शैक्षणिक संस्था ‘ सनस्टोन ‘ चा संदीप युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस नेटवर्कमध्ये समावेश

May 25, 2022

नाशिक :  सनस्टोन या भारतातील आघाडीच्या उच्च शिक्षण सेवा पुरवठादार आणि २५ शहरांतील ३० पेक्षा जास्त संस्थामध्ये कार्यरत असलेल्या कंपनीने नाशिक, महाराष्ट्र येथील संदीप युनिव्हर्सिटीचा आपल्या कॅम्पस नेटवर्कमध्ये समावेश करत विस्तार केला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या संदीप युनिव्हर्सिटीद्वारे वेगवेगळ्या शाखांचे अभ्यासक्रम तसेच विविध स्तरीय युजी व पीजी अभ्यासक्रम उपलब्ध केले जातात.

संदीप युनिव्हर्सिटीच्या समावेशामुळे सनस्टोनला आता त्यांचे एमबीए अभ्यासक्रमही उपलब्ध करून देता येणार आहे. सनस्टोनद्वारे उद्योगक्षेत्रासाठी पूरक शिक्षण व कौशल्ये शिकवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर नोकरीसाठी तयार केले जाते. या नव्या घडामोडीमुळे विद्यार्थ्यांना सनस्टोनचे १००० पेक्षा जास्त रिक्रुटर्स आणि २००० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधींचे दमदार नेटवर्क खुले होईल आणि आघाडीच्या कंपन्यांना प्लेसमेंटसाठी चांगला वाव मिळेल.

नाशिकमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शिक्षण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सुधारणा घडवून आणत आहे. नजीकच्या काळात सरकारने तरुण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत.

या घोषणेविषयी सनस्टोनचे सह- संस्थापक आणि सीओओ श्री. पियूष नान्ग्रु म्हणाले, ‘संदीप युनिव्हर्सिटीचा समावेश करत नाशिकमध्ये विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतीय शहरे तरुणांची उर्जा व क्षमतेनं सळसळत आहेत. सनस्टोनमध्ये आम्ही उच्च शिक्षणाच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांमधील संधी व दर्जाचा अभाव कमी करण्याचे ध्येय ठेवले असून तरुणांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची संधी देत आहोत.’

सनस्टोनतर्फे ‘सनस्टोन एज’ सुविधा दिली जाते, ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सनस्टोनद्वारे प्रवेश घेतल्यानंतर अतिरिक्त फायदे मिळतात. विद्यार्थ्यांना अडव्हान्स सर्टिफिकेशन मिळवून उद्योगक्षेत्रासाठी पूरक अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, इंडस्ट्री इंटिग्रेटेड इंटर्नशीप्स आणि प्रकल्पांमध्ये प्रवेश मिळवता येईल, सर्वाधिक मागणी असलेले तंत्रज्ञान कौशल्य शिकता येईल आणि त्यांच्यासाठी व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करता येईल.

अधिक समग्र आणि सर्वसमावेशक शिक्षणासाठी सनस्टोनतर्फे जीवनकौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्सचेही प्रशिक्षण, आवडीनुसार क्लबमध्ये प्रवेश, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम्स, सनस्टोन स्टुडंट नेटवर्कच्या डिजिटल कम्युनिटीमध्ये प्रवेश दिला जातो.

या कराराविषयी संदीप युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्सेसचे डीन डॉ. अभिषेक सिंग म्हणाले, ‘संदीप युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना किफायतशीर, उच्च शिक्षण सेवा देत असतो आणि समाजाचा दीर्घकालीन विकास घडवून आणण्यास आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने नेणारे दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यायची होती. आम्हाला खात्री आहे, की सनस्टोनच्या सुविधा आमच्या विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठी फायदेशीर ठरतील.’

संदीप युनिव्हर्सिटीमधील सनस्टोन अडव्हान्टेंजच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या here.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News