आपले स्वामी बोलतात.. “ अरे !! ह्या तीर्थात स्नान करण्याजोगें काही राहिले तरी आहे का ? अरे !! ह्यातील स्नानच पळून गेले आहे !!! ”

Jul 14, 2019

स्वामी लीला ||
स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! स्वामी महाराज रामेश्वरम येथे असतांना.. स्वामीनी असंख्य लीला केल्या.. अनेक भक्तांचा उद्धार केला.. अविवेकाची राख रांगोळी करून त्यात ज्ञानाचा…विवेकाचा दीप पेटवला. असो. रामेश्वरम जवळ “ कोटीकूप ” म्हणून एक पवित्र तीर्थ आहे.. हे तीर्थ अत्यंत पवित्र असे मानले गेलेले आहे.. ह्या तीर्थात स्नान केल्याने जन्म जन्मांतरीचे पाप जातात अशी भाविकांची श्रद्धा होती… आणि त्या श्रद्धे पोटी असंख्य भक्तांची तेथे अलोट गर्दी होत.. पण तेथे एक निंदनीय प्रकार घडत होता… तेथील पुजारी स्नान करणाऱ्या भाविकांकडून बळजबरीने पैसे घेत… पैसे दिले तरच स्नान करण्यास परवानगी देत.. लोकांच्या श्रद्धेच्या नावाखाली तेथील पुजा-यांनी धंदा मांडला होता.. देवाचा बाजार मांडला होता.. असो. हे स्वामींनी बघीतले आणि ह्या प्रकारचा कायमचा छडा लावावा असे स्वामींच्या मनात आले आणि एके दिवशी स्वामी कोटीकुप तीर्थमध्ये स्नानासाठी आले.. तीर्था जवळ गेले असता.. तो तेथील पुजाऱ्यांनी नेहमी प्रमाणे स्वामींकडे पैशांची मागणी केली… स्वामी भक्त हो !!.. खरोखर लोभ माणसाला किती आंधळ करतो ते बघा… अहो अनंत कोटी ब्रम्हांड इतकी ज्याची स्व निर्मित मालमत्ता आहे… ज्याच्या मात्र हुंकाराने ह्या ब्रम्हांडाची राख रांगोळी होईल…ह्या लोभा पायी त्याला ओळखले नाही हो ह्यांनी..!!असो. पैशाची मागणी केली असता.. स्वामीनी त्यास सर्व सामान्य माणसा प्रमाणे सांगितले कि “ आम्ही अवधुंत संन्यासी आहोत.. आमच्या कडे पैसे वगैरे काही नाही..!!” पण लोभांध पुजाऱ्यांनी काही ऐकले नाही… आणि स्वामींना हटकवले.. स्वामींनी स्नानास जावू नये म्हणून विरोध केला.. स्वामीनी सुद्धा त्यास काहीच विरोध केला नाही मात्र स्वामी मोठ्याने हसायला लागले आणि दोन तीन वेळा बोलले, “ अरे !! ह्या तीर्थात स्नान करण्याजोगें काही राहिले आहे का ? ह्यातील स्नानच पळून गेले आहे !!” स्वामींचे हे विचित्र बोलणे ऐकून मात्र त्या पुजाऱ्यांनी दुर्लक्ष केले.. असो. स्वामी हसत हसत तेथून निघून गेले.. पण स्वामी भक्त हो !! स्वामी निघून जाताच तेथे एक चमत्कार घडला.. कोटीकुप तीर्थाच्या पाण्याला दुर्गंधी सुटली… त्या पाण्याचा घाण वास येवू लागला.. अहो.. त्या पाण्यात किडे वळवळू लागले…!! आता मात्र पुजाऱ्यांची फजिती झाली.. पाण्याला किळसवाणी दुर्गंधी असल्यामुळे कोणीही स्नाना साठी येत नव्हत.. पुजाऱ्यांचे रोजचे उत्पन्न बंद झाले होते… मग मात्र आता त्यांना स्वामींचे शब्द आठवले.. आणि स्वामींना शोधण्यासाठी आटापिटा सुरु केला… रामेश्वरमच्या पिंडीवर अखंड अभिषेक धारा सुरु केल्या.. मांत्रिकांना बोलावून मंत्रोच्चार सुरु केले.. अहो… अहो जो फक्त शुद्ध भक्ती भावाचा भुकेला आहे तो असल्या प्रकारांनी थोडाच प्रसन्न