स्वामींना बघुन,चीनी जोडपे स्वामींची थट्टा करू लागते..ते आपापसात बोलू लागतात कि, “हा भगवा वेश धारण करणारा.. कोणी सैतान आहे कि राक्षस कि पिशाचमय वृत्ती दिसणारा जादुगर आहे..?

Dec 2, 2021

|| स्वामी लीला ||
आपले स्वामी महाराज असीम अनंत सर्वव्यापक परमचैतन्य आहे.. हे परमचैतन्य सगुण रुपात भक्तांच्या उद्धारासाठी नित्य भ्रमण करत होते.. अक्कलकोट मध्ये येण्यापूर्वी स्वामी महाराज हिमालय पर्वतावर वास्तव्य करत होते.. एके दिवशी तेथे एक चीनी जोडपे.. औषधी वनस्पती शोधण्यासाठी येतात.. औषधी वनस्पती शोधत असतांना ते एका गुहे जवळ येतात.. आणि त्याच गुहेत स्वामी महाराज स्वस्वरुपानंदात निमग्न झालेले असतात.. स्वामींना बघुन हे चीनी जोडपे स्वामींची थट्टा करू लागते.. ते आपापसात बोलू लागतात कि, “हा भगवा वेश धारण करणारा.. कोणी सैतान आहे कि राक्षस कि पिशाचमय वृत्ती दिसणारा जादुगर आहे..? ” अशी चित्र-विचित्र थट्टा करत ते पोटधरून हसू लागतात.. त्या नंतर ते दोघेही वृक्षाच्या आड जावुन कामच्छेदेने विनोद करू लागतात.. आणि त्याच वेळेला चमत्कार घडतो.. त्या चीनी स्त्रीची आकृती नाहीशी होऊन.. ती पुरुषाकृती दिसू लागते.. आता मात्र दोघांनाही समजले कि, आपण त्या गुहेत बसलेल्या यतीश्वराची मान मर्यादा न ठेवता.. गैरवर्तन केले.. आणि हा त्याचच कोप आहे.. म्हणून दोघेही स्वामींच्या जवळ आले.. आणि पश्चतापपूर्वक स्वामींचे चरण धरले.. आणि गडबडालोळत स्वामींना प्रार्थना करू लागले कि, “ महाराज आम्ही मुर्खपनाने आपले सामर्थ्य न ओळखून.. काममदाने पुष्कळ थट्टा निंदा केली..आम्हाला आमच्या कृतीची शिक्षा भेटली आहे.. कृपा करून स्त्रीचा देह पूर्ववत करा हि विनंती..!! ” स्वामींना केलेली प्रार्थना ऐकताच स्वामी महाराज पोटधरून मोठ मोठ्याने हसू लागले.. आणि त्यांना खरोखर पश्चाताप झालेला बघुन.. स्वामींना त्यांची द्या आली.. आणि मात्र त्या स्त्री कडे अमृतदृष्टीने बघितले.. तोच पुन्हा चमत्कार झाला.. आणि ती स्त्री पुर्ववत झाली.. त्या नंतर दोघेही स्वामींना शरण गेले.. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येवू लागले.. आणि स्वामींची पुष्कळ स्तुती करून म्हणू लागले कि, ” महाराज आता.. आम्हा बालकांवर कृपा करा.. आम्हा अनाथांचा उद्धार करा..!! ” . त्या नंतर दयाघन स्वामींनी त्यांना उठवले आणि बोलले कि, “ जा आता आमचे चिंतन करा.. आमची सेवा करा.. म्हणजे तुमचा नक्कीच उद्धार होईल..!! ” स्वामींची हि अभयवाणी ऐकून दोघेही आनंदित झाले.. स्वामी कृपेची हि शिदोरी घेवून ते आपल्या घरी आले.. स्वामींची अनन्य भक्त करू लागले.. पुढे स्वामी कृपेने त्यांना मुलं झाली.. त्यांचा संसार सुखाचा झाला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||
