दोषींवर कडक कारवाई करा

Jul 7, 2019

रत्नागिरी जिल्हयातील तिवरे धरण फुटल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. नुकत्याच दुरुस्ती केलेल्या हया धरणाला 34 दिवसांत फुटल्यामुळे निष्क्रष्ट काम केल्याचे बोलले जात आहे. राजकारण बाजुला ठेवून सर्वपक्षीयांनी दोषी व्यक्तीची सखोल चौकशी करुन पिडीतांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. शासनाने या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आदेश दिलेले असले तरी हे धरण एका पक्षाच्या आमदार यांच्या कंपनीने बांधले होते. मागील काही दिवसांपासून मुंबई सह कोकणात जोरदार पाउस पडत आहे. त्यामुळे मंगवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिवरे धरणाच्या जॅकवेल नजीक मोठे भगदाड पडले. पाण्याच्या प्रचंड लोंढयामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेली घरे वाहून गेली. ज्यांना धरण फुटण्याचा आवाज केला त्यांनी आपले कुटूंबातील व्यक्तींचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला पंरतु काही लोक झोपेत असल्यामुळे वाहून गेली. प्राथमिक माहितीनुसार 24 जण वाहून गेल्याचे समजते त्यातील 13 लोकांचे म्रतदेह भेटल्याचे एनडीआरएफच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित म्रतदेह शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. मुसळधार पाऊसामुळे मदत कार्याला अडचणी निर्माण होत आहे. शासनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी.

अजून बातम्या वाचा..

Breaking News