आपले स्वामी बोलतात …“ शनिवारी येवू जा..!! ” … तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला कि, “तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल..!!”

Oct 28, 2021

|| स्वामी लीला ||
एकदा स्वामी महाराजांची स्वारी नलदुर्ग येथील गावात आलेली होती.. तेव्हा तेथे निलेगावचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार हे दर्शनासाठी आले होते.. तेव्हा त्यांनी चोळप्पाकडून स्वामींनी निलेगाव येथे यावे हि विनंती केली.. त्यांनी अशी विनंती करताच स्वामी महाराज “शनिवारी येवू.. जा !! ” असे बोलले.. त्या नंतर स्वामी महाराज काही दिवसांनी निलेगावी येतात.. स्वामींच्या सोबत जवळ जवळ दोनशे सेवेकरी होते.. जहागीरदार ह्या सर्वांच्या राहण्याचा.. जेवणाची सोय करतात.. स्वामी पूजन.. अन्नदान.. किर्तन.. असे विविध उपक्रम तेथे होतात.. असा जवळ जवळ चार दिवस तेथे मोठा उत्सव साजरा होतो.. जहागिरदारांस संतती सुख नव्हते.. त्यांच्या स्त्रीस १६ वे वर्षी ऋतू प्राप्त झाला तरीही आपणास संतती सुख नाही अशी प्रार्थना त्यांनी चोळप्पा कडून स्वामींना केली.. तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला कि “तुला चांगलाच मुलगा होईल..!!” आणि त्या नंतर जहागीरदार स्वामी महाराजांचे पूजन करत असतांना.. कपाळाला अक्षता लावत असतांना.. त्यातील तीन अक्षताचे दाणे खाली पडले होते.. स्वामींनी ते दाणे प्रसाद स्वरूप जहागीरदारांस दिला.. पुढे जहागीरदारांनी एक व त्यांच्या पत्नीने दोन असे तांदुळाचे दाने खाल्ले.. पुढे स्वामी महाराज पाचवे दिवशी अक्कलकोट येथे येण्यास निघाले.. तेव्हा श्रीमंत भाउसाहेबानी पुन्हा स्वामींनी यावे म्हणून विनंती केली… तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला कि, “तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल..!!” पुढे स्वामी कृपेने त्यांना काही वर्षाच्या अवधीत तीन अपत्य झाली.. श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार ह्यांस स्वामी वाणीचा अनुभव आला.. त्यांचे स्वामींच्या चरणी खूपच प्रेम जडले होते.. ते एके दत्त जयंतीच्या उत्सवा निमित्त सह कुटुंब अक्कलकोट येथे दर्शनास आले.. आपले तीनही अपत्ये स्वामी चरणी ठेवली.. त्यांनी स्वामींची पुष्कळ स्तुती केली.. देवाधिदेवा कृपाघना ! वटपत्र शयनी नारायणा !! दीनावरी करुनी करुणा ! मनोरथ पूर्ण केले !! अशी त्यांनी पुष्कळ स्वामी स्तुती केली.. त्या दत्त जयंती उत्सवात त्यांनी दहा घागरी तूप दिले.. काही दिवस राहून त्यांनी सहकुटुंब सेवा केली.. आणि पुढे उत्सव झाल्या नंतर जेव्हा पुन्हा गावी जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी स्वामींनी निलेगावी यावे म्हणून पुन्हा विनंती केली.. तेव्हा स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि पुन्हा बोलले “आम्ही शनिवारी येऊ.. जा!! ” स्वामी भक्त हो !! परंतु पुढे काही दिवसांनी स्वामींनी अजब गजब लीला सुरु केल्या.. त्या आपण पुढे विस्तुत बघणारच आहोत.. त्या लीलामधून आपण हे शरीर त्यागणार आहोत असा स्पष्ट संकेत देत होते.. आणि चैत्र कृ.१३ शके १८०० (३० एप्रिल १८७८) मंगळवार रोजी स्वामींनी शरीर त्यागण्याची लीला केली.. परंतु स्वामी भक्त हो !! पुढे आश्चर्य घडले.. स्वामींनी निलेगावाच्या श्रीमंत भाउसाहेबाना “शनिवारी येऊ ” सांगितले होते.. आणि समाधी लीलेच्या नंतर बरोबर पाचव्या दिवशी स्वामी महाराज निलेगावी प्रकट झाले.. स्वामींचे आगमन झालेले बघताच.. श्रीमंत भाऊसाहेब स्वामींच्या दर्शनासाठी गावाबाहेर आले.. तेथे स्वामी एका झाडाखाली बसलेले होते.. अनेक लोक तेथे जमले.. तेव्हा श्रीमंत जहागीरदारांनी “घरी चलावे ” अशी स्वामींना विनंती करताच.. “आम्ही उद्या येवू ” असे सांगितले.. आणि असा निरोप घेऊन सर्व लोक आपापल्या घरी परतले.. संध्याकाळी सर्व लोक जेवण वगैरे करून पुन्हा दर्शनासाठी त्या झाडाखाली आले.. तेव्हा बघतो तर काय कि स्वामी महाराज त्या ठिकाणी नव्हते.. ती रात्र श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदारांनी मोठ्या तळमळीने काढली.. