स्वामी समर्थांची पंढरपुरातील मोहाळ गावाची लीला..स्वामी बोलतात…“ भटजी तुमचे काम झाले आता.. घरी जा.. तुमच्या मुलाला घोड्यावर बसवा आणि समुद्रकिनारी पाठवा !! ”

Jan 13, 2022

|| स्वामी लीला ||

स्वामी महाराज पंढरपुरात तीन दिवस राहिले.. त्या नंतर ते थेट मोहोळ मध्ये आले.. मोहोळ गावाच्या जवळच एक ओढा असून.. तो परिसर निसर्गरम्य कलाकृतीने नटलेला होता.. त्या ओढ्याच्या बाजूलाच एक गुहा होती… त्या गुहेत स्वामी महाराज रहात असे.. स्वामींना अन्नपाण्याचे सुद्धा भान नसे.. जेव्हा भेटले तेव्हा खायचे.. आणि नाही भेटले तरी पर्वा नव्हती.. स्वामी मूर्ती त्या गुहेतच सतत स्वस्वरुपानंदात रममाण राहिलेली असत.. असो. इकडे मोहोळ गावात एक सात्विक ब्राम्हण रहात होता.. त्याचा अठरा वर्षाचा एकुलता एक मुलगा अचानक आजारी पडला.. तो ब्राम्हण आपला मुलगा बरा व्हावा म्हणून असंख्य वैद्य, हकिमांना दाखवतो.. परंतु काहीच फायदा होत नाही.. दिवसेंदिवस त्याच्या मुलाची परिस्थिती नाजूक होत होती.. कधीही काहीही घडू शकते अशी त्या मुलाची अवस्था झाली होती.. तेव्हा तेथील एका हितचिंतकाने त्यांना असा सल्ला दिला कि ,” गाव मध्ये कोणी एक संन्यासी फिरत असतो.. तुम्ही त्याला दाखवा !! ” तेव्हा त्या ब्राम्हणाने काही लोकांना पाठवून स्वामींचा शोध घेण्यास सांगितले.. परंतु स्वामींचा ठावठिकाणा काही सापडला नाही.. आता सर्वच चिंतातूर झाले होते.. तेव्हा इतक्यात एका बाईने “ आपल्याला तो संन्यासी कुठे राहतो ह्याची माहिती आहे..” असे सांगितले…!! असे बोलताच सर्वांना आधार आला.. परंतु मुलाची स्थिती खूपच बिकट असल्याने.. त्या ब्राम्हणाचा पाय काही घराच्या बाहेर निघत नव्हता.. तथापि मोठ्या हिंमतीने तो दोन चार मंडळींना घेवून.. त्या त्या बाई सोबत गावाबाहेरील गुहेच्या जवळ आला.. गुहेच्या द्वारावर आल्यानंतर सर्वांनी स्वामींना आर्ततेने प्रार्थना केली.. आणि मुलाला बरे करण्याची विनंती केली.. ह्या आर्ततेच्या प्रार्थना ऐकून.. दयाघन स्वामींनी स्वतःच्या हाताने गुहेच्या तोंडाशी असलेला दगड बाजूला केला.. आणि बाहेर आले.. त्या ब्राम्ह्णाच्या जवळ आले आणि त्याच्याकडे बघुन बोलले “ भटजी तुमचे काम झाले आता.. घरी जा.. तुमच्या मुलाला घोड्यावर बसवा आणि समुद्रकिनारी पाठवा !! ” हि स्वामी वाणी ऐकताच सर्व मंडळी एकदम शांत झाली.. तेव्हा ती बाई सर्वांना आधार देत बोलली “ काळजी नका करू.. साधूंच्या कृपाशीर्वादाने मुलगा नक्कीच बरा होणार आहे.. आपण आता त्वरेने घरी चला..!! ” स्वामी भक्त हो !! सर्व जण घरी आले.. घरी आल्यानंतर चमत्कार घडला.. मुलाची धाप एकदम बरी झाली.. आणि तो अगदी सहज श्वास घेवू लागला.. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच प्रसन्न आनंदी तेज दिसत होते.. आपल्या मुलगा बरा झालेला बघुन.. त्या ब्राम्हणाचा जीव भांड्यात पडला.. दुसऱ्या दिवशी तो मुलगा.. हिंडू फिरू लागला.. त्याच्या आरोग्यात एकदम झालेली सुधारणा बघुन सर्वांना आनंद झाला.. अहो !! तिसऱ्या दिवशी तर त्या मुलाला वस्त्रअलंकार नटवून.. घोड्यावर बसवून आपल्या आप्तजनाना सोबत घेवून तो स्वामींकडे आला.. मुलाला स्वामी चरणी घातले.. आणि