अभिनेत्री श्रद्धा कपूरचा वाढदिवस, ‘ कू ‘ वर शुभेच्छांचा वर्षाव

Mar 4, 2022

मुंबई : बॉलिवुडमधले तरुणाइच्या दिल की धडकन असलेले नाव म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाच्या आरस्पानी सौंदर्यासह तिचा अभिनय, फॅशन सेन्स, डान्स आणि फिटनेसचेही चाहते असंख्य आहेत. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त हे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सदिच्छा व कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारतीय मायक्रो-ब्लॉगिंग अॅप ‘कू’वरही त्याची झलक पहायला मिळते आहे.
श्रद्धा कपूरने अल्पावधीतच बॉलिवुडमध्ये आपली मुद्रा उमटवली आहे. मोजके पण खास सिनेमे हे तिचे वैशिष्ट्य. ‘आशिकी 2’, ‘हैदर’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’ या सिनेमांमधला तिचा अभिनय रसिकांनी उचलून धरला. तिचा फिटनेस तर भल्याभल्या अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. लोकप्रिय झालेल्या सुरेल गाण्यांमधल्या तिच्या कातील अदा रसिकांना खिळवून ठेवतात. श्रद्धा समाजमाध्यमांवरही कायम सक्रीय असते. तिच्या वैयक्तिक आणि सिनेजीवनाबाबत बोलणाऱ्या पोस्ट्स, फोटो आणि व्हीडिओजना रसिक उचलून धरतात.

आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिच्याबद्दलच्या भावना, तिच्या अभिनय आणि कलागुणांचे कौतुक ‘कू’वर भरभरून करताना दिसत आहेत. या काही निवडक खास प्रतिक्रियांची झलक

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News