आपले स्वामी बोलतात ….“ तु माझा सुत आहेस.. धंदा-रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जावून, मोठा किल्ला उभारून ध्वजा उभी कर..!! ”

Nov 13, 2021

|| स्वामी लीला ||
आपण मागील स्वामी वाणी (१३०) मध्ये बघितले कि, स्वामी महाराजांची आज्ञा घेवून हरिभाऊ, गजानन आणि पंडित मुंबईला आले.. मुंबईला आल्यानंतर हरिभाऊ ह्यांना स्वामींचा ध्यासच लागला.. स्वामींच्या भक्ती अवताराची सुरुवात झालेली होती.. हजारो लाखो पिढ्यांसाठी अनन्य भक्तीचा आदर्श ज्या शरीरामार्फत होणार होता.. त्या हरीभाऊंच्या मनाची ओढ सतत अक्कलकोटला स्वामींकडे लागली होती.. त्यांना त्यांच्या नोकरीचा कंटाळा येवू लागला.. “ माझा जन्म स्वामी सेवेसाठी आहे.. स्वामींनी माझ्यावर अनुग्रह करावा..” अशा प्रार्थना त्यांच्या हृदयाच्या तळापासून येवू लागल्या.. असा ध्यासच त्यांना लागला.. रात्रंदिवस त्यांचे मन सतत स्वामींच्या अनुग्रहाची.. परमकृपेची प्रार्थना करत होते.. ह्यातच स्वामींनी आज्ञा दिल्या प्रमाणे चांदीच्या पादुका तयार झाल्या होत्या.. आणि त्या घेवून हे तिघेही अक्कलकोट येथे आले.. स्वामींच्या समोर दर्शन घेवून उभे राहिले तोच स्वामींनी हरीभाऊंकडे बघितले आणि त्यांच्याकडे बघून “गुरुर्ब्रम्हा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥” हा श्लोक म्हटला.. त्यानंतर गजाननाकडे बघून “ आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥ ” श्लोक म्हटला आणि पंडितला कडे बघून “ इदमेव शिवं इदमेव शिवं, इदमेव शिवं , इदमेव शिवम् ।” हा श्लोक बोलला.. त्या नंतर हरीभाउंनी बनवून आणलेल्या चांदीच्या पादुका स्वामींच्या समोर ठेवल्या.. स्वामी भक्त हो !! त्या पादुका बघितल्या नंतर स्वामींना खूपच आनंद झाला.. आणि स्वामींनी लागलीच आपल्या पायात घातल्या… स्वामींचे त्या पादुकांवर खूप प्रेम होते.. स्वामी महाराज अतिशय प्रेमाने दररोज त्या पादुका पायात घालत.. स्वामींच्या ह्या पादुका आपल्याला भेटाव्यात म्हणून तेथील सेवेकरी पुष्कळ खटपट करत होते.. परंतु स्वामींनी कोणालाच त्या दिल्या नाही.. स्वामी बोलत “ हे माझे आत्मलिंग आहे.. हे मी कोणालाच देणार नाही..!! ” असे जवळ जवळ सलग चौदा दिवस स्वामींनी त्या पादुका पायात घातल्या.. पुढे चौदावे दिवशी.. हरिभाऊ दर्शनास गेले असता.. स्वामींनी त्यांना हाताला धरून आपल्याकडे ओढून घेतले.. आणि बोलले “ तु माझा सुत आहेस.. धंदा-रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जावून , मोठा किल्ला उभारून ध्वजा उभी कर ” मग त्या पादुका हात पाय तोंडास वगैरे अवयवास लावून.. हरिभाऊंना उभे राहण्यास सांगितले.. आणि त्या नंतर स्वामींनी त्या पादुका हरीभाऊंना डोक्यावर घेण्यास सांगितल्या… मग काय विचारता…!! हरीभाऊंचा आनंद त्रिभुवनात मावेना.. ते स्वामी नामाचा जय घोष करत नाचुच लागले..” स्वामी भक्त हो !! स्वामी सुतांचे हे सुमधुर चरित्र आपण पुढील स्वामी वाणीत सुद्धा ऐकणार आहोत.. तो पर्यंत
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
