलिवूडचे तारे आपल्याला मराठीत हसवणार असल्याने हास्याचा धमाका प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक असेल त्यासाठी ऑगस्टचे तीन रविवार राखून ठेवत ‘बॉलीवूड धमाका’ मधील हास्याची बरसात अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हावे.

प्रसारण – रविवार १ ऑगस्ट, रविवार ८ ऑगस्ट आणि रविवार १५ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News