नवरात्रीच्या औचित्यार्थ गोंधळी रोशन भिसे हयांचे गाणे ठरते लक्षवेधी
नाशिक : नवरात्रीची धुम देशात सगळीकडे उत्साहाने दिसून येत आहे.त्याचे कारण म्हणजे मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे भाविकांना नवरात्र साजरी करता आली नव्हती.परंतु हया वर्षी लसीकरणामुळे कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने नवरात्र उत्सव साजरा करण्याची सरकारकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भगवतीची आराधना व गायन वादन शिंघेला पोहचले आहे. हया उत्सवात आई भगवतीचा आराधना व भक्तीचा जागर वाढविण्यासाठी गोंधळी रोशन भिसे नी स्वत: बनविलेले व गायलेले तुळजा भवानीचे गीत….. डोंगरच्यावर आंबा ग नांदती नांदती….सध्या युटूब वर धुमाकूळ घालीत आहे.
हया गीता बाबत माहिती देताना रोशन भिसे सांगितले की,” हे गीत बनवतांना व गायन करतांना मला माझे गुरुवर्य कै.शिवाजी भिसे व किरण भिसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ज्यामुळे गीत ऐकतांना पारंपरिकतेचे झलक ऐकायला मिळते.” संगीत संयोजन डीजे भूषण विलास डावखर यांनी केले आहे तर मोलाचे सहकार्य विक्रम कवटे,एकनाथ बगाड, अरविंद भिसे, कैलास भिसे,रवी वाघमारे, समाधान मुर्तडक यांचे लाभले आहे.
संपर्क : रोशन भिसे गोंधळी, मु.पो विंचुर दळवी, ता.सिन्नर, जि.नाशिक, मो. 9049694637
गाणे ऐकण्यासाठी लिंक…. https://youtu.be/Q0rqH8JfDVA






