|| स्वामी लीला ||
स्वामी महाराजांच्या लीलांची ख्याती वाढत होती.. अनेक राजे महाराजे स्वामींना आपल्या राज्यात आणण्याच्या प्रयत्नात होते.. त्यातच बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड ह्यांनी सुद्धा स्वामींना आपल्या राज्यात आणण्यांचे ठरविले.. आणि एके दिवशी दरबारात त्यांनी हा विचार सर्वांसमोर मांडला.. ते बोलले कि, “जो कोणी श्री स्वामी समर्थांना बडोद्यास घेवून येतील त्यांस आम्ही मोठी जहागिरी देवू.. आणि त्याने स्वामींना इथे आणावे म्हणून जितके द्रव्य लागेल तितके द्रव्य खर्च करू..!! ”. असे ऐकताच तेथे उपस्थित तात्यासाहेब हर्षे नावाच्या सरदारास स्फुरण चढले.. त्याने जरा अहंकाराच्या भावनेने वरील पैजेचा विडा उचलला.. आणि ‘ मी स्वामींना बडोद्यास घेवून येतो ’ असे सांगितले.. त्यानंतर भरपूर द्रव्य घेवून.. मोठ्या लावाजम्यानिशी ते अक्कलकोट येथे आले.. इथे आल्यानंतर त्यांनी बघतीले कि प्रत्येक अक्कलकोटवासी हा स्वामींचा अनन्य भक्त आहे.. स्वामी सुद्धा इथे खुपच छान रमलेले आहेत.. आणि म्हणून त्यांनी विविध योजना आखल्या.. पद – प्रतिष्ठा – पैसा ह्याचा उपयोग करण्याचे ठरविले.. त्यात त्यांनी प्रमुख्याने स्वामींच्या जवळ असलेल्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला.. आणि तात्यासाहेब कोणाच्या तरी माध्यमातून ते स्वामींना बडोद्याला यावे म्हणून विचारात.. पण स्वामी महाराज त्यांस “सहस्त्रभोजन घाल..” वा “ गोरगरिबाला दान कर.. ” असेल बोलून वेळ मारून नेत.. आता जवळ जवळ चार महिने झाले.. तात्या साहेबांच्या प्रयत्नास काही यश येत नव्हते.. आता काय करावे शेवटी चोळप्पां हे स्वामींच्या अधिक जवळचे आहेत.. स्वामी महाराज त्यांचे नक्कीच ऐकतील हा धूर्त डावपेच खेळण्याचे त्याने ठरविले.. आणि त्यांनी चोळप्पांला जवळ घेतले.. आणि त्यांस आश्वासन दिले कि, “ तुम्ही स्वामींना बडोद्यास घेवून आलात तर मल्हारराव राजेसाहेबांकडून तुम्हाला दहा हजारांची जहागिरी मिळवून देईल..!! ” द्र्व्येन सर्व वश: !! चोळप्पांसी लागली आशा !! असे स्वामी चरित्रकार सांगतात आणि अगदी त्या प्रमाणे घडले.. चोळप्पांच्या तोंडाला पाणी सुटले.. आणि त्यांनी त्यांस होकार दिला.. त्यानंतर असेच एके दिवशी स्वामी महाराज आनंदात बसलेले होते.. हि संधी बघून चोळप्पां स्वामींच्या जवळ आले.. आणि स्वामींना बोलले “स्वामी आपण बडोद्याला चलावे.. आपण बडोद्याला आलात तर मल्हाररावराजे मला दहा हजारांची जहागिरी देतील..!!” चोळप्पाने असे बोलताच स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि हसत हसत बोलले कि “अरे त्याजपाशी भक्ती नाही !! ” स्वामींनी असे बोलताच चोळप्पा मनातून अतिशय खिन्न झाला.. इतकी वर्ष स्वामींच्या सेवेत राहून स्वामी महाराजांना अनन्य भक्ती हवी आहे.. हा स्वामींचा गर्भित संकेत चोळप्पा ह्यांस समजला नाही ह्याचेच आश्चर्य वाटले.. कारण पुढे तात्यासाहेब सरदार.. त्यांचे सहकारी ह्यांनी चोळप्पा ह्यांच्या सहकार्याने स्वामींना बडोद्यास नेण्याचे पुढील प्रयत्न सुरूच ठेवले.. हे आपण पुढील स्वामी वाणीत बघून या !