आपले स्वामी बोलतात…“ अरे..आम्ही सोनवड्यास स्नानास जातो आहे..!! ” आजच्या लीलेत रामकृष्णरावांची पत्नी अन्नपूर्णाबाई क्षयरोगाने अशक्त झालेली होती.. आणि त्यामुळे सहाजिकच रामकृष्णरावांचा आत्मविश्वास कमी झाला होता..

Aug 4, 2021

|| स्वामी लीला ||
स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज आपली आई आहे.. आपण स्वामींचे बाळ आहोत.. स्वामी आपली सतत काळजी घेत असतात.. आणि ह्याची प्रचीती प्रत्येक स्वामी भक्तास येत असते.. मागील एका स्वामी वाणी (भाग 3) मध्ये रामकृष्णरावांस पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून स्वामी सुताच्या मठात जावून सेवा करण्याचा आदेश दिला होता.. आणि त्या उभयतांनी अतिशय अनन्य भक्तीच्या भावनेने त्या आदेशाचे पालन केले.. त्या नंतर त्यांस अनुभव आला.. त्यांची सेवा फळास आली.. रामकृष्णराव ह्यांची पत्नी गरोदर राहिली.. आता तिला पाचवा महिना सुरु झाला होता.. रामकृष्णरावांनी पत्नी अन्नपूर्णाबाईस कोकणातील सोनवडे येथे माहेरी पाठवण्याचे ठरविले.. परंतु त्यांची पत्नी कमालीची अशक्त होती.. तिला क्षयरोग झालेला होता.. म्हणून ‘ एकाचे दोन जीव कसे.. निर्विघ्नपणे होतील..!! ’ अशी त्यांना काळजी लागली.. परंतु त्यांचा स्वामींवर अतूट अभेद्य विश्वास होता.. स्वामींच्या लीला अगाध आहे.. आता आपण त्या सुदिनाची वाट बघावी.. असे स्वतःच्या मनाला समजावून सांगत ते शांत रहात..!! बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले.. आता अन्नपूर्णाबाईंची प्रसूती कधीही होऊ शकते.. स्वामी भक्त हो !! अचानक एके रात्री रामकृष्णरावांस स्वप्न पडले.. आणि स्वप्नात स्वामी महाराज आले.. आणि बोलले.. “ अरे.. आम्ही सोनवड्यास स्नानास जातो आहे..!! ”. दुसरे दिवशी सकाळी रामकृष्णरावांस उठले आणि रात्री पडलेल्या स्वप्नामुळे त्यांना काळजीच लागली.. “ हे स्वप्न म्हणजे काहीतरी दुश्चिन्ह आहे.. आता आपल्याला पुत्राचे मुख तर नाही.. पण पत्नीतरी दृष्टीस पडते कि नाही..!! ” अशी नकारात्मक बडबड त्यांच्या मनाने सुरु केली.. आणि त्यांची काळजी आणखीच वाढून गेली.. परंतु स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज अशक्य शक्य करतात.. ज्या दिवशी रामकृष्णरावांस स्वप्न पडले त्याच दिवशी पहाटे रामकृष्णरावांची पत्नी अन्नपूर्णाबाईस मुलगा झाला.. आणि ह्या आनंदाच्या बातमीचे पत्र बरोबर चार दिवसांनी रामकृष्णरावांस आले.. अन्नपूर्णाबाईचे वय पस्तीस होते.. त्यात क्षयरोग.. परंतु उभयतांच्या अनन्य भक्तीचा स्वामींनी स्वीकार केला.. आणि त्यांना अग्निसारखा तेजस्वी मुलगा झाला…!! स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून उभयतांस स्वामींच्या लीला समजल्या.. प्रचंड स्वामी बळ पाठीशी !! नित्य आहे रे मना !!! ह्याची त्यांना प्रचीती आली..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणास खूप छान समज देत आहेत.. बघा !! जसे आजच्या लीलेत रामकृष्णरावांची पत्नी अन्नपूर्णाबाई क्षयरोगाने अशक्त झालेली होती.. आणि त्यामुळे सहाजिकच रामकृष्णरावांचा आत्मविश्वास कमी झाला होता.. त्यांचे चंचल मन सतत त्यांस कसे होईल..? काय होईल..? हा अविश्वास निर्माण करत होते.. हि भीती निर्माण करत होते.. स्वामी भक्त हो !! स्वामी आपले गुरु आहेत… ते सतत प्रेरणा देत असतात.. जेव्हा रामकृष्णरावांच्या मनात अविश्वास निर्माण