वास्तुशास्त्रात वास्तु निर्माण करतांना अनेक लहान-सहान गोष्टींची काळजी घेण्याचे सांगितलेले आहे. यासर्वांचा आपण जर अभ्यास केला तर एक उत्तम वास्तुचे निर्माण करुन सुखी जीवन जगता येते. आज आपण माहिती बघणार आहोत वास्तुतील फरशी संबधि.फरशी वास्तु रचने नुसार वापरली तर घरातील अनेक वाईट प्रभाव कमी करतात येतात.
घरा समोरील मुख्य प्रवेशद्वारावरील तुटलेली पायरी सुखशांती आणि धनसंपत्ती वाढविणारी ऊर्जो थांबविते. घरात किंवा दुकान अशी स्थितीत असेल तर त्वरीत ते दुरुस्त करावे.
घरातील भींतींचा रंग डार्क असेल तर फर्शी सफेद किंवा फिकट रंगाची मार्बल वापरुन दोघांचे समतुल्य साधता येते.यामुळे घरातील कलर बैलेंस करुन घरातील अनेक वास्तुदोषां पासून बचाव होतो.
शक्यतो घरातील जिने लाकडी पायरीचे असावे.असे केल्याने शुभ मानले जाते. जिनेमुळे पहिला व दुसरा मजला जोडत असतो त्यामुळे लाकडी पायरी वापरल्यास संपन्नता आणि सम्रध्दितीत वाढ होते.
घर किंवा दुकान दक्षिण- पश्चिम भागात पिवळा स्टोनचा वापर करावा.या दिशेत थोडे प्रमाणात जरी पिवळे दगड वापरले तरी धन आगाम होत राहते.
घरात किंवा दुकानातील दक्षिण दिशेत लाल रंगाचे नैसर्गिक दगड किंवा लाल विटांचे काही तरी काम करावे असे केल्याने व्यक्तीच्या मान-सन्मानात वाढ होते.
घरातील किंवा दुकानातील कार्पेट नेहमी लाईट रंगाची वापरावी. गर्द रंगाची वापरल्यास नैगेटिव्हीटी वाढते.
नैसर्गिक स्टोन मध्ये पॉजिटीव एनर्जी आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते.त्यामुळे सिंथेटिक स्टोन पेक्षा नैसर्गिक स्टोनचा वापर घरात जास्त करावा.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तुची स्टायीलस/फरशी अशी आहे का ?
अत्याधुनिक युगात वास्तुच्या प्रत्येक संरचनेला महत्व दिलेले आहे. अगदी शयनकक्ष,बैठककक्ष,स्टोर रुम,...