स्वामी भक्त हो !! स्वामी सुत हे अनन्य भक्ती अवतार होते.. अतूट अभेद्य श्रद्धेचा अवतार होते.. ते स्वामींचेच प्रेम स्वरूप होते.. स्वामींचेच विश्वास स्वरूप होते… स्वामी आणि स्वामीसुत ह्यांच्या लीलांमधून बोध घेतला तर त्याची व्याप्ती अथांग सागरा प्रमाणे पसरत आहे… पण आपण आपल्या ओंजळीत जितके मावेल इतकेच प्राशन करण्याचा प्रयत्न करू या.. आजची स्वामी लीला तर खूपच प्रेरणादायी आहे..सर्व प्रथम आपल्याला हे समजावून घ्यायचे आहे की हरिभाऊ हे स्वामी सुत उगीच वा योगायोगाने झाले नाही.. त्या मागे हरिभाऊंची साधना होती.. उत्कट ध्यास होता.. निस्वार्थी ध्यास होता.. बघा जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांना स्वामींचा अनुग्रह केव्हा होईल हा ध्यास लागला होता.. ह्यातुन तुम्हा-आम्हा सर्वांना एक गोष्ट समजावून घ्यायची आहे की, स्वामी कृपा हवी असेल तर ध्यास नावाचा गुण धारण करने अतिशय महत्त्वाचे आहे.. स्वामी भक्त हो !! आज आपण कोणत्याही अवस्थेवर असाल.. आज आपली स्वामी कृपेची काहीही व्याख्या असेल.. आणि कोणतीच व्याख्या चुकीची नाही.. जसे आज आपली प्रापंचिक समस्या सुटणे ह्याला आपलें प्रधान्य असेल.. ती समस्या सुटणे म्हणजेच स्वामींकृपा.. अशी आपली व्याख्या असेल तरीही काहीही चुकीचे नाही.. पण ही कृपा संपादन करण्यासाठी आजच्या लिलेतून बोध घेता.. आपल्याला ध्यास नावाचा गुण धारण करायचा आहे… आपली समस्या सोडवून त्यातून स्वामी काय शिकवत आहे.. ते समज प्राप्त करून.. आपला प्रवास परमकृपेच्या दिशेने सुरु ठेवायचा आहे.. बघा !! आजच्या लिलेत स्वामीनी हरिभाऊंवर परमकृपा केली.. स्वामीनी त्यांना आपल्या पादुका त्यांच्या डोक्यावर देऊन गुरू हेच परब्रम्ह आहे ही समज देऊन… सुख-दु:खाच्या सागराच्या किनाऱ्यावर.. गुरु:साक्षात परब्रम्ह ह्या दृढतेचा पाया तयार करून त्यावर अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धा रुपी तटबंदी असलेल्या किल्ल्याची उभारणी करण्यास सांगितली.. आणि त्यात श्री स्वामी समर्थ नामाची ध्वजा उभारण्यास सांगितली.. आणि जो जो ह्या संसार रुपी भवसागरात सुख-दु:खाच्या लाटांमध्ये भरकटून जाईल.. तो हि ध्वजा बघून.. ह्या किल्ल्यात येईल.. तेव्हा त्याला गुरू भक्तीचे वेड लाव.. तो स्वामींचा बाळ आहे.. अंश आहे ही त्याला समज दे.. आणि त्याच्यातील प्रेम विश्वास जागृत करून.. त्याच्या जीवनात कितीही दु:ख वा संकटरुपी भरती-ओहोटी आली तरिही तो आत्मनिर्भर होऊन खम्बीर उभा राहिला पाहिजे ही आज्ञा दिली..!! स्वामी भक्त हो !! प्रत्येक शिष्याचे पहिले कर्त्यव्य हेच कि , त्याने श्री गुरूंचे विचार.. शिकवण.. बोध आचरणात आणून त्याचा लोककल्याणासाठी प्रचार प्रसार करने.. आणि श्री हरीभाउंनी स्वामी हुकुमाचे पालन करण्यास सुरुवात केली आणि त्या नंतर ह्या श्री हरिभाऊचे स्वामीसुतात रूपांतरण झाले.. म्हणून आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता.. निरंतर ध्यास नावाचा गुण धारण करायचा आहे.. ह्या गुणाने निश्चितच स्वामी परमकृपा होते.. स्वामी परमकृपा झाल्या नंतर स्वामी हुकुम समजतात.. आणि स्वामी हुकुमाचे पालन करत.. स्वामी गुरूंचा ध्यास उराशी बाळगून आणि त्यांच्या लीलां मधून प्रेरणा घेवून.. आपले जीवन सोपे सुटसुटीत आनंदी करायचे आहे.. आणि आपल्याला लाभलेल्या स्वामींच्या ह्या शिकवनुकीची.. विचारांची.. भक्तीची ध्वजा उभारून.. हा परमकृपेचा प्रसाद सर्व विश्वातील मानवापर्यंत पोहचवण्यास आपले शरीर निमित्त बनायचे आहे… चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! मला तुझा निरंतर ध्यास दे.. तुझा ध्यासच परमकृपेची शिडी आहे.. आमच्यावर परमकृपा कर.. आणि तु जे आम्हाला शिकवतो आहेस.. ते समजण्याची बुद्धी दे.. तुझी शिकवण आचरणात आणण्याची शक्ती दे.. आणि तुझे हे विचार.. तुझी शिकवण प्रत्येक मानवाला त्याच्या समज नुसार समजावून सांगण्यासाठीची ह्या शरीराची पात्रता तयार कर..!! ”.
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

संदर्भ :- www.SwamiVaani.com

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News