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आले.. तर पुन्हा तेथे कोणीच नव्हते.. तेव्हा त्यांनी भरपूर शोध घेतला.. पण काहीच समजत नव्हते.. शेवटी त्यांनी चार माणस अक्कलकोट येथे पाठवली.. इकडे भरपूर शोध घेवून थकलेले श्रीमंत जहागीरदार दुपारी घरी आले.. आणि भोजन करण्यास बसले.. तोच आश्चर्य घडले.. स्वामी महाराज तेथे अकस्मात प्रकट झाले.. त्यांनी स्वामींना आसन दिले.. जेवणास ताट वाढले.. परंतु स्वामी पुन्हा अचानक अदृश्य झाले.. स्वामींची हि अतर्क्य लीला बघून श्रीमंत जहागीरदार खूपच गोंधळून गेले.. बाकी लोकांना हे सर्व सांगितल्या नंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले.. आणि तेवढ्यात जे चार लोक अक्कलकोट येथे पाठवली होती.. ती मंडळी अक्कलकोटहून पत्राचे उत्तर घेवून आली.. स्वामी भक्त हो ! तेथून जे उत्तर आले.. ते ऐकताच श्रीमंत जहागीरदारांना धसकाच बसला.. स्वामी महाराजांनी मंगळवारी म्हणजेच चार दिवसांपूर्वीच समाधी घेतली आहे.. हि धक्कादायक बातमी त्यांना समजते.. स्वामी भक्त हो !! हि बातमी समजताच श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदारांना किती दु:ख झाले असेल ह्याची कल्पनाच करवत नाही.. स्वामीं भक्त वत्सल आहे.. “शनिवारी येतो ” हि त्यांची वाणी होती.. आणि स्वामी वाणी प्रमाणे त्यांना प्रचीती आली.. शरीर त्याग केल्यानंतर सुद्धा स्वामींनी.. ह्या बाळाची स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण केली.. हम गया नाही जिंदा है !! ह्याची अनुभूती दिली.. ह्या भावनेने श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार अतिशय हात जोडून कृतज्ञ झाले.. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या.. आणि कंठातून स्वामींचा जयजयकार उमटत होता.. बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आज स्वामी पुण्यतिथी आहे.. खरतर स्वामीं हे अनंत कोटी ब्रम्हांडाचे स्त्रोत आहेत.. ते समाधी कशी घेणार.. आजच्या दिवशी तर स्वामींनी जे पंचमहाभुतांपासून बनलेले शरीर धारण केले होते त्याचा त्याग केला.. कारण स्वामींनी बनविलेल्या सृष्टीच्या नियमानुसार त्यांना हे करावेच लागणार होते.. स्वामी महाराज स्वतःच स्वतः बनविलेल्या नियमांचे उल्लंघन थोडेच करणार.. परंतु आपले स्वामी महाराज आई आहे.. तिला माहित होते कि, तिचे बाळे हळवे आहेत.. स्वामींनी शरीर त्याग केल्यानंतर अनेक जण खचून जावू शकतात.. आमचा आधार गेला असे त्यांना वाटू शकते.. आणि निराशेच्या भावनेत.. नकारात्मक भावनेने पुन्हा नकारात्मक जीवन आकर्षित करू शकतात.. आणि म्हणूनच समाधी लीला नंतर सुद्धा.. स्वामींनी अनेक लोकांना सगुण रुपात दर्शन दिले.. ह्याचा उद्देश इतकाच कि, स्वामी भक्तांनी खचून जावू नये.. त्यांना कदापीही असे वाटू नये कि.. त्यांना कोणाचच आधार नाही.. म्हणून स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढी साठी आजच्या लीलेतून बोध घेता हा आत्मविश्वास उंचवायचा आहे कि, जीवनातील कोणत्याच संकट वा दु:खाला घाबरायचे नाही.. आजच्या लीलेतून बोध घेता हि समज सतत मनात ठेवायची कि.. स्वामींनी श्रीमंत जहागीरदारांना “ मी शनिवारी येतो ” हि स्वामी वाणी केली होती.. आणि स्वामींनी शरीर त्यागण्याच्या लीलेनंतर सुद्धा ती सत्यच घडवून आणली.. स्वामी भक्त हो !! अगदी तसेच तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी.. “ जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. हम गया नही जिंदा है !! ” हि स्वामी वाणी केलेली आहे.. स्वामींनी हे अभयवचन दिलेले आहे..!! आणि जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल.. आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करवून द्यायची आहे.. आणि ठामपणे सांगायचे आहे कि , “ हे मना !! घाबरू नकोस !! ज्याने हे अनंत कोटी ब्रम्हांड एखाद्या गोटीप्रमाणे हातात पकडलेले आहे.. अशी अनंत कोटी ब्रम्हांडाची परमशक्ती आपल्या पाठीशी आहे… आपल्याला फक्त अतिशय विश्वासाने आपले प्रामाणिक कर्म करायचे आहे.. विनाकारण भीती मनात ठेवून थांबायचे नाही.. सतत पुढे पुढे चालत रहायचे आहे..!! आपले यश निश्चित आहे..” चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तु अनंत कोटी ब्रम्हांडाचा मालक आहेस.. हे ब्रम्हांड तु एखाद्या गोटी प्रमाणे हातात पकडले आहे.. तुझ्या मनात आले तर तु एखाद्या गोटी प्रमाणे ह्या ब्रम्हांडाला कोठेही फेकून देवू शकतोस.. इतकी मोठी तु शक्ती आहेस.. तरीही तु आम्हा बालकांसाठी प्रगट होतोस.. सगुण रुपात दर्शन देतोस.. आणि आधार देवून बोलतोस.. ‘बाळा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.. हम गया नही जिंदा है !! ’ हे परमपित्या !! तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News