आजची लीला आजच्या पिढीसाठी अतिशय मार्गदर्शक आहे.. आजच्या लीलेतून स्वामी आपणास खूप छान समज देत आहेत.. स्वामी भक्त हो !! पृथ्वीवरील ह्या जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येक मानव हा विविध पात्र निभावत आहे… जेव्हा तो घरात असतो.. तेव्हा कोणाचातरी मुलगा असतो.. मुलगी असते.. कोणाचातरी भाऊ असतो.. बहीण असते.. वा पिता असतो किवा मातेचा रोल निभावत असतो.. आणि जेव्हा तो समाजात जातो तेव्हा मित्र असतो वा नातेवाईक असतो.. कामगार असतो.. अधिकारी असतो वा संस्थेचा मालक असतो.. असे कितीतरी रोल निभावत असतो.. अर्थात स्वामींनी आपल्याला अनेक रोल दिलेले आहेत.. आणि हे रोल उत्कृष्ट निभावण्यासाठी त्यासाठीचे गुण-कौशल्यच्या शक्ती दिलेल्या आहेत.. जसे आपण शिक्षकाचे पात्र निभावत असाल तर आपल्याला ‘ शिकवण्याची कला ’,‘ ग्रहण शीलता ’ आदी गुण- कौशल्याची शक्ती आपणास असणारच.. थोडक्यात प्रत्येक पात्र उत्कृष्ट व्हावे ह्यासाठी निसर्गाने आपल्याला शक्ती दिलेल्या आहेत.. जो जितकी शक्ती वापरेल.. जितके गुण कौशल्य विकसित करेल तितके त्याचे पात्र उत्तम होईल.. असो. स्वामी भक्त हो !! हे सर्व ह्यासाठी सांगण्यात येत आहे कि, ह्या सर्व शक्ती आपल्याला स्थिर शाश्वत टिकवायच्या असतील.. तर आपल्याला त्या पात्राची पावित्र्यता टिकवून ठेवावी लागेल.. आणि त्यासाठी आपल्याला पहिली पायाभूत शक्ती ग्रहण करावी लागेल.. त्या शक्तीचे नाव आहे.. “ मान-मर्यादेची शक्ती ”. बघा !! आजच्या लीलेत ते चीनी जोडपे विवाहित होते.. परंतु स्वामींच्या समोर त्यांनी आपल्या मान-मर्यादा पाळल्या नाहीत.. काममदाने ते आंधळे झालेले होते.. तेव्हा स्वामींनी योग शक्तीने त्या चीनी स्त्रीचे पुरुषाकृतीत रूपांतरण करून… त्यांच्यासह भविष्यातील लाखो पिढ्यासाठी स्पष्ट शिकवण दिली कि, “ जर आपण आपल्याला भेटलेल्या पात्राच्या मान-मर्यादाचे उल्लंघन केले तर निसर्गाने आपणास दिलेल्या शक्तीचा ह्रास होतो..” जसे त्या स्त्री मध्ये असणाऱ्या ‘स्त्री’ त्वाच्या शक्तीचा ह्रास झाला.. म्हणून आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता.. जर आपल्याला कोणते पात्र निभवण्यात अपयश येत असेल तर वा त्या पात्राचा अभिव्यक्तीचा आनंद घेता येत नसेल.. तर आपल्याला आत्मपरीक्षण करायचे आहे कि, हा रोल करत असतांना मी कोठे कोठे मर्यादाचे उल्लंघन करतो आहे.. जसे आपण विद्यार्थी असाल आणि जर आपण त्या शिक्षकाचा अनादर करत असाल.. तर आपण ‘विद्यार्थी’ ह्या पात्राच्या मान-मर्यादेचे उल्लंघन करत आहात.. आणि ह्यामुळे त्या शिक्षकाच्या शरीराद्वारे निसर्ग आपणास जे ज्ञान देवू इच्छितो.. त्यात अडथळा निर्माण होतो.. आणि ते ज्ञान आपल्या पर्यंत येत नाही.. थोडक्यात आपल्याला भेटलेल्या जीवनात असलेल्या विविध पात्रांची मान-मर्यादा पाळून त्याची पावित्रता जोपासायची आहे.. ह्याने आपल्यात नैतिकतेची शक्ती वाढते.. आणि ह्या शक्तीने अशक्य शक्य होते.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परम पित्या !! तु आम्हाला पृथ्वीवर पाठवले.. इथे आम्हाला पिता-पुत्र-बंधू-मित्र वगैरे विविध पात्र दिले.. ह्यासाठीच्या गुण – कौशल्य रुपी शक्ती दिल्यात.. समर्था तुला कोटी कोटी धन्यवाद !! आता आमचे इतकेच मागेने आहे कि, आम्हाला ह्या पात्राच्या मान-मर्यादेचे पालन करण्याची शक्ती दे..!! ह्या पात्राची पावित्र्यता टिकवण्याची शक्ती दे !! हे स्वामी गुरुराया !! तु माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News