आपले स्वामी बोलतात…….“अरे बच्चा !! तुला काय झाले ? जा.. जा आपल्या जातीबांधवात जा !! ” स्वामी भक्त हो !! त्या नंतर आश्चर्य घडले.

Dec 31, 2021

|| स्वामी लीला ||

स्वामी महाराज लोककल्याणसाठी सतत भ्रमण करत.. वाटेल तिथे जात.. वाटेल त्या सेवेक-याकडे भोजन करत.. स्वामींच्या प्रत्येक चालण्या बोलण्यात बोध होता.. मार्गदर्शन होते.. लोकांचा उद्धार होता.. गुरुलीलामृतकार खूप छान वर्णन करतात.. सर्व जातीच्या प्राणीमात्रांवरी ! समान दृष्टीने श्रीगुरु नरहरी !! द्या करिती प्रेमभरी ! चालता वृक्षांसी भेटती !! गुरुगोडी ओढीत मार्गे चालावे ! आपल्याशीच बोलावे हसावे !! झाडांवरूनी दगडांवरुनी पाय फिरवावे ! म्हणावे काय पाहिजे तुम्हा !! – (गुरूलीलामृत अ.४८ ओ.२६,२७) पुढे एके दिवशी महाराजांची स्वारी मालोजीराजेंच्या राजवाड्यात होती.. तेथे स्वामी महाराज चोपाळ्यावर बसलेले होते.. त्याच वेळी अप्पा सलब देव्हा-यात देवपूजेसाठी चंदन गंध उगाळत होते.. तेवढ्यात तिथे एक उंदीर आला.. आणि तो निरांजानीतील फुलवात खाऊ लागला.. त्या वेळी उंदरांचा उपद्रव खूपच वाढलेला असल्याने अप्पांना खूपच राग आला.. आणि त्यांनी रागाने हातातील चंदनाचे खोडच त्या उंदराला फेकून मारले.. आणि त्या उंदराला एका दमातच मारून टाकले.. उंदीर मेल्यानंतर त्यांनी त्याची शेपटी पकडली आणि बाहेर फेकण्यासाठी निघाले.. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले.. आणि त्यांच्याकडे बघुन बोलले “अरे.. तो उंदीर इकडे आण !! ” असे स्वामी बोलले.. स्वामींनी असे बोलताच.. आप्पांनी उंदीर स्वामींकडे दिला.. त्या नंतर स्वामींनी त्याच्या कडे मोठ्या प्रेमाने बघितले.. आणि ज्या चोपाळ्यावर बसलेले होते.. त्या चोपाळ्याच्या कडयांतून पाच दहा वेळा काढ घाल केली.. आणि मग त्याला मोठ्या प्रेमाने हातात घेतले आणि त्याकडे बघुन बोलले “अरे बच्चा !! तुला काय झाले ? जा.. जा आपल्या जातीबांधवात जा !! ” स्वामी भक्त हो !! त्या नंतर आश्चर्य घडले.. मृत झालेला उंदीर जिवंत झाला.. आणि टूनकण उडी मारून पळून गेला.. मालोजीराजें सह इतर मंडळी हा सर्व प्रकार बघत होती.. ह्या अनंत कोटी ब्रम्हांडाचे सत्ताधीश स्वामीच आहेत.. हि समज सर्वांना भेटली.. आणि सर्वांनी एक घोषात स्वामींचा जयजयकार केला..!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजच्या लीलेतून स्वामी आपणास असंख्य बोध देत आहेत.. पैकी वेळेचे आणि जागेचे भान ठेवता आज आपल्यासाठी आजच्या पिढीसाठी स्वामी जो बोध देत आहेत.. तो समजावून घेण्याचा प्रयत्न करू या !! स्वामी भक्त हो !! आजच्या लीलेचे मनन चिंतन केले असता.. अप्पा हे देवघरात पूजा करत होते.. खरतर जेव्हा आपण ईश्वराची आराधना करतो.. पूजा करतो.. तेव्हा त्याचा खरा उद्देश असतो कि आपण आपल्या अंतरंगात.. हृदयात वसलेल्या परमआनंदा सोबत एकरूप व्हावे.. त्याला जाणून त्याचे गुण आपल्या जीवनात अभिव्यक्त करावे.. आणि ह्यासाठीच देवघर आहे आणि त्यातील मूर्ती आहे… आणि देव्हाऱ्यातील देवांच्या ज्या विविध मूर्ती आहेत.. ती प्रत्येक मूर्ती हि एकाच असीम अनंत परमचैतन्याच्या.. एकाचा परब्रम्हाच्या विविध गुणांचे संकेत देत असते.. जसे कुलदैवताची मूर्ती पित्याचे गुण दर्शवते आहे.. आपल्याला जबाबदारी नावाचा गुण शिकवते.. आणि ह्यासाठीची प्रेरणा म्हणून आपण कुलदैवताचे चरित्र वाचतो.. थोडक्यात जेव्हा आपण देवपूजा करत असतो.. ईश्वराची आराधना करत असतो.. त्याची आरती करत असतो.. त्याचा मुख्य उद्देश हा ईश्वराच्या गुणांचे गुणगान गावून.. त्या गुणांचे मनन चिंतन करून.. ते ईश्वरीय आपल्यात ग्रहण करून.. आपल्या रोजच्या जीवनात त्याची अभिव्यक्ती करणे होय.. स्वामी भक्त हो !! परंतु हे सर्व करत असतांना आपल्या जीवनात आजच्या लीलेत वर्णन केल्याप्रमाणे उंदरासारखे उपद्रवी व्यक्तिमत्व वा घटना येतात.. आणि आपण आपले मूळ धेय्य विसरतो.. आपल्या स्वभावापासून दूर जातो.. आणि जसे अप्पा स्वत:चा स्वभाव विसरले.. आपले धेय्य विसरले.. आणि क्रोधात त्या उंदराला मारले.. अगदी तसेच आपण सुद्धा नकारात्मक घटना वा लोकांमुळे विचलित होतो.. आणि सकारात्मक भावनेपासून.. ईश्वरभक्ती पासून दूर जातो.. आपल्या धेय्यापासून दूर जातो.. स्वामी भक्त हो !! हे अनंत कोटी ब्रम्हांड स्वामींचा देव्हारा आहे.. आणि आपले प्रत्येक कर्म स्वामी सेवा म्हणून करायाचे आहे.. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले कि, “जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी.. त्रास देणारे माणस वा नकारात्मक घटना घडत असतील.. तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा.. आपण सकारात्मक भावनेवर.. ईश्वरीय भावनेवर.. स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी.. स्वामी त्यांना जिवंत करत असतात.. हि अनन्य भक्तीची भावना बाळगा.. बघा !! एकदा कि आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो.. मग हे त्रास देणारे वा उपद्रवी आपोआप विलीन होतात.. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही..!! अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही !! ” स्वामी भक्त हो !! हा सर्व पसारा स्वामींचा खेळ आहे.. आपल्याला ह्या खेळात खिळाडूवृत्तीने सहभाग नोंदवायचा आहे.. आपण यशस्वी होणारच हा विश्वास ठेवायचा आहे.. कारण आपण स्वामींचेच बाळ आहोत..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “हे समर्था !! माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस.. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी.. माझी भक्ती अजून दृढ करण्यसाठी तूच ह्यांना पाठवत असतोस.. हे आई !! आज आम्हाला बाळांना हि समज दिली तुला धन्यवाद !! कोटी कोटी धन्यवाद स्वामी !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News