जेव्हा आपण आपले स्वत:चे नवीन घर बांधतो अथवा विकत घेता तेव्हा त्या वास्तुचे महत्वाचे म्हणजे ईशान्य कोन, स्वयंपाकघर, संडास व बाथरुम या गोष्टींना विशेष महत्व दिलेले आहे.कारण वास्तुदेवताचे तोंडाची सुरुवात ही ईशान्य कोणातून होत असते त्यामुळे वास्तुशास्त्रात ईशान्य कोनाला विशेष महत्व आहे. घरातील मंडळी जेव्हा जेवण बनविते तेव्हा त्या जेवणावर जे संस्कार घडविले जातात तेव्हा त्या त्या दिशेतील आकर्षित बलातून (जेवणातून) सदस्याला ऊर्जा मिळत असते. त्यामुळे घरातील परिवाराचे आरोग्य हे त्याच्या खाणपाणाच्या ऊर्जेवर अवलंबून असते.चुकीच्या ठिकाणी जर घरातील स्वयंपाकघर बांधलेले असेल तर त्याचे अनेक वाईट परिणाम जातकाला भोगावे लागतात.
स्वयंपाकघर घरातील स्त्रीमंडळीचीं सर्वात आवडतीची जागा असते. परिवारातील इतर सदस्यांपैकी सर्वात जास्त वास्तव्य स्वयंपाकघरात करणारी स्त्री असते. त्यामुळे स्वयंपाकघराची बनावट ही घरातील स्त्रीच्या आवडीनिवडीवर बनविली जाते. हे सगळे असतांना वास्तुमध्ये स्वयंपाकघर योग्य दिशेला बांधण्याचे नियम दिलेले आहे.
वास्तुशास्त्रानुसार कसे असावे स्वयंपाकघर ?
1) वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघर दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय कोनात बांधणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. काही कारणास्तव जर ते बांधणे शक्य नसेल तर विकल्प म्हणून उत्तर-पश्चिम दिशा निवडू शकतात.
2) वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघर चुकूनही पूर्व दक्षिण पश्चिम दिशेला निवडू नये.त्याचबरोबर उत्तरेकडे सुध्दा स्वयंपाकघर बांधण्याकरीता मनाई केलीली आहे.
3) पिण्याचे पानी उत्तर पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते.
4) स्वयंपाकघरात काळे रंगाचे ग्रेनाईट वापरु नये.त्याऐवजी महरुन किंवा सफेद रंगाचे स्टोन वापर करु शकतात.
5) जेवण बनवितांना पूर्व दिशेकडे तोंड करुन जेवण बनविणे चांगले आहे,कारण ही दिशा वास्तुशास्त्रात महत्वाची व शुभ मानली जाते.
6) किचनमधील फ्रिज ठेवायचे झाल्यास नार्थ-वेस्ट, उत्तर-पश्चिम दिशेला ठेवता येतो.
7) किचनाचा गॅस आणि पिण्याचे पाणी जवळजवळ ठेवलेले नसावे.कारण आग आणि पाणी हे एकमेकांचे नैसर्गिक शत्रू आहे.
8) किचनाला निळा किंवा आकाशी रंगाचा वापर नसावा
9) किचन अग्नीतत्वाशी निगडीत असल्यामुळे किचनाचा रंग लाल ठेवणे चांगले असते.
10) ज्या घरातील किचन आणि बाथरुम एकाच रेषेत बांधलेले अथवा एकत्रित असते, तेथील सदस्य नेहमी आजारी राहण्याची शक्यता असते.यासाठी उपाय म्हणून बाथरुम मध्ये नेहमी एक वाटी मिठ भरुन ठेवावे व ते दर 15 दिवसांनी बदलत जावे.
11) किचन मधील एक्जोस्ट फॅन हा पूर्वकडे बसविणे चांगले मानले जाते.किंवा उत्तरेकडील भींतीतदेखील बसवू शकतात.
12) किचन मधील वापरण्यात येणारी वस्तु,धान्य, मसाले,दाळीसाळी, तेल, पीठ आणि इतर वस्तु सामुग्री,भांडे, इत्यादी ठेवण्याची जागा पश्चिम किंवा दक्षिण ठेवावी.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तुची स्टायीलस/फरशी अशी आहे का ?
अत्याधुनिक युगात वास्तुच्या प्रत्येक संरचनेला महत्व दिलेले आहे. अगदी शयनकक्ष,बैठककक्ष,स्टोर रुम,...


