|| स्वामी लीला ||
स्वामींच्या लीलांची ख्याती सर्वदूर पसरत होती.. असंख्य भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत होते.. ह्यातील पुण्यातील एक कर्वे नावाचे गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले.. अक्कलकोट मधील पवित्र वातावरण बघुन ते भारावूनच गेले.. त्यांनी अक्कलकोट नगरीत जवळ जवळ चार दिवस मुक्काम केला.. स्वामींच्या लीलां बघत असतांना असेच एके दिवशी ते स्वामींच्या दर्शनासाठी आले.. आणि स्वामींना प्रश्न केला “ महाराज आपली ज्ञाती कोण ? ” तेव्हा स्वामींनी.. ” आमचे नाव नृसिंहभान आहे..” असे वगैरे वगैरे सांगून बोलले “ अरे.. पुन्हा विचारशील तर टाळक्यात पायपोस घालीन आणि काय रे !! तुझी फटाकडी पोरगी पुण्यात दुष्कर्म करते.. तिची ज्ञाती कोण ? ” असे ऐकताच कर्वे खाली मान घालून रडायलाच लागले.. स्वामींच्या समोर साष्टांग दंडवत घालून बोलु लागले कि, “महाराज आपण साक्षात नि:संशय परब्रम्ह मूर्ती आहात.. आता मी काय करू ? अपकीर्तीपेक्षा मरण बरे !! ” यावर स्वामी महाराज बोलले “ अरे.. रोता क्यों है ? जाव होली करो..!!! ” स्वामींची हि वाणी ऐकून कर्वेंनी पायवर डोके ठेवले.. आणि पुण्याला निघून गेले.. स्वामी भक्त हो !! प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या कर्माचे फळ भोगतो आहे.. कर्वेंच्या मुलीचे कर्माचे फळ काय येणार.. हे स्वामींनी आगोदरच सांगितले होते आणि त्याच प्रमाणे घडले.. पुढे होळीच्या दिवसातच त्यांची मुलगी मरण पावली !! आणि त्या नंतर कर्वेंना खऱ्या अर्थाने स्वामी वाणीचा अर्थ उलगडला..!! स्वामींच्या लीला अतर्क्य आहेत.. स्वामींच्या प्रत्येक कृतीत शिकवण होती.. समज होती…!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| बोध ||
आजच्या लीलेतून स्वामी आपणास खूप छान बोध देत आहेत.. आजच्या लीलेत कर्वे जेव्हा स्वामींना ज्ञाती विचारतात.. ओळख विचारतात.. अर्थात त्यांचा उद्देश स्वामींना जात-पात धर्म वगैरे विचारणे असा होता.. परंतु स्वामींनी त्यांना उत्तर देवून.. उलट अंत:साक्षीत्वाने त्यांच्या मुलीबद्दलचे दुष्कर्म सांगून.. त्यांच्या मुलीची ज्ञाती विचारली.. त्या मुलीची ओळख विचारली.. स्वामी भक्त हो !! हे उलटपक्षी विचारण्याचा स्वामींचा असा उद्देश होता कि, तुम्ही इतके सात्विक आहात.. तर तुमची मुलगी दुष्कर्म करणारी आहे.. मग सांगा तुमची ओळख काय ? आणि अर्थात स्वामींनी ह्यातून त्यांना स्पष्ट संकेत दिला कि, प्रत्येकाची ज्ञाती.. त्याची ओळख हि त्याच्या त्याच्या कर्माने तयार होते.. आणि त्या कर्माचे फळ येते.. आणि बघा !! “ अरे.. रोता क्यों है ? जाव होली करो..!!! ” ह्या स्वामी वाणीतून कर्वेंच्या मुलीला तिच्या कर्माचे फळ काय येणार हे सांगितले… आणि हे सांगून.. आपण जे कर्म करतो.. त्याचेच फळ भेटते.. आणि हे फळच आपली ओळख निर्माण करत असते हि समज दृढ केली.. म्हणून स्वामी भक्त हो !! आज आपणास आजच्या पिढीसाठी बोध घेता.. “ आपली ओळख हि आपल्या कर्मांनीच तयार होते.. हि समज दृढ करायची आहे.. आज आपली ओळख काहीही असू द्या.. ती जर बदलायची असेल तर आपल्याला आपल्या कर्मांवर काम करायचे.. भावनिक कर्म + वैचारिक कर्म + शरीराने प्रत्यक्ष कृती द्वारे केले जाणारे कर्म.. ह्यात अखंडपणा ठेवायचा आहे.. ताळमेळ ठेवायचा आहे.. आणि आपले प्रत्येक कर्म हे स्वामीसेवा म्हणून करायचे आहे.. आणि जेव्हा आपण आपले कर्म स्वामीसेवेच्या भावनेने करू तेव्हा येणारे कर्माचे फळ हे साधेसुधे फळ नसून ते महाफळ असते..!! ” चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! आपली ओळख हि आपल्या कर्मांनी होते.. ह्या जीवनाच्या सिद्धांताची ओळख करवून दिली.. समज दिली तुला धन्यवाद !! निश्चितच आमचे प्रत्येक कर्म आम्ही स्वामीसेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करू आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करू.. स्वामी आजच्या कृपेसाठी धन्यवाद !! धन्यवाद !! धन्यवाद !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






