१५ जुलैपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर आता मनोरंजन होणार ‘सुफळ संपूर्ण’!!!!

Jul 13, 2019

मुंबई : झी युवा वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही एक अनोखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खूप हसवत, कोपरखळ्या घेत ही ‘युवा’ मालिका मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांचा अभिमान राखण्याबाबत एक शिकवण सुद्धा देईल. हलकी फुलकीमनोरंजक अशी ही ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिका १५ जुलैपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर ही मालिका पाहता येईल. आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन’मार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. एक उत्तमअशी कौटुंबिक कथा पाहण्याची संधी या मालिकेमुळे मिळणार आहे.

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करतांना तोंड गोड करावं असं म्हटलं जातं. परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचं तोंड निराळ्या पद्धतीने गोड करण्यात आलं. मालिकेतील अभिनेत्रींनीं, सेटवर स्वतःच्या हातांनी बनवलेले मोतीचुराचे लाडू सर्वांना वाटण्यात आले. प्रत्येकच कुटुंबाला आपलीशी वाटेल अशी कथा घेऊन येणारी ही मालिका, या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे ऑफस्क्रीन सुद्धा आपलीशी झाली. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांविषयी असणारा जिव्हाळा या मालिकेत पाहायला मिळेल. ‘प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो’ असं म्हणतात. या मालिकेतील नायक प्रेमासाठी मराठीवर प्रभुत्व मिळवताना दिसून येईल. ही नवी मालिका पाहायलाअजिबात विसरू नका, सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर!!!!

या मालिकेविषयी बोलताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, “मालिका ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. संपूर्ण टीमवर भरभरून प्रेम करा. प्रत्येकच कुटुंबाला ही कथा आपली वाटेल याची खात्री आम्हालाआहे. ‘सोहम प्रोडक्शन’ने नेहमीच रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘झी युवा’वरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेच्या माध्यमातून सुद्धा आमचा हाच प्रयत्न असेल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो.”

‘झी युवा’ ही वाहिनी नेहमीच निरनिराळ्या प्रकारच्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येते. विनोदीकथा, भयकथा, प्रेमकथा, रहस्यकथा अशा सगळ्याच प्रकारच्या मालिकांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन होते.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News