आपले स्वामी बोलतात ….“ काय म्हणता..!! दोन डोक्यांचा माणूस आला..!! ”

Aug 26, 2021

|| स्वामी लीला ||
एक भीमराव म्हणून स्वामींचा अनन्य भक्त होता.. त्याच्या डोक्यास मोठे आवळू होते.. त्या मुळे तो दिसतांना जरा विनोदी विचित्रच दिसे.. भरपूर दिवसांपासून तो स्वामींची अनन्य सेवा करत.. त्याचा एक नित्यक्रम होता.. तो आणि त्याचा मुलगा दररोज बागेत जावून टोपलीभर फुले आणत आणि स्वामींच्या चरणी वाहत.. त्याचे दिसणे जरा विचित्र विनोदी असल्याने बाकी सेवेकरी त्यांस थट्टेने ‘दोन डोक्याचा माणूस ’ म्हणून हाक मारत.. परंतु भीमरावांस ह्याचे वाईट वाटत.. त्याने अनेक वेळा स्वामींना बोलण्याचा प्रयत्न केला.. पण योग काही येत नव्हता.. असेच एके दिवशी स्वामीरायाची स्वारी आनंदात होती.. त्या दिवशी स्वामी आनंदात बागेत बसलेले होते.. तेव्हा नेहमी प्रमाणे भीमराव फुले घेवून येत होता.. तो येत असतांना बाकी सेवेकर्यांनी बघितले.. आणि थट्टेने बोलू लागले कि “अरे तो बघा !! दोन डोक्याचा माणूस आला..!! ” आणि हसू लागले.. हे बघून स्वामी सुद्धा बोलले “ काय म्हणता.. दोन डोक्यांचा माणूस आला..!! ” आणि मोठ मोठ्याने खदाखदा हसू लागले.. स्वामी भक्त हो !! स्वामींनी अशी थट्टा करताच.. आता भीमराव मात्र जास्तच नाराज झाला.. परंतु आजच हि संधी आहे असे समजून तो स्वामींना बोलला “हे स्वामी राया !! हे लोक मला हसतात तर हसू दे.. पण तुम्ही तर दीनदयाळ आहात.. भक्तवत्सल आहात.. आपल्या भक्ताचे व्यंग बघून ते व्यंग दूर करने आपल्या भक्त वात्सल्याचा धर्मच आहे.. आपण कृपया मला ह्या व्यंगापासून मुक्त करा.. आपण मला ह्या व्यंगातून मुक्त केले तर मला सांगा… लोक मला का हसतील..?”. स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. तिच्या बाळाचे हि व्याकुळतेची प्रार्थना ऐकून स्वामींना त्याची खूप दया आली.. परंतु स्वामी त्यावेळेला काहीच बोलले नाही.. !! परंतु पुढे एक चमत्कार घडला.. तो असा कि, त्या रात्री भीमराव झोपला असतांना.. प्रत्यक्ष स्वामी महाराज भीमरावाच्या स्वप्नात आले.. आणि स्वप्नात स्वामींनी त्याच्या डोक्यावर असलेल्या आवळु वरून हात फिरवला.. स्वामी भक्त हो !! स्वामी आई आहे.. तिच्या बाळ दु:खी असलेले तिला थोडेच बघवणार.. भीमराव जेव्हा सकाळी उठला तेव्हा.. त्याच्या डोक्यावर असलेले आवळू फुटून जवळ जवळ वीतभर डोक्याची कातडी लोंबत होती.. भीमरावने स्वामींनी स्वप्नात दिलेला वृत्तांत सर्वांना सांगितला.. आणि सर्वांना स्वामींच्या ह्या लीलांचे आश्चर्य वाटले.. परंतु डोक्यावर लोंबना-या कातडीचे काय? ती कशी बरी होणार ? हा प्रश्न आता पडलेला होता.. तेव्हा त्याने स्वामींना विनंती केली कि “स्वामी हे कातडे कापून टाकू कि अजून काय करू.. कृपया सांगावे..!! ”. भीमरावाची हि विनंती ऐकताच दयाघन स्वामींनी त्याला तीर्थ आणि विभूती त्या ठिकाणी लावण्याचा हुकुम दिला.. स्वामींचा हुकुम शिरसावंद्य म्हणून त्याने स्वामी हुकुमाचे पालन केले आणि काही दिवसांतच कातडे आपोआप सुकून गेले.. स्वामीचा हा चमत्कार बघून अक्कलकोटवासीय अचंबित झाले.. आणि सर्वांनी एक घोषात जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
