आपले स्वामी समर्थ महाराज बोलतात…” नाही गं ! त्याला मोठया जागेवर पाठविला आहे… रडु नकोस !! ”

Nov 25, 2021

|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज आणि स्वामी सुतांच्या अतर्क्य लीला सुरु होत्या.. आता साधारणतः चार वर्ष झाली होती.. असंख्य भाविकांना स्वामी सुतांनी स्वामीं भक्तीचा प्रसाद दिला होता.. अनेक वाट चुकलेल्यांना स्वामी सुतांनी सन्मार्गावर आणले होते.. पुढे एके दिवशी स्वामी सुत अक्कलकोट येथे गेले असता… स्वामी महाराजांनी आपण लवकरच अवतार संपविणार आहे.. आणि हा ध्वज तुलाच पुढे उभारावा लागणार आहे अशी स्वामीसुतांस सूचना केली.. अशी सूचना ऐकून स्वामीसुतांस खुप वाईट वाटले.. आणि आपल्या बापाच्या आगोदर आपणच शरीर त्याग करावा असा त्यांनी निश्चय केला.. आणि ह्यातूनच स्वामीसुतांची श्रावण महिन्यात प्रकृती बिघडली.. स्वामींना हे समजताच सुतांनी अक्कलकोट येथे यावी अशी सूचना केली.. परंतु ते आले नाही.. तेव्हा स्वामींनी शिवुबाईस पाठविले.. तरीही सुत आले नाही.. त्यानंतर श्रीपाद भट ..कृष्णाप्पा यांस पाठविले.. पण स्वामीसुतांचा संकल्प दृढ होता.. शेवटी देवजी माळी यांस सांगितले कि, “अरे त्याला बांधून तरी घेवून ये !! ” पण तरीही स्वामीसुत आले नाही.. इतके बोलावून सुद्धा स्वामीसुत येत नाही हे बघितल्यावर.. शेवटी स्वामी बोलले कि, “ तोफ लावुन तयारी करवून ठेवली आहे.. आता आला तर बरे.. नाही तर झोपडी उडवुन लावतो..!! ” स्वामी भक्त हो !! ह्याचा अर्थ उघड होता.. परंतु स्वामीसुत मृत्यला सुद्धा घाबरले नाही.. आणि शेवटी श्रावण वद्य प्रतिपदेस स्वामी सुतांनी देह विसर्जित केला.. स्वामी भक्त हो !! स्वामीसुतांनी देह विसर्जित केल्यानंतर.. तेथील भक्त मंडळीस किती दु:ख झाले असेल ह्याची कल्पना आपणा सर्वांना आलीच असेल.. पुढे स्वामीसुतांस देवाज्ञा झाल्याची तार अक्कलकोट येथे आली.. तारेचे पाकीट स्वामींच्या समोर ठेवले.. आणि स्वामींनी ते काकूबाई समोर ठेवले.. काकूबाईस कोणीही तार वाचून दाखवली नाही.. परंतु स्वामींच्या विचित्र लीलां मधून त्याचा अर्थ स्पष्टच जाणवत होता.. त्या दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये विचित्र लीला करत होते.. स्वामींनी पलंगावरून धडकन अंग जमिनीवर टाकले.. आणि कपाळाला हात लावुन जमिनीवर बसले.. तेथून ओंडक-यांच्या वाड्यात गेले.. ओंडकर स्वामींना बोलले “स्वामी ,स्नान करता ना ? ” तेव्हा स्वामीनी ‘होय’ बोलुन स्नान केले परंतु स्वामींनी अंगच पुसले नाही.. स्वामी आपल्याच हाताने भस्म घेवून सर्व अंगास लावत होते.. गंध लावुन देत नव्हते.. आरती ओवाळुन घेत नव्हते.. अर्थात स्वामीसुतांस देवाज्ञा झाली आहे.. हा स्वामींच्या कृतीचा अर्थ सर्वांचा अगदी स्पष्टच उलगडला होता.. स्वामी भक्त हो !! सहाजिकच जेव्हा वरील बातमी काकूबाईस स्पष्ट समजली तेव्हा त्या माउलीची काय हाल झाली .. तिला किती दु:ख झाले होते ह्याची कल्पनाच करवत नाही.. असो. परंतु स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज आई आहे.. काकूबाईस किती दु:ख झाले असेल ह्याची कल्पनास स्वामींना होतीच.. आणि म्हणूनच दहा दिवस सुतकी असतांना सुद्धा स्वामींनी काकूबाईस सोडले नाही.. त्यांचे सतत समाधान करत.. काकूबाई बोलल्या “महाराज , तुमच्या पदरात स्वामी सुतांस घातले असता.. असे का झाले ? ” काकुबाईने असे विचारताच स्वामी बोलले “नाही गं ! त्याला मोठ्या जागेवर पाठविला आहे.. रडु नकोस !! ”. अशा प्रकारे स्वामी महाराज काकुबाईचे भरपूर प्रकारे समाधान करण्याचा प्रयत्न करत होते.. परंतु आईच ती.. तिचे कितपत समाधान होईल !! असो. स्वामी महाराज परब्रम्ह मूर्ती असून सुद्धा सर्वांसाठी सामान्य मनुष्या प्रमाणे वर्तन करत होते.. थोडक्यात भक्ती अवतार स्वामीसुतांनी स्वामींची अनन्य भक्ती केली.. असंख्य लोकांना अनन्य भक्तीचा प्रसाद वाटला.. निश्चितच जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत.. तो पर्यंत स्वामीसुतांची कीर्ती असणार ह्यात शंकाच नाही ..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| स्वामी बोध ||
आजच्या लीलेतून असंख्य बोध येत आहेत.. परंतु आपण आज आपणास जितका पचेल रुचेल तितकाच प्राशन करण्याचा प्रयत्न करू या !! स्वामी भक्त हो !! स्वामींचा अवतार हा समस्त मानवाच्या कल्याणासाठी झालेला.. आणि ह्या अनुशंघाने स्वामींनी असंख्य भक्त घडविले.. स्वामींच्या प्रत्येक भक्त म्हणजे आदर्शाचा सूर्यच होता.. स्वयंप्रकाशित.. जसे साईबाब असतील.. गजानन महाराज असतील.. शंकरमहाराज असतील.. वगैरे असे असंख्य भक्त होते.. ह्या सर्वांना निर्गुण निराकारत्वाची समज देवून त्यांच्यावर विविध कामगिरी सोपवून कार्य करण्याची आज्ञा दिली.. आणि त्यांनी केले सुद्धा.. ह्यातीलच श्री स्वामीसुत हे पात्र म्हणजे सगुण भक्तीची उच्चतम अवस्था सिद्ध करणारे सूर्य होते… स्वामीसूतांना.. स्वामींच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची पूर्ण समज असतांना सुद्धा.. स्वामींची “सगुण भक्ती” करणे.. आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सगुण भक्तीचा उच्चतम आदर्श निर्माण करणे.. हे स्वामीसुतांच्या पात्राचे कार्य होते.. आणि त्यांनी ते संपूर्णपणे निभावले सुद्धा.. आणि स्वामीसुतांनी शरीर त्यागण्याची लीला करून.. सगुण स्वरूप स्वामींप्रती असणाऱ्या प्रेमाची उच्चतम अवस्थेचा आदर्श लाखो पिढ्यासमोर ठेवला आहे.. खरतर हा खूप खोल विषय आहे.. परंतु आज आपणास आजच्या पिढीसाठी ह्या लीलेतून.. स्वामीसुतांचे स्वामींप्रती असलेल्या उच्चतम प्रेमभाव अवस्थेचा आदर्श घ्यायचा आहे.. हा उच्चतम प्रेमभाव आपल्याला आपल्या दैनदिन जीवनात आणायचा आहे.. आज आपणास स्वामींनी जे पात्र दिले असेल.. जो रोल दिला असेल.. जी जबाबदारी दिली असेल.. मग ती वैयक्तिक असेल.. कौटुंबिक असेल.. सामाजिक असेल वा ह्याही पेक्षा उच्च असेल.. आपले प्रामाणिक कर्म करत.. त्या सर्वांमध्ये आपल्याला स्वामी प्रेमाची उच्चतम अवस्था साध्य करायची आहे.. निश्चितच जसे स्वामींनी काकूबाईस सांगितले अगदी तसे स्वामी महाराज हे आश्वासन देत आहेत कि, अनन्य भक्ती केल्यास मोठी जागा भेटते.. म्हणजेच उच्चतम स्थिर.. शाश्वत परमाआनंदाची अवस्था प्राप्त होते ह्यात शंकाच नाही.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! तु निर्गुण निराकार आहेस.. परंतु ह्या मनाला तुझे सगुण स्वरूपच खूप भावते.. ह्या हृदयात तुझ्या निर्गुण अनुभवावर स्थिर ठेवून.. चित्त सगुणावर एकरूप कर.. हे चित्त इतके एकरूप कर कि, चराचरात तूच दिसू दे.. तुझीची मूर्ती दिसू दे.. तुझ्याच लीला दिसू दे !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News