आपले स्वामी बोलतात …“ कोण आहे रे तो ? बेडी ठोक !! ” बडोद्याचे मल्हारराव गायकवाड ह्यांना वरील स्वामींचा संदेश समजला नसावा..

Oct 8, 2021

|| स्वामी लीला ||
मागील स्वामी वाणी पर्यंत आपण बघितले कि.. तात्यासाहेब हर्षे ह्यांना आलेले अपयश हेच सांगत होते कि… स्वामी महाराज कोणाच्या पैजेचे बाहुले नाही.. ते तर अनंत कोटी ब्रम्हांडाचे स्वामी आहेत.. त्यांची प्राप्ती करायची असेल तर अनन्य भक्तीची भावनाच धारण करावी.. त्यांच्यावर बेशर्त प्रेमच करावे लागेल…. परंतु बडोद्याचे मल्हारराव गायकवाड ह्यांना वरील स्वामींचा संदेश समजला नसावा.. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एका यशवंतराव येवले नावाच्या सरदारास स्वामींना आणण्याची मोहीम दिली… आणि भरपूर द्रव्य घेवून त्यांस अक्कलकोट येथे पाठवले.. यशवंतराव येवले अक्कलकोट मध्ये येतात… जसे तात्यासाहेब हर्षे ह्यांनी केले अगदी तसेच यशवंतराव येवले लालूच दाखवण्याचा प्रयत्न सुरु करतात.. परंतु अति झाले कि मातीच होते.. ह्या उक्ती प्रमाणे.. आता स्वामींना हा प्रकार काही सहन होत नव्हता आणि आता स्वामींनी ह्या प्रकारणाचा कायमचाच छडा लावण्याचा निर्णय घेतला.. तो दिवस उजडला.. त्या दिवशी स्वामी महाराज दरबारात बसलेले होते.. यशवंतराव येवले स्वामींकडे येतात.. आणि हात जोडून स्वामींना बोलतात.. “स्वामी आपण बडोद्यास चलावे..!!!” स्वामी भक्त हो !! यशवंतराव येवले ह्यांनी अशी प्रार्थना करताच स्वामींनी त्यांच्याकडे एकटक लागून पाहिले.. आणि अतिशय क्रोधीत होऊन बोलले..“ कोण आहे रे तो ? बेडी ठोक !! ”. स्वामींचे क्रोधायमान रूप बघून सर्वच घाबरले.. परंतु स्वामी वाणीचा अर्थ कोणालाच समजला नाही. .स्वामी भक्त हो !! स्वामी वाणी हि अनुभूती आहे.. अनुभव आहे.. आणि तीनचार दिवसांनी “ कोण आहे रे तो ? बेडी ठोक !! ” ह्या स्वामी वाणीचा अर्थ उलगडला… तीन चार दिवसांनी बडोद्याहून इंग्रज सरकारचा हुकूमनामा आला.. यशवंतराव येवले ह्यांस माघारी बोलवले.. आणि विषप्रयोगाच्या आरोपावरून मल्हारराव.. यशवंतराव येवले आणि इतर सहकारी ह्यांच्यावर खटला भरण्यात आला.. आणि त्यांस मद्रास मध्ये अटकेत रहावे लागले.. स्वामी हवे असतील तर अनन्य भक्ती करा.. अहंकराच्या.. पैशाच्या.. सत्तेच्या नशेत स्वामींना बाहुले बनविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.. तर ईश्वर प्राप्ती होणार नाही.. उलट संसारिक जीवनात अधोगती होते.. हा स्पष्ट बोध स्वामींनी सर्वांना दिला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजच्या लीलेतून स्वामी आपणास असंख्य बोध देतात पैकी.. स्वामी हवे असतील तर अनन्य भक्ती करा.. स्वामी महाराज कोणाचे ताबेदार नाहीत.. अहंकराच्या.. पैशाच्या.. सत्तेच्या नशेत स्वामींना बाहुले बनविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.. तर ईश्वर प्राप्ती होणार नाहीच.. उलट आध्यात्मिक सह संसारिक जीवनात अधोगती होते… हा स्पष्ट बोध स्वामीं आज सर्वाना देता आहेत.. आजही आपल्या सभोवताली वरील प्रमाणेच घडत आहे.. पद- प्रतिष्ठा- पैसाच्या नावाखाली देवावर अधिकार दाखवण्याचा प्रकार सर्रास समाजात सुरु आहे.. परंतु हि माया आहे.. आणि त्यांच्यासाठी आजही “ कोण आहे रे तो ? बेडी ठोक !! ” हि स्वामी वाणी होत आहे.. इतकेच नव्हे तर अनेक बाबा लोकांचे अजब गजब प्रकार सुद्धा समोर आलेले आहेत.. आणि त्यांना खरोखर बेड्या सुद्धा ठोकल्या गेल्या आहेत.. असो. स्वामी भक्त हो !! परंतु आपण ह्यांच्या पेक्षा वेगळे आहोत.. आपल्या स्वामी भक्तीच्या वरच्या वर्गात जायचे आहे.. स्वामी महाराज हृदयात आहेत.. ते परम शांतीची अवस्था आहेत.. जेव्हा जेव्हा आपले मन पद – प्रतिष्ठा – पैशाने उन्मत्त होते.. तेव्हा तेव्हा आपण हृदयातील शांती पासून दूर जातो.. आणि स्वामी त्याचे संकेत देता सुद्धा..!! आपल्याला ते संकेत ओळखायचे.. आणि आपल्या आपले कर्म आणि त्याचे फळ स्वामींनाच समर्पित करायचे आहे.. हे सर्व स्वामी प्रेमापोटी करायचे आहे.. बघा !! जेव्हा आपण स्वामींकडे एक पाउल टाकतो.. तो दहा पावले आपल्याकडे चालत येतो ह्याचा अनुभव येईल.. आणि नक्कीच आनंदी.. सुखी.. समृद्ध जीवनाची अभिव्यक्ती होईल.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे श्री स्वामी समर्था !! मी जेव्हा तुझ्याकडे एक पाउल टाकतो.. तेव्हा तु माझ्याकडे दहा पाउल टाकतो.. आणि जेव्हा मी फक्त क्षणाभर अनन्य भक्तीने..प्रेमाने आळवतो.. तेव्हा तु लागलीच येवून मला आधार देत बोलतोस..‘ बाळा !! घाबरू नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे..!!! ’ हे परमपित्या !! किती प्रेम करतोस तुझ्या बाळावर..!! तुला अनंत कोटी धन्यवाद.. तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...

read more
धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
Breaking News