कृणाल म्युझिकची लग्नगीतांची मेजवानी

Dec 19, 2021

‘वडाला फुटलाय पान’ आणि ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ ही दोन धमाल गीते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

nashik : कृणाल म्युझिकने आजवर विविध प्रकारची गाणी तयार करून ती यशस्वीरीत्या रसिकांपर्यंत पोहचवली आणि रसिकांनीही त्याचे जोरदार स्वागत केले आहे. लग्नसराईच्या हंगामात बहारदार लग्नगीतांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना नेहमीच मिळत असते. येत्या हंगामासाठी हीच मेजवानी रसिकांना देण्यासाठी कृणाल म्युझिक दोन नवीन लग्नगीते घेऊन येत आहेत. ‘वडाला फुटलाय पान’ आणि ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ ही दोन धमाल गीते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गायक अनिमेष ठाकूर आणि साक्षी चौहान यांच्या आवाजातील ‘वडाला फुटलाय पान’ हे गीत राज ईरमाली यांनी लिहिले असून डिजे गणेश यांनी संगीत संयोजन केले आहे. पारंपरिक बाजातील हे धम्माल लग्नगीत रसिकांना नक्की ताल धरायला लावणार आहे. दुसरं श्रवणीय गीत ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ हे लवकरच कृणाल म्युझिक वर येत आहे. साहिल मोरे लिखित या गाण्याला चंद्रजीत कांबळे यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच स्वर विवेक नायर यांचे आहेत. नुकतेच या गीताचे चित्रीकरण पार पडले असून ते रसिकांना कृणाल म्युझिकवर लवकरच पहायला मिळणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘अल्ट्रा नेहमीच नवीन प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करत विविध सांगितीक प्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधत असते. रसिकांच्या आवडीनिवडी जोपासत निर्मिती करण्याकडे कायम आमचा कल असतो. ही दोन्ही गीते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News