देशात पुर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणाची गरज

Aug 26, 2021

वाढते शहरीकरण,मोठया प्रमाणात जंगलतोड,दळणवळणाच्या अति प्रगती मुळे रस्त्यांची जाळे दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे आता जमिनीत पावसाचे पाणी जिरण्यासाठी कमी वाव मिळते त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरुन वाहत नदीला मिळते अल्पकाळात धरण व नदयांनापुर येत असल्याने देशातच काय पुराची समस्या संपुर्ण जगाला भेडसावू लागली आहे. देशात दरवर्षी विविधराज्यांमध्ये मोठया प्रमाणात पुर येत असल्याने केंद्र सरकारने याबाबत अभ्यास करुन स्वतंत्र यंत्रण व विभागाची निर्मिती करणे गरजेचे आहे. मागील महिन्यात महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मोठया प्रमाणात पुर आल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त तर झाले पंरतु अनेकांचे मुत्यू देखील झाले या घटनेला काही दिवस होत नाही तोच पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने बहुतांश भागात पुर आल्याने जनजीवन विकस्ळीत झाले. सध्याचे बदलते मौसमी वातावरणामुळे पावसाळा आत संपुर्ण ऋतुतील न राहता काही ठराविक दिवस व महिना राहिल्या पाउस पडण्याचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी हवामान विभागत स्वतंत्र पुर नियंत्रण कक्षाचे गरज आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News