‘लोच्या झाला रे’ सिनेमा ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज !

Feb 1, 2022

नाशिक : अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. हा संपूर्ण सिनेमा लंडनमध्ये चित्रित करण्यात आला असून पहिल्यांदाच अंकुश, सिध्दार्थ आणि सयाजी शिंदे ही तिकडी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आता या चित्रपटात कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या होणार आहे, हे गुपित चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर नुकतेच या चित्रपटातील ‘मेरी गो राउंड’ हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे लेखन मंदार चोळकर यांनी केले आहे. अपेक्षा दांडेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे तर चिनार महेश यांनी गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या गाण्यात आपण जगत असलेले आयुष्य कसे गोल आहे हे सांगण्यात आले आहे. लंडनच्या कलरफुल रस्त्यांवर चित्रित झालेल्या गाण्यात अंकुश, सिद्धार्थ आणि वैदेही आयुष्याचे रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच आयुष्याचे मोल सांगणारे हे गीत आहे. रसिक प्रेक्षकांकडून या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी यामुळे कलाकारांसोबत संपूर्ण टीमला अनेक कसरती कराव्या लागल्या. एवढ्या आव्हानांवर मात करत आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

या सिनेमात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी सोबतच अभिनेते विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस या हरहुन्नरी कलाकारांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत. लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीजने पाहिले आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News