|| स्वामी लीला ||
आपण मागील स्वामी वाणी (१३२) मध्ये बघितले कि, स्वमी महाराज कसे स्वामीसुतांस आत्मलिंग पादुका देवून कृपा करतात.. त्यानंतर पुढे त्याच रात्री स्वामींनी त्यांच्यावर पुर्णानुग्रह केला.. त्या रात्री स्वामी महाराज गावाबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली वस्तीस होते.. तेव्हा हरिभाऊ आणि सोबतची मंडळी स्वामींच्या सोबतच जावून राहिले.. तेथे सर्व झोपलेले होती.. फक्त स्वामी महाराजच जागे होते.. हे बघून स्वामीसुत स्वामींच्या जवळ येतात.. स्वामींच्या चरणाशी बसून.. स्वामींचे पाय रगडण्यास सुरुवात करतात.. त्या वेळेला स्वामी महाराजांच्या आणि स्वामी सुतां मध्ये गुह्य चर्चा सुरु होती.. आणि हे बराच वेळ सुरु होते.. तेव्हा स्वामींनी आपल्या उशाशी असलेले छाटी आणि कफनी स्वामी स्वामी सुतांच्या अंगावर फेकून दिले..आणि त्यांस सांगितले कि, “ आता आपला सर्व संसार लुट्वून टाक ”. स्वामी भक्त हो !! स्वामी सुत हे अनन्य भक्ती अवतार होते.. आणि श्री गुरूंचा हुकुम मानणे.. त्या हुकुमाचे पालन करने हा.. अनन्य भक्ताचा दिव्यगुण आहे.. आणि त्याच प्रमाणे घडले.. दुसरे दिवशी स्वामी हुकुम प्रमाण मानुन… स्वामींनी दिलेले आत्मलिंग पादुका आणि कपडे परिधान करून मुंबईला आले.. घरी आल्यानंतर त्यांनी ब्राह्मणास बोलावून.. दागदागिने.. गाईम्हशी वगैरे संकल्प करून लुटवुन टाकल्या.. त्यांची पत्नी ताराबाई हिच्या अंगावर असलेले साठ तोळ्यांचे सोन्याचे तोडे..चोवीस तोळ्यांच्या बांगड्या.. अठरा पुतळ्यांचे गांठले, ठुशी वगैरे दागिने लुटविले.. आणि हे सर्व दान एकाच व्यक्तीकडे जावू नये म्हणून स्वामीसुतांच्या मित्रांनी वरील सर्व विकून त्याचे पैसे ब्राह्मणास वाटून दिले.. स्वामी भक्त हो !! विचार करा.. कि हा प्रकार सुरु असतांना स्वामीसुतांच्या पत्नीच्या मनाची काय अवस्था झाली असेल.. अहो !! त्या माउलीचे डोळे रडून रडून सुजले होते.. आपल्याकडे थोडे तरी दागिने असावे अशी ती विनवणी करत होती.. परंतु स्वामी सुतांचे वैराग्य इतके कडकडीत होते कि, त्यांना सर्व सोने लोह समान वाटत होते.. अहो !! स्वामीसुतांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर असलेले मनीमंगळ सूत्र सुद्धा दान केले.. आणि तिला सुद्धा पांढरे पातळ परिधान करण्यास दिले.. खरोखर !! श्री गुरूंचा हुकुम पालन करणारे स्वामीसुत धन्य आहेत.. !! स्वामी भक्त हो !! पुढे स्वामीसुतांनी गळ्यात जो विना घातला तो.. पुढे तीन वर्ष काढला नाही.. त्यानंतर त्यांनी प्रथम कामाठीपु-यात मठ स्थापन केला.. ते प्रेमळ भजन करत.. स्वामींच्या लीलांचे गुणगान गात.. स्वामींच्या लीलांचा बोध सर्वांना सांगत.. त्यांची भक्ती शुद्ध होती.. म्हणून अनेक लोक त्यांच्याकडे येवु लागले.. पारशी.. प्रभू.. सोनार.. पांचकळशी.. वाणी वगैरे लोक स्वामींची भक्ती करू लागले.. अशा पद्धतीने स्वामी हुकम शिरसावंद्य म्हणून स्वामी हुकुमाचे तंतोतंत पालन करणारे हरिभाऊ स्वामीसुत झाले.. स्वामी सुतांचे अनन्य भक्तीची प्रेरणा देणारे रसाळ चरित्र आपण पुढेही बघणार आहोत.. तो पर्यंत..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामीबोध ||