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी वाणीतून स्वामींनी तर अगदी स्पष्ट बोध दिला आहे.. कि , कोणी कितीही पैसेवाला असू दे.. समाजात कितीही उच्च पदावर असू दे.. वा कोणी कितीही पंडित ज्ञानी असू दे.. पण जर त्याच्याकडे भक्ती नसेल तर त्यांस स्वामींचा सहवास.. स्वामींची प्राप्ती.. स्वामींची अनुभूती येणार नाही.. त्यास स्थिर शाश्वत शांती.. आनंद.. भेटणार नाही कारण स्वामींना मात्र अनन्य भक्ती हवी आहे.. ह्या सह स्वामी आजच्या स्वामी वाणी तून बोध घेता आपल्याला हीच समज देत आहेत कि, जर आपल्याला खरोखर स्वामी हवे असतील तर फक्त अनन्य भक्तीचा भाव धारण करायची आहे.. आपले प्रत्येक कर्म सेवा बनवायची आहे.. तुम्ही चहावाले असतील.. तर तुमचे चहावाल्याचे पात्र अतिशय उत्कृष्ट निभवायचे आहे.. जे जे लोक थकून तुमच्याकडे येतात.. त्यांना स्वामींनी पाठवले आहे.. आणि ह्या तुमच्या चहाने कित्येक थकलेल्या लोकांना उर्जा भेटते आहे.. हि अनन्य भक्तीची भावना मनात ठेवायची आहे.. बघा !! त्या नंतर आपल्या अंतरंगात एक विलक्षण शांती असेल.. आणि हि शांती म्हणजेच आपण हृदयातील परमशांती स्वरूप स्वामींच्या संपर्कात आहोत.. ह्याचेच स्पष्ट संकेत होय..!! स्वामी भक्त हो !! इतकी सोपी गोष्ट असतांना सुद्धा लोक का भरकटतात ? ह्याचेच आश्चर्य वाटते.. आज पर्यंत अनेक संत मंडळी होऊन गेली.. त्या सर्वांनी हेच सांगितले आहे.. तरीही आपण स्वामींच्या प्राप्तीसाठी.. स्वामीकृपे साठी नको नको तो आटापिटा करतो ह्याचेच आश्चर्य वाटते.. !! पण स्वामी भक्त हो !! आपल्याला आजच्या लीलेतून बोध घेता.. हे सतत लक्षात ठेवायचे आहे कि , आपल्याला जर आपले जीवन स्वामीमय करायचे असेल तर इतर काहीही करण्याची गरज नाही.. आपल्याला मात्र शुद्ध स्वामींप्रती बेशर्त प्रेमाची भावना जागृत करायची आहे.. अनन्य भक्ती करायची आहे.. आपले प्रत्येक कर्म स्वामीसेवा म्हणून करायचे आहे.. आणि प्रापंचिक गरजांची पूर्तता करत स्वामी कृपेने भेटलेले पद – प्रतिष्ठा – पैसा ह्या गोष्टींचा वापर आपल्याला स्वामी भक्तीच्या प्रसारासाठी करायचा आहे.. स्वामींचे विचार.. स्वामी बोध सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करायचा आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामीराया !! आज माझे समाजातील स्थान.. हा पैसा.. हि प्रतिष्ठा.. हे सर्व तुझीच कृपा आहे.. प्रापंचिक गरजांची पूर्तता करत ह्या सर्व गोष्टींचा उपयोग.. तुझ्या लीला.. तु दिलेले बोध.. तुझ्याच भक्तीच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी कर..!! कारण मला ठावूक आहे कि, पद – प्रतिष्ठा – पैसा सर्व तात्पुरते आहे.. तुझी भक्ती मात्र कायमस्वरूपी आहे..!! तुझी भक्तीच खरी श्रीमंती आहे..!! स्वामी आई !! आज दिलेल्या ह्या बोधसाठी धन्यवाद ! कोटी कोटी धन्यवाद स्वामी !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