झाला.. त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढवण्यासाठी स्वामीनी स्पष्टपणे “ अरे.. आम्ही सोनवड्यास स्नानास जातो आहे..!! ” असे बोलून त्यांस हाच आधार दिला कि, काळजी नको करू सर्व व्यवस्थित होईल.. मी स्वतः कर्ता करविता आहे.. परन्तु जसा विश्वास तशी दुनिया.. ह्या स्वामींच्या कायद्याप्रमाणे जर माणसाच्या मनात जेव्हा अविश्वासाने वा भीतीने असते.. तेव्हा त्यास बाहेर सुद्धा तसाच अनुभव येतो.. आणि अगदी असेच रामकृष्णरावांच्या बाबतीत घडले.. स्वामीनी आधार देवून सुद्धा त्यांस वाटले कि, हे स्वप्न म्हणजे अपशकून आहे.. वा काहीतरी विपरीत घडणार आहे.. स्वामी भक्त हो !! परंतु तुला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल (स्वामी वाणी 3) हि स्वामींची वाणी होती.. ती सत्यच होणार.. आणि त्या प्रमाणे स्वामींनी त्यांना अनुभव दिला सुद्धा…!! स्वामी भक्त हो !! आजही आपल्या जीवनात असेच घडते आहे.. स्वामींनी आपल्याला “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!! ” अभय वचन दिलेले आहे.. परंतु दैनदिन जीवन जगत असतांना जेव्हा जेव्हा विपरीत परिस्थिती येते.. तेव्हा रामकृष्णरावांसारखे आपले मन खचून जाते.. आणि सतत नकारात्मक बडबड करू लागते.. आणि आपल्या भोवती नकारात्मक परिस्थिती आकर्षित करते.. आणि विशेष म्हणजे जसे वरील लीलेत रामकृष्णरावांस स्वामींचा सकारात्मक संदेश समजला नाही.. अगदी तसे आपणास सुद्धा स्वामींचे संदेश.. स्वामी हुकुम.. स्वामींचे कर्मसंकेत समजत नाही.. इतकेच नव्हे तर कधी कधी आपण इतके हतबल होतो कि, आपण संकटाना शरण जातो.. आणि प्रयत्न करण्याची आटापिटाच बंद करतो.. आणि अपयशाला आमंत्रित करतो.. स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेतून बोध घेता.. आज आपणास आजच्या पिढीसाठी स्वामी हाच संदेश देत आहेत कि, स्वामीना आपल्या क्षणोक्षणाची चिंता आहे.. स्वामी आई आपली सतत काळजी घेत आहे.. स्वामीनी आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे.. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येवू द्या.. मन काहीही नकारात्मक बोलू द्या.. त्याला स्पष्ट सांगायचे आहे कि , “ अरे मना ..!! माझे स्वामी अनंत कोटी ब्रम्हांडाचे महाराजे आहे.. मी त्यांचा बाळ आहे.. आणि त्यांनी मला ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे अभय वचन दिलेले आहे.. हे मना..!! तु कितीही नकारात्मक बडबड कर.. पण मी संकटांसमोर गुडघे टेकवणार नाही.. हृदयात अनन्य भक्तीची भावना.. अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून.. आणि माझे प्रामणिक कर्म करत राहणार.. आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार.. कारण मी स्वामींचा बाळ आहे.. स्वामी माझी आई आहे !!”. स्वामी भक्त हो !! ह्या स्वसंवादाने बघा काय चमत्कार घडतील.. आपले नकारात्मक मन तर शांत होईल.. पण ते सुद्धा स्वामींचे अनन्य भक्त बनेल आणि आश्चर्याने स्वामीचे गुणगान गाईल.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तु अनंत कोटी ब्रम्हांडाचा मालक आहेस.. आम्ही तुझे बाळ आहोत.. तु आमची सतत काळजी करतोस.. संकटातून वाचवतोस.. आणि भिऊ नकोस मी तुझ्या सतत पाठीशी आहे ह्याचा अनुभव देतोस.. हे ब्रम्हांडनायका !! तुला अनंत कोटी धन्यवाद !! अनंत कोटी धन्यवाद स्वामी !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News