आपले स्वामी बोलतात …. “अरे..त्यावेळेला तुम्ही कोठे होता..? तुम्ही तर दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरत होता..!! आणि वाटेल तसे मन:प्रमाणे वर्तन करण्याचा कार्यक्रम सुरु होता.. हाच तुमचा परमार्थ का ? ”

Aug 22, 2021

|| स्वामी लीला ||
रामकृष्ण बुवा माटे म्हणून एक कीर्तनकार होते.. ते स्वामींची कीर्ती ऐकून दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले.. आपण फार विद्वान आहोत.. ह्याचा त्यांना अहंकार होता.. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर स्वामींचे बोलणे चालणे वगैरे बघून त्यांना जरा विचित्रच वाटले.. त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले.. आणि काही वेळाने स्वामींच्या समोर कीर्तनाचा कार्यक्रम सुरु केला.. कीर्तन सुरु असतांना स्वामींच्या आचरणाबद्दल ते टोचून बोलू लागले.. बोलता बोलता ते बोलले कि, “ एवढे अवतारी शंकराचार्य.. ते सुद्धा लोकसंग्रह करण्यासाठी वर्णाश्रमधर्माप्रमाणे कर्म करत असतात..” स्वामी भक्त हो !! माटे बुवांनी असे खोचकपणे बोलतात.. स्वामी महाराज लागलीच उग्र आवाजात बोलले “ अरे.. त्यावेळेला तुम्ही कोठे होता.. तुम्ही तर दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरत होता.. आणि वाटेल तसे मन:प्रमाणे वर्तन करत होता.. हाच तुमचा परमार्थ का ? ”. अशी स्वामींची वाणी होताच माटे बुवांस पश्चताप झाला.. कीर्तन आटोपल्या नंतर जेव्हा ते खाली बसले.. तेव्हा तेथे उपस्थित एक संन्यासी सत्पुरुष त्यांच्या जवळ गेले.. त्यांनी माटेबुवांच्या मनात स्वामींच्या बद्दल असलेल्या द्वैताबद्दल शंकेचे निरसन केले.. स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रम्ह आहेत.. त्यांच्या बद्दल अभिमानाने द्वैतबुद्धीने असे भाषण करने हे परमार्थात शोभत नाही अशी पुष्कळ समजावून सांगितले.. त्या सत्पुरुषांचे भाषण ऐकून माटे बुवांस पश्चताप झाला.. आपल्याकडून महाघोर पाप घडले आहे.. म्हणूण त्यांनी सर्व प्रथम त्या संन्यासी सत्पुरुषाचे पाय धरले.. आणि त्या नंतर स्वामींच्या चरणी अनन्य भावे शरण जावून “ मी महाअपराधी आहे.. मला क्षमा करा..!! ” अशी विनवणी केली.. पुढे अक्कलकोट मध्ये काही दिवस राहून त्यांनी स्वामींच्या लीला बघितल्या.. अतर्क्य लीला बघून त्यांची भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली.. स्वामी महाराज कोणी साधे सुधे नसून प्रत्यक्ष परब्रम्ह आहेत ह्याची त्यांस खात्री पटली.. !! त्या नंतर ते दरवर्षी आठ पंधरा दिवस अक्कलकोट मध्ये येत.. कीर्तनरुपी सेवा रुजू करत.. असेच एके वर्षी सात दिवसांचा भागवत सप्ताह सुरू झाला.. आणि विशेष म्हणजे असे पहिल्यांदाच वाचनात आले की, स्वामींनी सात दिवस सप्ताहात पूर्ण वेळ हजेरी लावली होती..!! त्या मध्ये एके दिवशी सप्ताह सुरू असतांना.. स्वामी महाराज उंच सिंहासनावर बसलेले होते.. बुवां अभंगाचे निरुपण देत होते.. निरुपण देता देता बुवा बोलले की, भवसागर पार करण्यासाठी कोणाचे चरण आम्हास तारतील.. त्याच वेळेला स्वामींनी त्यांचा उजवा पाय लागलीच पूढे केला.. स्वामी भक्त हो !! तेव्हा बुवांच्या हृदयात अनन्य भक्तीच्या भावनेचा संचारच झाला म्हणा.. त्यांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू येवू लागले.. आणि धावत जाऊन त्यांनी लागलेच स्वामींचे चरण आपल्या पोटाशी पकडले.. त्या नंतर स्वामींनी आपले डावे चरण खाली सोडले.. त्याच वेळेला बाळप्पा ह्यांनी दुसरे चरण आपल्या पोटाशी घट्ट पकडले.. हा सोहळा हजारो लोक बघत होते.. स्वामींच्या शाळेत आलेले माटेबुवा आणि त्यांच्यात झालेले परिवर्तन त्यातून त्यांच्यावर झालेली हि अनन्य भक्तीची कृपा बघून उपस्थित लोक सुद्धा भक्तीच्या अश्रूंनी ओलेचिंब झाले.. आणि सर्वांनी एकघोषात जयजयकार केला..