दत्तभूमी गिरनार पर्वतावरची स्वामी लीला ; पांगळा कसा लागला चालू !

Feb 9, 2022

आपले स्वामी बोलतात “ अरे रडतोस कशाला.. तुला माझे दर्शन घायचे आहे ना ? धैर्याने उठ.. मागे पुढे न पाहता. डोळे मिटून माझ्याकडे ये.. माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव.. !! ”

|| स्वामी लीला ||

स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी अनेक तीर्थस्थानी पदभ्रमंती करत भक्तांचा उद्धार करत होते.. आता स्वामी महाराज गिरनार पर्वतावर आले होते.. ह्या गिरनार पर्वताचे काय वर्णन करावे.. जेथे मुनी योगीव्रती तपी ! भक्त विरागी अनुष्ठानी जपी !! रोगी दु:खी त्रिविधतापी ! स्व स्वकार्यार्थी वसती ते !! ब्रम्हचारी संन्यासी गृहस्थ ! साधू संत महंत वानप्रस्थ !! व्हावयासी पूर्ण मनोरथ ! येती समस्त रावरंक !! गुरूलीलामृत (अ.१२ ओ.२४,२५) अशा निसर्गरम्य.. रमणीय असलेल्या आपल्याच पूर्वस्थानी श्री दत्त गुरु स्वामी महाराज प्रगट झाले.. येथे स्वामीं महाराज ‘हनुमानधारी’ जवळ वास्तव्य करत होते.. अनेक लोक स्वामींना बघत होते.. परंतु तेथे एका पांगळ्याची नजर स्वामीवर पडते.. स्वामींना बघताच का कुणास ठावूक.. त्याच्या मनात अनन्य भक्तीची भावना जागृत होते.. हे कोणी साधे सुधे संन्यासी नसून.. प्रत्यक्ष दत्त महाराज आहे असा भाव त्याच्या हृदयातून येतो.. आणि स्वामींना वंदन करण्याची त्याला तीव्र इच्छा होते.. परंतु तो पांगळा असल्याने तो जागचा हलू शकत नव्हता.. आणि तो बसल्या जागेवरूनच स्वामींना प्रार्थना करू लागतो “हे परमेश्वरा.. लोक अज्ञानवश आपल्याला ओळखत असो वा नसो.. पण मला माहित आहे कि आपण नि:संशय प्रत्यक्ष दत्त महाराज आहात.. मी जन्मापासून पांगळा आहे.. मी अनाथ आहे.. मला धड अन्नपाणी भेटत नाही.. देवदर्शनाची इच्छा असून हि दर्शन घेता येत नाही.. हेच बघा ना !! आता मला तुमचे चरण दर्शन घेण्याची इच्छा आहे.. पण मी जागचा हलू शकत नाही.. माझे पाय हलत नाही.. मला चालता येत नाही.. !! आता मी काय करू ? ” स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज प्रेरणेचा स्त्रोत आहे.. त्या अपंग व्यक्तीने अशी विनंती करताच स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले “ अरे रडतोस कशाला.. तुला माझे दर्शन घायचे आहे ना ? धैर्याने उठ.. मागे पुढे न पाहता. डोळे मिटून माझ्याकडे ये.. माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव.. !! ” स्वामी भक्त हो !! हा प्रकार सभोवताली असलेली मंडळी बघत होती.. त्यांना वाटले कि हे कोणी पोटभरू संन्यासी असतील.. हा पांगळा कसला चालेला.. परंतु त्या पांगळ्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला.. आणि अतिशय धैर्याने हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागला.. आणि चमत्कार घडला.. त्याच्या पाया मध्ये प्राण आले.. आणि स्वतःच्या पायाने चालत येत त्याने स्वामींचे दर्शन घेतले.. आता त्या पांगळ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळां वाहू लागले.. कृतज्ञतेच्या भावनेने तो ओतप्रोत भरून गेला.. हा चमत्कार बघुन तेथील मजा बघणारे लोकांना सुद्धा स्वामींची ओळख पटली.. स्वामी तर प्रत्यक्ष दत्तमूर्ती आहे हा विश्वास सर्वांना आला.. आणि तेही धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून गेले.. आणि सर्वांनी एकघोषात स्वामींचा जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजच्या स्वामी वाणीचा बोध अगदी स्पष्ट आहे.. आजच्या लीलेतून स्वामी खूप जबरदस्त प्रेरणा देत आहेत.. बघा !! एका अपंगाला स्वामींनी कशी प्रेरणा दिली.. आणि ह्या प्रेरणेने त्याच्या अंतर्मनातील इच्छाशक्ती कशी जागृत झाली.. आणि ह्या इच्छाशक्तीच्या बळाने.. विश्वासशक्तीच्या बळाने.. त्याच्या पायात जीव आला.. आणि तो चालु लागला.. स्वामी भक्त हो !! आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता.. आज जर आपणास काही संकट असेल वा दु;ख असेल.. वा आपणास काहीतरी धेय्य साध्य करयचे असेल.. तर स्वामी आपणास सांगत आहेत कि, “ अरे उठ..!! रडत बसू नकोस.. तुझे दु:ख दूर व्हावे.. तुझे संकट दूर व्हावे..तुझे धेय्य साध्य व्हावे.. ह्यासाठी लागणारी शक्ती मी तुझ्या अंतर्मनात कधीच दिलेली आहे.. जसे त्या पांगळ्याने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला.. आणि मागचा पुढचा विचार न करता डोळे बंद करून धैर्याने चालू लागला.. अगदी तसेच तु सुद्धा.. तुझे मागील भूतकाळातील कटू अनुभव.. वा आलेले अपयश ह्याचा विचार करू नकोस.. वा पुढील भविष्य काळात कसे होईल.. ह्याची भीती बाळगू नकोस.. उठ.. तुझी जबरदस्त इच्छाशक्ती जागृत कर.. आज आता वर्तमानात धैर्याने उभा राहा.. तुझा माझा अंश आहेस.. माझा बाळ आहे.. तुझ्या हृदयात माझेच वास्तस्व्य आहे.. हा अतूट अभेद्य विश्वास ठेव.. बघ !! जर तो पांगळा चालु शकतो तर तुझे संकट.. दु:ख.. वा धेय्य हे साध्य होणे हि काहीच मोठी गोष्ट नाही..” स्वामी भक्त हो !! चला तर मग आजच्या लीलेतून जबरदस्त प्रेरणा घेवू या.. आणि आपल्या अंतर्मनात दडलेली स्वामी शक्ती जागृत करू या.. आणी स्वामींना प्रार्थना करू या“ हे समर्था !! आज मला धैर्याचा पाठ शिकवलास.. इच्छाशक्तीचा पाठ शिकवलास.. तुला धन्यवाद.. ‘तु माझाच अंश आहेस.. माझाच बाळ आहेस..’ हा आत्मविश्वास दिलास.. तुला धन्यवाद.. ‘भिऊ नकोस.. तुला सर्व काही शक्य आहे.. मी तुझ्या पाठीशी आहे !! ’ हि प्रेरणा दिलीस.. स्वामी तुला धन्यवाद.. हे परमपित्या !! तु सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही.. !! तुझे मार्गदर्शन असेच आम्हाला लाभो हीच प्रार्थना !! धन्यवाद स्वामी.. अनंत कोटी धन्यवाद स्वामी.. अनंत कोटी धन्यवाद..!!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News