अत्यंत मनोभावे स्वामी पूजन करून.. सर्वांनी एक घोषात स्वामींचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजच्या स्वामी लीलेतून स्वामी महाराज आपणास असंख्य बोध देत आहेत.. पैकी स्वामी महाराज आपणास “ उम्मीद , आशा ” नावाचा गुण धारण करण्याचा संकेत देत आहेत.. स्वामी भक्त हो !! “ उम्मीद ” नावाच्या गुणामध्ये खूप ताकद आहे.. उम्मीद म्हणजे स्वामींवर असलेला कृतीशील विश्वास होय.. उम्मीद म्हणजे अदृष्यात असलेली कृपा बघण्याची नजर.. बघा !! आजच्या स्वामी लीले मध्ये तो मुलगा शेवटच्या अवस्थेवर असतांना सुद्धा.. त्याच्या पित्याने उम्मीद ठेवली.. जे जे संकेत भेटतील त्या प्रमाणे प्रयत्न करत राहिले.. डॉक्टर-वैद्य – हकीम आदी लोकांना त्याने मुलाला दाखवले.. उम्मीदच्या शक्तीने त्यांच्या प्रार्थनेत बळ वाढत होते.. शेवटी त्यांना कोणीतरी स्वामींच्या बद्दल सांगितले.. स्वामीं भेटत नसतांना सुद्धा शोध कार्य सुरु ठेवले.. स्वामी भक्त हो !! हा त्यांचा प्रयास म्हणजे कृतीशील प्रार्थना होती.. आणि त्या प्रार्थनेचे उत्तर आले.. कोणा एका महिलेने स्वामींचा पत्ता सांगितला.. बघा !! स्वामींचा पत्ता भेटल्यानंतर इकडे मुलाच्या आयुष्याची अंतिम घटका सुरु झाली होती.. परंतु “ उम्मीद” नावाच्या गुणाने त्यांना बळ दिले आणि ते स्वामींकडे आले.. स्वामी भक्त हो !! ह्या “उम्मीद” मध्ये इतकी शक्ती आहे कि, स्वामींनी स्वतः गुहेचा दगड बाजूला केला.. आणि हाच संकेत दिला कि, “ भिऊ नका.. उम्मीद ठेवा.. मी तुमच्या पाठीशी आहे.. तुम्ही एक पाउल टाकले तर मी दहा पाउले टाकून तुमच्याकडे येतो आहे.. कृपा होते आहे..!! ” आणि पुढे त्याच प्रमाणे घडले.. त्या मुलाला नवीन आयुष्य भेटले.. इतकेच नव्हे तर स्वामींनी “मुलाला घोड्यावर बसवा आणि सागर किनारी पाठवा..” ह्या वाणीतून स्पष्ट आशीर्वाद देत सांगितले कि, तुमच्या मुलाला नवीन आयुष्य भेटले आहे.. त्याला सागर किनारी म्हणजेच लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी निमित्त करा.. सत्कर्मासाठी आयुष्य खर्च करा.. स्वामी भक्त हो !! थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी आजच्या लीलेतून बोध घेता… “ आज आपल्या जीवनात कितीही संकट असू द्या वा दु:ख असू द्या.. आपल्याला खचायचे नाही.. जरीही जीवनात अंधार दिसत असला तरीही ‘उम्मीद’ नावाचा गुण धारण करून.. आपले प्रयत्न करत रहायचे आहे.. त्या मध्ये कृतीशील विश्वास ठेवायचा आहे.. आणि स्वामींचे कर्म संकेत ओळखून प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे.. पूर्ण शक्तीनिशी करायचे आहे.. बघा आपण एक पाउल टाकले तर स्वामी आपल्याकडे दहा पाउल टाकून येत आहेत हा अनुभव येईल.. आपले संकट वा दु:ख सहज विलीन होईल.. ” चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! आज तु मला उम्मीद नावाच्या गुणाची समज दिली तुला धन्यवाद.. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही एक पाऊल टाकले तर तु दहा पाउले टाकून आमच्याकडे येतोस.. हि समज दिली.. हे स्वामी आई !! तुला अनंत कोटी धन्यवाद.. तुला अनंत कोटी धन्यवाद !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News