मुंबई – हंगामा प्ले या आघाडीच्या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मने टचवूड एंटरटेनमेंट लि. या भारतातील पहिल्या वहिल्या नोंदणीकृत इव्हेंट व्यवस्थापन कंपनीच्या सहकार्याने भारतातील पहिला डिजिटल मेकअप रिअलिटी शो ‘मेक मी अप’ जाहीर केला आहे .
१० डिसेंबर पासून सुरू झालेल्या या रिअलिटी टॅलेंट हंटमध्ये तरुण मेकअप कलाकारांना त्यांची कला, व्यक्तिमत्त्व आणि नाविन्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रपातळीवर झालेल्या ऑडिशनमधून सहभागींची निवड करण्यात आली होती. पहिल्या आठ एपिसोड्समध्ये दोन मेकअप कलाकारांमध्ये स्पर्धा होईल. सर्व आठ भागांच्या विजेत्यांपैकी नंतर चार जणांची निवड केली जाईल व ते उपांत्य फेरीत जातील. अखेरीस दोन जणांची अंतिम फेरीसाठी निवड होईल व ‘मेकमीअप आर्टिस्ट ऑफ द इयर जाहीर केले जातील
या कार्यक्रमाची निर्मिती टचवूड एंटरटेनमेंट लिमिटेडतर्फे केली जाणार असून या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करूण पुंछी करत आहेत.
मेक मी अप हे ग्लॅमर आणि शान, नाट्य यांनी परिपूर्ण असेल. ही मालिका उदयोन्मुख मेक- अप कलाकार तसेच ट्युटोरियल्स पाहाण्यासाठी मेकअप चॅनेल्सपुढे बसणाऱ्या तरुण प्रेक्षकांसाठी आहे. या शोमधील परीक्षकांमध्ये सौंदर्य व फॅशन क्षेत्रातील नामवंतांचा समावेश असेल. या शोमधील एक परीक्षक आणि मेक अप क्षेत्रातील तज्ज्ञ चांदनी सिंग शोमध्ये कायम दिसतील व त्यांच्यासोबत त्या विशिष्ट एपिसोडच्या संकल्पनेनुसार एक पाहुणा परीक्षक शोमध्ये दिसेल. एकनिष्ठ आणि मोठे सोशल मीडिया फॉलोइंग असलेले परीक्षक त्यांचे कौशल्य दाखवतील तसेच सहभागींना मार्गदर्शन करतील. परीक्षकांमध्ये अनू कौशिक, गुनीत विरदी, लीना भूषण, क्रीती डीएस, साहिल मल्होत्रा, गोमित चोप्रा, ईझा सेठिया, चांदनी गिरधर, प्रतीक सचदेवा, परम साहिब यांचा समावेश असेल.
हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की हंगामामध्ये आम्ही सातत्याने वेगवेगळ्या आणि गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टी मांडायला आवडतं. टचवूड एंटरटेनमेंट लि. बरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यांच्या मेक मी अप या शोमुळे सध्या वेगाने विकसित होत असलेल्या सौंदर्य क्षेत्राला भरपूर प्रसिद्ध मिळाली आहे. वास्तविक संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांचे प्रमाण वाढले असून स्क्रिप्टेड रिअलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यामुळे आम्हाला वैविध्यपूर्ण आणि दमदार कंटेट तयार करणे शक्य होईल. या प्रकारचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आकर्षित करेल, कारण यात त्यांना आपलेसे वाटणारे इन्फ्लुएन्सर्स सहभागी होणार आहेत. लिनियर टेलिव्हिजनच्या विश्वात ही संकल्पना अगदी योग्य बसते, कारण रिअलिटी टीव्ही आवडणारे विविध नवीन प्रेक्षक ट्यून इन करतील. मेक मी अपमुळे फॅशन आणि सौंदर्य क्षेत्र प्रकाशझोतात येणार असून आम्ही प्रेक्षकांपर्यंत अनोख्या कहाण्या पोहोचवण्यासाठी वैविध्यपूर्ण आशयनिर्मिती करत राहू.
मेकमीअपच्या संस्थापक आणि टचवूड एंटरटेनमेंट लि.च्या क्रिएटिव्ह संचालक कनिका बबलानी म्हणाल्या की पहिल्यावहिल्या डिजिटल मेकअप रिअलिटी शोसाठी हंगामा ओरिजनल्सबरोबर सहकार्य करताना मेकमीअपला आनंद होत आहे. मेकमीअपच्या मदतीने प्रेक्षकांना काहीतरी अनोखे व खास देणे आम्हाला शक्य झाले आहे. सौंदर्य क्षेत्र वैविध्यपूर्ण आहे आणि विविध प्रकारच्या उदयोन्मुख मेकअप कलाकारांना ओळख मिळवून देत आहे. हा शो सर्व सौंदर्य सेवा पुरवठादारांचे स्टिरिओटाइप तोडेल तसेच त्यांना आपले टॅलेंट व कौशल्य मांडण्याची संधी देईल.






