ढोंगी बुवाचे पितळ स्वामींनी एक अभंग बोलून फोडले

Feb 17, 2022

|| स्वामी लीला ||

स्वामींची ख्याती सर्व दूर पसरलेली होती.. अनेक प्रकारचे लोक स्वामींकडे येत होते.. ह्यातच एक कबीरपंथी बुवा अक्कलकोट मध्ये आला.. रोज सकाळी नाना प्रकारचे टिळे.. मुद्रा अंगास लावून.. गळ्यांत नाना प्रकारच्या माळा घालून.. डोकीस पटका आणि हातात विना घेवून.. मोठमोठ्याने पदे व अभंग बोलत बुवा गावभर भिक्षा मागत फिरत.. दिसण्याने तर साधूचा उत्तम पेहराव होता.. एके दिवशी स्वामी महाराज गणपतराव जोशी ह्यांच्या देवडीवर बसलेली असतांना.. ह्या बुवांची फेरी येथे आली.. आणि ‘संतनकी बानी , साधुराम ए संतनकी बानी..’ हे पद बोलत होते.. इतक्यात स्वामींनी त्यांच्याकडे बघितले.. आणि दोन्ही हाताने विचित्र खुणा करून.. त्या साधूकडे बघुन बोलेले.. “ए संतनकी बानी.. साधुराम ए संतनकी बानी.. ” आणि मोठ मोठ्याने पोट धरून हसू लागले.. स्वामींचे असे वागणे बघुन येथील मंडळींना आश्चर्य वाटले आणि हा बुवा ढोंगी असावा.. असे वाटून जोशी सह दोन तीन मंडळींनी बुवाच्या मुक्कामाचा शोध घेतला.. तेव्हा तेथे एक बाई असल्याने समजले आणि ती बाई एका गृहस्थाची लग्नाची बायको असून.. ह्या बुवाने तिला नाडी लावून पळवून आणल्याचे समजले.. आता आपले हे बिंग फुटले असे त्या बाबाला समजताच त्याने तेथून लागलीच पळ काढला.. स्वामी भक्त हो !! कोणी कितीही ढोंग सोंग वेश बदलून येवू दे.. स्वामींकडे प्रत्येकाचे सातबारे आहेत.. स्वामींना सर्वांचे सर्वच माहित असते..म्हणून स्वामींच्या समोर कोणतेही ढोंग करण्याची गरज नाही.. हि समज सर्वांना भेटली आणि सर्वांनी एक घोषात जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||

आजची लीला आणि त्याचा बोध तर अगदी स्पष्ट आहे… बघा !! तो साधू अतिशय चालाखीने लोकांना वेड्यात काढत होता.. कपडे.. माळा.. टिळे.. आदी परिधान केले म्हणजे लोक भुलतात.. हे त्याला पक्के ठावूक होते.. आणि त्या प्रमाणे तो नाटकी वागणे करत होता.. परंतु स्वामी महाराज आई आहे.. ह्या साधूच्या ढोंगात कोणी फसू नये.. ह्याच्या नाडी लागून कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा तो स्वामींच्या समोर आला तेव्हा स्वामींनी त्याचे पितळ उघडे पाडले.. स्वामी भक्त हो !! आजही देवाच्या.. धर्माच्या किवा जातीच्या नावाखाली अनेक लोक बाह्य दिखावा करून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत.. अनेक लोक सोंग ढोंग घेवून.. दिखावा करून.. लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत.. आणि असे लोक समाजाच्या सर्वच थरात पसरलेले आहे.. कोणी आध्यात्मिक गुरु बनतो.. कोणी धर्माचा ठेकेदार बनतो आहे.. तर कोणी राजकीय स्वार्थ पोटी धार्मिक बनण्याचा प्रयत्न करून स्वार्थ साधतो आहे.. अर्थात सर्वच लोक ढोंगी आहे.. स्वार्थी आहे असे इथे सांगण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही.. समाजात आजही भरपूर चांगले.. शुद्ध निर्मळ मनाने कार्य करणारे लोक आहेत.. म्हणून आजच्या लीलेतून बोध घेता आज आपणास आजच्या पिढीसाठी स्वामी अशा ढोंगी लोकां पासून सतर्क राहण्याचा इशाराच देत आहेत.. आणि समाजात सत्कर्म करणारी व्यक्ती आणि ढोंगी व्यक्ती ह्यांना सहज ओळखता यावे म्हणून आपल्याजवळ विवेकाची तलवार ठेवण्याचा हुकूमच देत आहेत.. आणि हा विवेक जर आपणास साध्य करायचा असेल तर आपल्याला स्वामींच्या लीलांचे मनन चिंतन करायचे आहे.. जे जे सत्पुरुष झालेत.. संत महंत झाले.. त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा लागले.. ह्याने आपण अंतर्मुख होऊन.. ईश्वर तर आपल्या आताच आहे हि समज प्राप्त होते.. आणि त्या दिशेने साधना सुरु होऊन पूर्ण विवेक जागृत होतो.. आणि आपला प्रापंचिक सह आपला आध्यात्मिक उद्धार होतो.. विकास होतो.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे समर्था !! आज आमची तुला इतकीच प्रार्थना आहे कि, आम्हाला तुझी खरी ओळख दे.. आमच्या स्वस्वरूपाची समज दे.. ह्या निसर्ग नियमांची समज दे.. क्रिया- प्रतिक्रियाच्या कर्म सिद्धांताची समज दे.. जेणे करून आम्ही ह्या मायेच्या जगतात न फसता.. विवेकाच्या तलवारीने सत्य-असत्याची पारख करत.. आपले कर्म हीच खरी तुझी सेवा.. हीच तुझी खरी भक्ती.. ह्या भावनेने प्रपंच आणि परमार्थ साध्य करू.. आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करू.. हे परमपित्या !! तु माझा पिता आहेस.. आई आहेस.. गुरु आहेस.. मला भक्ती दे.. मला विवेक दे.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..!!”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News