स्वामीवाणी.. स्वामींच्या दरबारात गाऱ्हाणे घेवून गेलो असता.. स्वामी दरबारात न्याय होतोच..

Jan 27, 2022

स्वामी बोलतात….” तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर.. या नदीपात्रात नक्षीदार कोरीव काम केलेला एक पाषाण आहे.. त्यावर जे लिहिलेले आहे ते नक्कीच पहा..!! ”

|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये येण्यापूर्वी रामेश्वरम येथे होते.. रामेश्वरम येथे शिवकांची आणि विष्णुकांची अशी दोन क्षेत्र आहेत.. हि दोन्ही गावे येथील वैष्णवांना इनाम म्हणून दिलेली होती.. त्यावेळी तेथील राजाने इनामपत्राचे पुरावे.. कागदपत्रे सादर करण्याचा हुकुम दिला.. आणि त्यानंतर त्या लोकांनी बरेचसे कागदपत्रे दाखवण्याच्या प्रयत्न केला.. परंतु ह्याने राजाच्या अधिकाऱ्यांचे काही समाधान झाले नाही.. आणि त्यांनी ती गावे जप्त करून सरकार जमा केली.. आता त्यातुन येणारे उत्पन्न सरकार जमा होऊ लागले.. येथील वैष्णवांचे उत्पन्नाचे सर्वच मार्ग बंद झाले.. आता पुढे कसे होणार ? असा प्रश्न सर्वांना पडला.. आणि त्याच वेळी शिवकांची मध्ये एक परमहंस संन्यासी आलेले आहेत.. हि बातमी त्या वैष्णवांना समजते.. आणि ते स्वामींच्या दर्शनासाठी येतात.. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आपली सर्व व्यथा स्वामींना सांगतात.. तेव्हा स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आणण्यास सांगतात.. आणि हा स्वामी हुकुम होताच.. ते वैष्णव महत्प्रयासाने अधिकाऱ्यांना स्वामींकडे घेवून येतात.. स्वामींनी त्यांना विचारणा केली असता.. अधिकारी स्वामींना बोलले कि, “ यांनी जहागिरीचे कागदपत्रे पुरावे दिले तर आमची काहीही तक्रार नाही.. यांना त्यांचे अधिकार आणि उत्पन्न पुन्हा देवु.. पण आम्हाला काहीतरी ठोस पुरावे हवे आहेत..!! ” अधिकाऱ्यांनी असे बोलताच.. स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले “ तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर.. या नदीपात्रात नक्षीदार कोरीव काम केलेला एक पाषाण आहे.. त्यावर जे लिहिलेले आहे ते नक्कीच पहा..!! ” स्वामींची आज्ञा होताच अधिकाऱ्यांनी काही लोकांच्या सहकार्याने नदी पात्रातील पाषाण बाहेर काढला.. आणि आश्चर्य झाले.. त्यावर प्राचीन लिपीत लिहिलेला एक शिलालेख होता.. आणि त्या शीलालेख मध्ये पूर्वजांच्या नावा सह.. शक, संवत्सर, मास , तिथी आणि वारा सह सर्व गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या होत्या.. त्या नंतर राजच्या अधिकाऱ्यांनी सर्व जहागिरी आणि अधिकार पुन्हा वैष्णवांना परत दिली.. स्वामी भक्त हो !! आता त्या वैष्णवांचा आनंद गगनात मावत नव्हता.. स्वामींच्या दरबारात गाऱ्हाणे घेवून गेलो असता.. स्वामी दरबारात न्याय होतोच.. सत्याचा विजय होतच असतो.. हा अनुभव त्यांना आला.. आणि सर्वांनी अनन्य भक्तीच्या भावनेत एकघोषात स्वामींचा जयजयकार केला..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजची लीला म्हणजे सर्वोच्च स्वामी कृपेची समज आहे.. आजच्या आलेत आपण बघितले कि, वैष्णवांची सत्य बाजु होती.. परंतु कागदोपत्री पुराव्यांच्या अभावामुळे त्यांच्यवर अन्याय होत होता.. कदाचित इतक्या पिढ्यांची जहागिरी त्यांना भेटलेली होती.. आणि ह्या धुंदीत कागदपत्र वगैरे पुरावे जपून ठेवण्याची त्यांना गरज भासली नसावी. आणि त्यामुळे त्यांना मनस्ताप सोसावा सुद्धा लागला.. असो… परंतु ते काहीही असले तरी त्यांची बाजु सत्याचीच होती.. आणि स्वामींनी सत्याला न्याय दिला.. स्वामींच्या दरबारात सत्याचा न्याय निवाडा होतोच.. सत्याचाच विजय होतो.. थोडक्यात आज आपणास आजच्या पिढी साठी आजच्या लीलेतून बोध घेता.. सतत लक्षात ठेवायचे आहे कि, स्वामींची सृष्टी.. हा निसर्ग विशिष्ट कायद्याने कार्य करत असते.. आणि प्रत्येकाचे जीवन ह्या कायद्यानेच घडते आहे.. ह्यात “आपण जे बीज पेरतो तेच उगवते ” म्हणजेच आपण जसे विचार करतो.. ज्या भावना मनात ठेवतो.. आपल्या अंतर्मनात जे विश्वास कोरलेले आहेत.. त्याप्रमाणे आपल्या जीवनात घटना.. माणस आकर्षित होत असतात.. स्वामी भक्त हो !! हे स्वामी कायदे सर्वांना सारखेच आहेत.. मग कोणी ज्ञानी असो वा अज्ञानी.. एखादा राजा असो वा एखादा भिकारी असू दे.. किंवा एखादा संत असू दे वा समाजात उपद्रवी असणारे लोक असू दे… स्वामींचा कायदा सर्वांना सारखाच आहे.. म्हणून आपण जर स्वामींना काही प्रार्थना केली असेल तर.. स्वामींच्या साम्राज्यात न्याय भेटतोच हि समज दृढ करा.. आणि आपल्या प्रार्थनेचे.. आपल्या कर्माचे फळ येणारच आहे.. इतकेच नव्हे तर हजारो पटीने वाढवून येणार.. आपल्याला यश भेटणारच हा अतूट अभेद्य विश्वास ठेवा.. आणि आपले ध्यान अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कर्मांवर एकाग्र करून.. कर्माचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न करा.. त्यात सकारात्मकभाव आणा.. भक्ती भाव आणा.. स्वामी भक्त हो !! लक्षात ठेवा !! एक वेळेस मानवाच्या न्यायालयात अन्याय होऊ शकतो.. परंतु स्वामींच्या न्यायालयात कधीच अन्याय होत नाही… आपल्या जीवनात जे काही घडते आहे.. ते स्वामी कायद्यांनी आपल्या जीवनात आकर्षित होत आहे.. म्हणून आपल्याला आपल्या कर्मांवर कार्य करायचे आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “हे गुरुराया !! हे अनंत कोटी ब्रम्हांडाचा न्यायाधीश तु आहेस.. तुला प्रार्थना करताच.. तुझ्या कायद्याप्रमाणे संबंधित गोष्टी आकर्षित व्हायला सुरुवात होते.. म्हणून हे आई सर्व प्रथम मला विवेक दे.. काय मागायचे कसे मागायचे ह्याचे ज्ञान दे.. ह्या तुझ्या खेळात तरबेज कर.. सृष्टीच्या कायद्यांची समज दे.. आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती कर..!! शेवटी जी तुझी इच्छा आता तीच माझी इच्छा !!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News