स्वामीभक्त हो !! आजची स्वामी लीला खरोखर प्रत्येक स्वामी भक्तावर कृपाच आहे.. आजच्या लीलेतून स्वामी आपणास असंख्य बोध देत आहेत.. जेव्हा एखादे बाळ जन्माला येते ते अतिशय गोंडस असते.. ते प्रत्येकाला हवे हवेसे वाटते कारण तेव्हा ते स्त्रोता सोबत लयबध्द असते.. ते मुळात परमशांती परमानंदाच्या अनुभवावर असते.. परंतु जसे जसे ते मोठे होत जाते.. तसे तसे त्याचे मन द्वैतात अडकत जाते… ते सुख – दुःखाच्या जाळ्यात अडकत जाते.. त्याची बुद्धी ही द्वैत होते.. तो प्रत्येक घटना.. द्वैताच्या तराजूत तोलायला लागतो.. त्याच्यातील सहजतेची जागा.. त्याच्यातील विश्वासाची जागा.. अविश्वास .. शंका-कुशंका असलेले विचार घेतात.. स्वामी भक्त हो !! आजच्या लिलेत आज आपल्यासाठी आजच्या पिढीसाठी.. स्वामींनी उच्चारलेली ‘दोन डोक्याचा माणूस ‘ ह्या वाणीचा अर्थ म्हणजे असा माणूस की, ज्याचे मन द्वैतात अडकलेले आहे… ज्याचे मन जीवनातील प्रत्येक घटनेला शंका-कुशंकाच्या तराजूत तोलते आहे.. ज्याच्या मनात विश्वासाची जागा अविश्वासाने घेतली आहे.. जो प्रेम-आनंद-शांती सांसारिक वस्तू मध्ये शोधतो आहे.. आणि स्वामी भक्त हो !! जसे भीमरावच्या जीवनात अनेक हसणारी मंडळी पाठवून त्याच्याकडून व्याकुळतेची प्रार्थना करवून घेतली आणि शेवटी त्यावर कृपा करून त्याला दोन डोक्याच्या आजारातून कायमचे दु:ख मुक्त करून फक्त एक डोक्याचा माणूस बनविले अगदी तसे आजही स्वामी आपल्या जीवनात विविध घटना – प्रसंग ह्यांना निमित्त करून व्याकुलतेच्या प्रार्थना करवून घेत आहेत.. आपली पात्रता.. ग्रहनशीलता वाढवत असतात.. कारण स्वामींना आपल्याला ‘अंतिम एकम ’ ची समज द्यायची आहे.. आपण स्वामींचे अंश आहोत.. त्याचेच बाळ आहोत हि समज द्यायची आहे.. आपल्या मनाला सुख – दु:खाच्या पलीकडील स्थिर शाश्वत अवस्थेवर स्थिर करायचे आहे.. आपल्या बुद्धितील द्वैत घालवून चित्ताला हृदयातील अनन्य भक्तीवर स्थिर करायचे आहे.. म्हणजेच आपल्याला ‘मात्र एक डोक्याचा माणूस ‘ बनवायचे आहे… म्हणून स्वामी भक्त हो !! आपल्याला जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेत स्वामींचाच हात आहे.. हे बघण्याची दृष्टी विकसित करायची आहे.. आपल्या जीवनात जे जे काही घडते आहे.. ते मात्र आपल्याच कर्मांनी कसे आकर्षित झाले आहे.. हे बघण्याची दृष्टी विकसित करायची आहे.. आणि होणारी स्वामी कृपा ग्रहण करायची आहे..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तु माझ्या हृदयात आहेस.. मला तुझ्या ह्या हृदयातील असीम अनंत अवस्थेचे दर्शन दे.. माझ्या बुद्धीतील द्वैत घालव.. मला तुझ्या ‘एकम्’ तेचा अनुभव दे.. त्या अनुभवावर माझे चित्त स्थिर कर.. माझ्या डोळ्यासमोर तुझेच रूप निरंतर ठेव.. आणि मुखात तुझेच नाम घेत हाताने होणारे प्रत्येक कर्म तुझी सेवा होऊ दे… हे परमपित्या भक्तवत्सला !! तु दयाळू आहेस.. माझ्यावर स्थिर शाश्वत भक्तीची कृपा कर..!! तुला अनंत कोटी धन्यवाद !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

 

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News