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी लीलेत स्वामी महाराज स्वतःला विद्वान समजणाऱ्या मनाला कि, जे मन स्वतःला ज्ञानी समजते.. पण आचरण शून्य आहे.. अशा मनाला चांगलाच चपराक देत आहेत.. असे मन सतत समोरील व्यक्ती मध्ये चूक शोधत असते.. परंतु चूक शोधत असतांना आपणही तसेच आहोत ह्याकडे ते जाणीव पूर्वक दुर्लक्ष करते.. अशा मनाला स्वामी समज देत आहेत.. स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेत श्री माटेबुवाना स्वामीबद्दलचे अज्ञान असल्याने.. खोचक बोलणे केले.. परंतु तेथील एका सत्पुरुषाने स्वामीं काय आहेत हि समज दिली.. त्यानंतर माटेबुवांना पश्चाताप झाला.. त्यांच्यात स्वामी प्रेम जागृत होऊन.. ते स्वामींचे अनन्य भक्त बनले.. आणि ह्या भक्तीच्या शक्तीने त्यांनी त्यांचे प्रामाणिक कीर्तनरुपी कर्म करत.. ते ज्ञान आचरणात आणत.. शेवटी स्वामींच्या चरणी स्थान प्राप्त केले.. !! स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेचे मनन चिंतन करता.. आजच्या लीलेतून बोध घेता.. आपल्याला आपल्या नेहमी चुका काढणाऱ्या नकारात्मक मनाला प्रामाणिक आत्मपरीक्षण करत योग्य समज द्यायची.. त्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचे सांगायचे आहे.. जेव्हा आपण समोरील व्यक्ती मधील चुका शोधतो.. तेव्हा त्या चुका शोधण्याची आपली पात्रता आहे का? सवाल आपल्या बडबड करणाऱ्या मनाला करायचा आहे.. जसे आपण एखाद्याला उगीच ज्ञानी बनून आळशी म्हणतो.. तर खरोखर आपण आपल्यातील आळस दूर केला आहे का..? असा प्रतिप्रश्न करायचा आहे.. आणि हा प्रतिप्रश्न स्वामीच आपणास आजच्या स्वामी वाणीच्या निमित्ताने करत आहेत हि समज दृढ करायची आहे.. आणि त्यावर कार्य करत स्वामींच्या कार्या साठी पात्रतेचे शुद्ध मन तयार करायचे आहे.. एकदा कि आपले मन शुद्ध झाले.. कि कदाचित त्या नंतर आपण समोरील व्यक्तीला आळशी वा कामचुकार बोलू.. पण ते करुणेच्या पोटी बोलू.. त्याचे कल्याण व्हावे ह्या उद्देशाने बोलू.. जशी एखादी आई आपल्या बाळाला बोलते अगदी तसे.. पण सर्व प्रथम वरती सांगितल्या प्रमाणे आपल्याला शुद्ध व्हावे लागेल असो. थोडक्यात स्वामी आज आपणास आजच्या पिढीसाठी हाच बोध देत आहे कि, “ ज्ञान हे फक्त लोकांना उपदेश देण्यासाठी नाही तर स्वतःच्या जीवनात आचरणासाठी आहे.. जेव्हा आपण त्याचे आचरण करतो.. तेव्हा ते आपोआप प्रसाद रूपाने इतरांना वाटले जाते.. जेव्हा जेव्हा आपल्याला समोरील व्यक्ती मध्ये चूक दिसेल.. विकार दिसेल.. अवगुण दिसेल.. तेव्हा तेव्हा सर्वप्रथम असे खुशाल समजायचे कि स्वामींनी आपल्याला आत्मपरीक्षणाचा हुकुम दिला आहे.. आणि आपल्याला स्वत:ला प्रश्न विचारायचा आहे कि समोरील व्यक्तीला उपदेश देण्यापूर्वी खरोखर मी स्वत: ह्यातून मुक्त आहे का..? माझे आचरण शुद्ध आहे का..? आणि जर नसेल तर स्वामी भक्त हो !! स्वामी हुकुम म्हणून आपल्याला त्यावर कार्य करायचे आहे..!! आपले अंतर्मन शुद्ध करायचे आहे !! ” स्वामी भक्त हो !! त्या नंतर जसे माटेबुवा स्वामी चरणी समर्पित झाले आणि भवसागर पार करण्याच्या पात्रतेचे बनले.. अगदी तसेच आपले अंतर्मन शुद्ध होईल.. आणि आपणही स्वामींच्या चरणी विलीन होऊ…स्वामी आनंदात विलीन होऊ…!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “हे गुरुराया !! तु मला ज्ञान देतोस.. दररोज खूप छान शिकवतोस.. पण माझ्यातील जुने विकार.. सवयी.. तुझे ज्ञान आचरणात आणण्यासाठी अडथळा आणत असतात.. हे आई !! मला तुझी अनन्य भक्ती दे.. ह्या तुझ्या अनन्य भक्तीच्या शक्तीने.. माझ्यात इच्छाशक्ती जागृत होईल आणि अडथळे आणणारे विकार.. चुकीच्या सवयी विलीन होऊन.. तु दिलेले ज्ञान मी माझ्या जीवनात सहज उतरवेल.. आणि तुझी शिकवण आचरणात आणून.. असे जीवन अभिव्यक्त करेल कि, ज्याकडे बघितल्या नंतर सर्वांना फक्त तुझीच आठवण येईल.. तुझ्याच अनन्य भक्तीचा साम्राज्याचा प्रचार प्रसार होईल..!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

 

अजून बातम्या वाचा..

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर...

read more
देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

नाशिक : राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा जन्मदिवस राज्यात सगळीकडे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात...

read more
दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी...

read more
Breaking News