महेश मांजरेकरांची चौकार षटकाराची आतीषबाजी

Dec 24, 2021

नाशिक : झी टॅाकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मागील दहा वर्षांमधील कलाकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सुवर्णदशक सोहळ्यातही सूत्रसंचालन हा मुद्दा लाइमलाईटमध्ये राहिला.. मांजरेकरांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत जोरदार फटकेबाजी करत सोहळयात रंगत आणली.

शाब्दिक फटकेबाजी करण्याची महेश मांजरेकरांची कला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयामध्ये पुन्हा एकदा पहायला मिळाली. पहिला तडाखा अर्थातच स्वप्नील-अमेय जोडीलाच बसला. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयाचं सूत्रसंचालन करताना एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दोघांची ‘तू तू मैं मैं’ सुरू असताना प्रेक्षकांमधून मांजरेकरांचा आवाज आला आणि दोघंही काही क्षणासाठी अवाक झाले त्यानंतर महेश मांजरेकरांच्या विंनतीला मान देत ते जे बोलतील ते दोघांनीही मान्य केलं. त्यानंतर काही वेळ मांजरेकरांनी स्वत: मुख्य सूत्रसंचालनाचा लगाम स्वत:च्या हाती घेतला. यात त्यांनी वार्षिक बुलेटीन सादर केलंच, पण त्यासोबतच ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पहिल्या पुरस्कार सोहळयापासूनच्या जुन्या आठवणींनाही सुखद उजाळा दिला. सुवर्णदशक सोहळा रविवार २६ डिसेंबरला सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर प्रसारित होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News