प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार ‘कू’ वर एन्ट्री

Mar 10, 2022

‘कू’वर चाहत्यांसोबत रंगणार रुपेरी पडद्याच्या चर्चा

राष्ट्रीय, 9 मार्च, 2022: वास्तववादी सिनेमांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक मधूर भांडारकर यांनी नुकताच बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ जॉइन केला आहे. आजवर अनेक हिट सिनेमे दिलेले लोकप्रिय दिग्दर्शक भांडारकर असंख्य सन्मानांनाही पात्र ठरलेले आहेत.
‘कू’ देत असलेल्या बहुभाषिक सुविधांचा प्रभावी उपयोग करून भांडारकर भारतीय युजर्सशी कनेक्ट होतील. आपल्या सिनेजगतातल्या कामगिरीसह आगामी रंजक प्रकल्पांबाबतची माहितीही ते चाहत्यांशी आवर्जून शेअर करतील.
‘कू’ जॉइन केल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी भांडारकर यांनी खास पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, “हॅलो इंडिया, आता मी दाखल झालोय भारताचे आपले खास अॅप असलेल्या ‘कू’ वर. तुम्ही मला @imbhandarkar वर फॉलो करू शकता. इथे माझे आगामी चित्रपट, भटकंतीचे कथा-किस्से आणि अध्यात्मिक प्रवासाबाबत जाणून घेऊ शकता.” यासह भांडारकर यांनी एक 14 सेकंदांचा व्हीडिओही पोस्ट केला आहे. यात ते एका हिरव्यागार शेताच्या कडेने चालताना दिसत आहे. व्हीडिओत ‘अभी कुछ दिनों से लग रहा है बदले बदले से हम है…’ या सुंदर गाण्याची धुन पार्श्वसंगीत म्हणून वाजताना ऐकू येते.

सोबतच आज भांडारकर यांनी आज ‘कू’वर एक घोषणाही केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘बबली बाउन्सर’चे पहिले मॅरेथॉन शूट नुकतेच पंजाब आणि दिल्लीत पूर्ण केले. हा एक कमालीचे समाधान देणारा अनुभव होता. माझे सहकारी असलेले अभिनेते आणि तंत्रज्ञांना खूप धन्यवाद!’

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News