‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा शिवरायरूपात झळकणार चिन्मय

Dec 24, 2021

नाशिक : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’
या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक नुकताच रिव्हील करण्यात आला असून, पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात रसिकांचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकला आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर. ‘पावनखिंड’ साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे.

ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर दिग्पालनं लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये महाराजांची दोन भिन्न रूपं पहायला मिळाली आहेत. आता ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा महाराजांची तळपती तलवार रसिकांना पहायला मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News