शिवजयंती निमित्त ‘सेर शिवराज है’ नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

Feb 25, 2022

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार ‘सेर सिवराज है’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे.

दिव्य कुमारने हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात त्याने मराठीतील ‘फत्तेशिकस्त’, ‘कट्यार काळजात घुसली’ या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला. आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून ‘मानस मराठी’ प्रस्तुत असून संजय पटेल निर्मित आहे.

“सेर सिवराज है” हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश्वर राजकुले यांनी बाजू गाण्याची उत्तम बाजू सांभाळली.

‘सेर सिवराज है’ हे गाणे सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांनी स्वरबद्ध केले आहे. माझा मल्हार, हे गजानन या गाण्यांचे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शक प्रसाद शिरसाठ यांनी केले असून देव महादेव, तू जोगवा वाढ ही गाणी अद्याप प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या गाण्याचे संगीत संयोजनही प्रसाद शिरसाठ यांनी केले असून गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचा खारीचा वाटा आहे. शिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यात वाटा आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग ‘अपोस्ट्रॉफी स्टुडिओ’ नाशिक, ‘डॉन स्टुडिओ’ पुणे आणि ‘साउंड आयडियाज स्टुडिओ’ मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत.

महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे ‘मानस मराठी’ युट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार असून शिवभक्तांना पर्वणीच ठरणार आहे.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News