होणार…!! असो. भरपूर शोधले पण स्वामी काही भेटले नाही.. आता मात्र पुजाऱ्यांनी हात टेकले आणि शेवटचा उपाय म्हणून शृंगेरी येथील शंकराचार्यांच्या मठात आले.. ह्या मठाचे मठाधीश सिद्धयोगी होते.. पुजाऱ्यांनी सर्व वृत्तांत सांगितला.. तेव्हा शंकराचार्यांनी तात्काळ योग समाधी लावली आणि त्यांस सर्व खरी परिस्थिती समजली.. तो शंकराचार्य बोलले.. ”अहो तुम्ही ज्या संन्यासाचा अवमान केला ते साधीसुधी संन्यासी नाही तर ह्या कलियुगात अवतारित झालेली प्रत्यक्ष परब्रम्ह विभूती आहेत.. दत्त अवतारी आहेत.. मात्र तुम्ही पैशाच्या लोभाने इतके आंधळे झालेत कि त्यांना तुम्ही ओळखले पण नाहीत.. त्यांची माफी मागा आणि ह्या पुढे तुम्ही तीर्थावर येणाऱ्या सर्व भक्तां सोबत सौजन्याने वागा.. अन्यथा तुमचे भविष्यात काही खरे नाही..!! स्वामींना शरण जा.. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील..!!” हे ऐकल्यावर आता पुजाऱ्यांचे डोळे खाडकन उघडले.. आणि ते जरा माणसांत आले.. आणि सर्वांसोबत सभ्यतेने बोलू लागले.. असो. त्यानंतर अचानक एके दिवशी स्वामी रामेश्वरमलिंगाच्या ठिकाणी प्रगट झाले तो सर्व पुजारी स्वामी च्या दर्शनासाठी गोळा झाली तेव्हा स्वामी बोलले कि , “ काय हो !! श्रुंगेरीची वारी कशी झाली !! ” आता मात्र पुजाऱ्यांना जे समजायचे ते समजले आणि अनन्य -भावाने स्वामींना शरण गेले.. आणि स्वामी नामाचा जयजयकार केला..
स्वामी बोध ||
स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !! स्वामीभक्त हो !! आजच्या लीलेतून स्वामी आपल्याला हेच सांगत आहे कि, तुमची माझ्यावर अतूट श्रद्धा आहे ना.. भक्ती आहे ना.. त्या प्रेमाचे..त्या विश्वासाचे रक्षण मी स्वतः करतो आहे.. कारण मी भक्तवत्सल आहे.. भक्ताभिमानी आहे.. स्वामी भक्त हो !! ज्या प्रमाणे सर्व नद्या सागराला जावून मिळतात अगदी त्याच प्रमाणे…जरी तेथील भाविकांचे कोटीकुप तीर्थ श्रद्धास्थान होते पण अप्रत्यक्ष ते स्वामीचीच भक्ती करत होते.. कारण स्वामी मूळ आहेत.. आणि म्हणून भक्ताभिमानी स्वामीरायाने पुजाऱ्यांना शिक्षा करून त्यांस समज देवून भाविकांच्या श्रद्धेला न्याय दिला.. स्वामी भक्त हो !! जाता जाता हेच सांगावेसे वाटते कि.. “ जसे मीरेने कृष्णाची भक्ती केली.. तुकोबाने पांडुरंगाला आळवले.. शबरीने श्री रामावरील अतूट विश्वास दाखवला.. स्वामी भक्त हो !! असे बेशर्त प्रेम .. असा अतूट विश्वास.. असा स्वामी ध्यास… आपल्याला स्वामींकडे मागायचा आहे.. आणि हृदयातून स्वामी जे विचार देतील ती स्वामी आज्ञा म्हणून आपले कर्म प्रामाणिक पणे करत रहायचे आहे… स्वामी भक्त हो !! बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतो ते !! स्वामी भक्त हो !! इतिहास साक्षीला आहे.. कि भक्ताच्या भक्तीचे….त्याच्या श्रद्धेचे… रक्षण करण्यासाठी स्वामींची काहीही करण्याची तयारी असते.. कारण स्वामी भक्ताभिमानी आहेत..!!! स्वामी भक्त वत्सल आहेत..!!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News