सच्चा पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Jan 6, 2022

मूकनायक, बहिस्कृत भारत, समता, जनता आणि समृद्ध भारत या नियतकालीकांची स्थापना करून तेजस्वी पत्रकारिता केली आणि त्यांच्या या युगपरिवर्तवादी पत्रकारितेने दलितांच्या, विमुक्त, भटके व बहुजनांच्या पत्रकारितेला प्रेरणा दिली आणि अशाप्रकारे ते युग परिवर्तनवादी पत्रकारितेचे शिल्पकार ठरले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया उभारला असला तरी त्याचा वेलू गगनावरती नेण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेने केले आहे.

राजकारणातील सर्वांना आपले हित जपण्यासाठी वृतपत्र एक सोपे माध्यम
म्हणून पुढे आले आहे. या माध्यमाला हाताशी धरून ठेवण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. वृत्तपत्र काढण्यामागे त्यांचा हेतू निव्वळ नफा व आपले चांगभले कसे करता येईल यावरच भर असतो. कोणत्याच पत्रकारला दुःखवायचे नाही असे त्यांचे धोरण असते. त्यामुळे एखादी घडणारी घटना कितीही सत्य असली तरी चालू धोरणी व हुशार राजकीय व्यक्ती जाहीरपणे बोलत नाहीत. मतलबी संधीसाधू संपादक देखील लिहत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संधीसाधू राजकीय बड्या व्यक्तींची व वृतपत्रांची तमा न बाळगता आपले वृत्तपत्र अस्पृशता व जाती प्रथाच्या विरुद्ध उभे केले. हजारो वर्षांपासून पशुवत जीवन जगणाऱ्या समाजास माणूस म्हणून उभा करण्याची सामाजिक जबाबदारी डॉ.बाबासाहेबांनी स्वीकारली.

त्यांनी आपल्या सामाजिक चळवळीला जनतेपर्यंत नेऊन अग्रलेखात म्हणतात, ‘आमच्या या बहिस्कृत लोकांवर होत असलेला व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी भूमीच नाही.

डॉ.बाबासाहेबांनी अत्यंत जबाबदारपणे व सडेतोडपणे आपला प्रत्येक अग्रलेख लिहिलेला आहे. मूकनायक, बहिस्कृत भारत, जनता ही पत्रे डॉ. बाबासाहेब यांची धारदार वार करणारी ठरली. डॉ. बाबासाहेब यांच्या बातम्याची कात्रणे सलग एकत्र करून महाराष्ट्र सरकारने 1984 मध्ये एक इंग्रजी संदर्भ ग्रंथ काढला तो साडे चारशे पृष्ठाचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॆ केंद्रीय मंत्री मंडळात कायदा मंत्री होते. एक अग्रगण्य नेते, लोकनेते व जागतिक कीर्तीचे पत्रकार होते. त्यांनी तेजस्वी पत्रकारिता केली. त्यांच्या या युग परीवर्तनवादी पत्रकारितेने दलितांच्या विमुक्त व भटक्याच्या आणि बहुजनांच्या पत्रकारीतेला प्रेरणा दिली आणि युग परिवर्तनवादी पत्रकारीतेचे शिल्पकार ठरले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया उभारला असला तरी त्याचा वेलू गगनावारी नेण्याचे काम डॉबाबासाहेबांच्या पत्रकारितेने केलेले आहे. राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त बाबा साहेबांना त्रिवार अभिवादन
.संकलन – संजय बोराळकर नाशिक

अजून बातम्या वाचा..

Breaking News