हंगामा प्ले वर नवीन रोमँटीक कॉमेडी ड्रामा शो ‘अधांतरी’

Aug 26, 2021

 

मुंबई  :  हंगामा प्ले वर आज अधांतरी, या नवीन हंगामा ओरिजनलचे मराठी आणि हिंदी भाषेतून लॉन्च झाले. या रोमँटीक कॉमेडी ड्रामा शो मध्ये मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजनचे सुपरस्टार सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे यांच्यासोबत विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर झळकणार आहेत. हे कथानक काहीसे विचित्र तरीही पटण्यासारखे, प्रचंड ताकदीचे आहे. कथेत लाँग डिस्टन्स नात्यात राहणारे प्रेमळ जोडपे असून काही नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे त्यांना बराच काळ एकत्र राहावे लागते. या शो ची निर्मिती गणराज असोसिएट्स यांना केली असून याचे दिग्दर्शन जीत अशोक यांनी केले आहे. मुग्धा (पर्ण पेठे) आणि मुकुल (सिद्धार्थ चांदेकर) हे जणू काही एकमेकांसाठीच जन्माला आलेले जोडपे वाटावे. मात्र त्यांच्यात एक धागा विचित्र आहे. त्यांनी एकमेकांसोबत आठवड्यापेक्षा अधिक काळ व्यतीत केलेला नाही – लाँग डिस्टन्स नात्यात राहण्याचा एक साईड-इफेक्ट असावा. हे जोडपं लोणावळ्याला रोमँटीक सहवासाकरिता एकत्र असताना काही विचित्र आणि अगोदर न अनुभवलेल्या स्थितीतून जावे लागते. यापूर्वी या दोघांनी असा अनुभव एकत्र घेतलेला नसतो त्यांना फार काळ एकमेकांसमवेत राहण्याची सवय नसते. याचा अर्थ त्यांच्यातील असुरक्षितता उघडी पडणार, एकमेकांची दडवलेली गुपिते फुटणार अशा स्थितीत परस्परातील प्रेम जिवंत ठेवण्याची धडपड करण्याचे आव्हान दोघांसमोर उभे राहते. परंतु केवळ प्रेम पुरेसे असते का? की नातेसंबंध घट्ट होण्यासाठी अन्य काही महत्त्वाचे घटक आवश्यक ठरतात?या शो बद्दल बोलताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, आमचे ताजेमराठी ओरिजनल शो आधुनिक काळातील नातेसंबंधांचा अभिनव दृष्टिकोन उलगडतात आणि त्यात धुरंधर कलाकारांचा समावेश असतो. हा शो अस्सल आणि प्रामाणिक असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं आम्हाला ठामपणे वाटतं.या शो  विषयी अधिक बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला कीअधांतरी  मध्ये अनेक मानवी भावनांना सुंदर पद्धतीने कैद करण्यात आले. हे एक निराळ्या अंगाचं कथानक असून ते अस्सल परिस्थितीवर बेतलेलं आहे. आपल्यापैकी बरेच जण कधीतरी या स्थितीतून गेले असतील. त्याला विनोद आणि नाट्याची झालर लाभल्याने ते फारच मनोरंजक झालं आहे. प्रेक्षकांची शो ची कथा आणि व्यक्तिरेखे सोबत नाळ जुळेल ही आशा वाटते.पर्ण पेठे सांगते कीमी या शो  मध्ये साकारत असलेली मुलगी पुढचा-मागचा फारसा विचार करणारी नसली तरीही मनानं सच्ची आहे. तिच्या जीवनात महत्त्वाची उणीव आहे. तरीही ती स्वत:च्या सकारात्मक दृष्टिकोनाने जमवून घेते. आजच्या पिढीला ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटेल.आता अधांतरी हंगामा प्ले  वर स्ट्रीमसाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय हंगामा प्लेद्वारे ते एमएक्स प्लेयर, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही स्टीक, टाटा स्काय बिंज,  डिशस्मार्ट स्टीक, डीटू एच स्ट्रीम, आणि नेटप्लस सारख्या आयएसपीटीसीएल, वनप्लस टीव्ही, एलजी, आणि क्लाउडवॉकर सारख्या स्मार्ट टीव्हीवर पाहता येईल. कालांतराने फ्लिपकार्ट व्हिडिओवर देखील उपलब्ध होईल. त्याव्यतिरिक्त, हंगामा आणि शाओमीने हातमिळवणी केल्याने उपभोक्त्यांना हंगामा प्लेद्वारे मी टीव्ही वर हा शो पाहता येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर...

read more
देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

नाशिक : राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा जन्मदिवस राज्यात सगळीकडे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात...

read more
दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी...

read more
Breaking News