‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ प्रेक्षकांच्या भेटीला

Nov 6, 2021

३१ ऑक्टोबर २०२१ : जिने खोदली औरंगजेबाची कबर, ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’! ह्या वाक्याने महाराणी ताराराणी यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर मराठ्यांची सत्ता आणि स्वराज्य जपण्याची जबाबदारी ताराराणी यांनी उचलली आणि ती चोख पेलली. आणि स्वराज्याचा विस्तारही केला. महाराणी ताराराणी आणि त्यांचं कार्य हे इतिहासातील एक दुर्लक्षित पान आहे.

सोनी मराठीने सातत्याने ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांची इतिहासाशी ओळख करून दिली आहे. ‘स्वराज्यसौदामिनी ताराराणी’! या मालिकेमुळे ताराराणी नक्की कोण होत्या, मराठ्यांची सत्ता आणि स्वराज्य वाचवण्यात त्यांचा वाटा किती मोलाचा होता, तसेच त्यांनी काबीज केलेले गड, किल्ले; निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या शूर सेनांनीसह औरंगजेबाविरुद्ध दिलेला लढा, त्याची खोदलेली कबर यांसह अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. महाराणी ताराराणींची व्यक्तिरेखा स्वरदा ठिगळे साकारणार असून रोहित देशमुख आणि अमित देशमुख धनाजी आणि संताजी यांच्या भूमिका साकारणार आहेत. मालिकेत स्वरदा घोडेस्वारी, तलवारबाजीही करताना दिसणार आहे. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणी आणि त्यांच्या कार्याला दिलेला एक प्रकारचा मानाचा मुजरा आहे. वेळ पडल्यावर मराठ्यांच्या मुली हातात तलवार आणि ढाल घेऊन रणांगणही गाजवू शकतात,

हा इतिहास मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. १५ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७.३० वाजता सोनी मराठी  वर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News