स्वामी भक्त हो !! स्वामी महाराजांच्या अक्कलकोट नगरीत केलेल्या लीला खरोखर लाखो पिढ्यांसाठी प्रेरणादाई आहेत.. ह्या मध्ये स्वामींनी अनेक पात्र घडवून आणले.. सुंदराबाई असेल.. चोळप्पा असेल.. सह अनेक पडद्यामागील पात्र असेल.. जे आपल्या मनातील विविध अवस्थांचे दर्शन घडवतात.. ह्यातीलच एक सर्वोत्तम पात्र म्हणजे स्वामीसुत..!! स्वामी भक्त हो !! ‘अनन्य भक्त’ हा ईश्वराचा स्वच्छ सुंदर आरसा असतो.. ईश्वराला जेव्हा त्याच्या स्वतः मधील ईश्वरीय गुणांचा आनंद घेण्याची इच्छा जागृत होते.. तेव्हा तो अनन्य भक्तांची निर्मिती करतो.. ह्यातीलच एक अनन्य भक्त म्हणजे “स्वामीसुत”.. म्हणून तर अनेक संत मंडळींनी त्यांच्या अभंगात पांडुरंगाला सांगितले कि, ‘ हे पांडुरंगा तु भक्तांच्या शिवाय अपूर्ण आहेस..!! ’ असो. अक्कलकोट नगरीत स्वामी विठू माउलीचा अनन्य भक्ती अवतार म्हणजेच स्वामीसुत होय..!! आजच्या लीलेत आपण बघितले कि, स्वामी हुकुम शिरसावंद्य मानुन स्वामीसुतांनी आपला सर्व संसार लुट्वून टाकला.. ह्यातून स्वामी महाराज आज आपणास आजच्या पिढीला “संसार लुटवण्याची आज्ञा देत नाही ” तर ह्या लीलेतून स्वामी आपणास अनन्य भक्ताच्या “ श्रीगुरु हुकुम ” नावाचा गुण धारण करण्याची प्रेरणा देत आहेत.. आणि “स्वामी हुकुमाची ” सर्वोच्च संभावना काय असू शकते.. त्याची काय अभिव्यक्त असू शकते ह्याची समज देत आहेत.. आणि जेव्हा आपण स्वामी हुकुमाचे पालन करतो.. तेव्हा आपोआप नको असलेल्या गोष्टी सुटून जातात.. म्हणून आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून प्रेरणा घेता.. आपल्याला आपली भक्ती अजून बळकट करायची आहे.. आपली इच्छाशक्ती अजून बळकट करायची आहे.. स्वामींनी तुम्हा आम्हा सर्वांना पृथ्वीवरील जीवनात एक पात्र दिलेले आहे.. स्वामीसुतांच्या अनन्य भक्ती अवतारातून “ स्वामी हुकुम ” ह्या दिव्यगुणाची प्रेरणा घेत.. आपल्याला आपले पात्र उत्कृष्ट निभवायचे आहे.. जीवनात उच्चतम धेय्य ठेवून.. त्यासाठीचे आपल्याला भेटणाऱ्या “स्वामी हुकुमाचे ” पालन करायचे आहे.. आपले कर्म म्हणजेच स्वामी सेवा हा विश्वास दृढ करायचा आहे.. आणि हे करत असतांना जर कदाचित आपले मन अहंकारी बनले.. मी खूप स्वामींची सेवा करतो आहे असे बडबड करू लागले तर त्याला आजच्या स्वामी वाणी लीलेची आठवण करवून द्यायची आहे.. आणि स्वामीसुतांच्या त्यागा समोर खरोखर आपली सेवा किती सामान्य आहे ह्याची समज द्यायची आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! अक्कलकोट नगरीत तु असंख्य लीला केल्यात.. स्वामीसूतांसारखे अनन्य भक्तीचे पात्र तु घडवले.. लाखो पिढ्यासाठी आम्हाला अनन्य भक्तीचे प्रेरणास्त्रोत दिले.. आणि ह्या प्रेरणास्त्रोतातुन आम्हाला तुझ्या अनन्य भक्तीची प्रेरणा देतो आहेस.. आमचे जीवन आनंदी करतो आहेस.. !! तुला अनंत कोटी धन्यवाद !! तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






