नवीन किया सोनेट कार ७.९९ लाखांमध्ये उपलब्ध

Jan 15, 2024

प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही; १९ वेगवेगळ्या व्हेरीयन्टमध्ये होणार उपलब्ध 

नाशिक : किया या भारताच्या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आपली सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही – नवीन सोनेट ७.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या आकर्षक प्राथमिक किंमतीपासून देशभरात दाखल केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये अनावरण करण्यात आलेल्या कियाच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बेस्ट-सेलिंग नवीनतम पुनरावृत्तीमध्ये २५ सुरक्षा फीचर्स आहेत. ज्यामध्ये १० स्वायत्त फीचर्स असलेले अप्रतिम एडीएएस आणि १५ मजबूत उच्च-सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत.
या गाडीत ‘फाइंड माय कार विथ एसव्हीएम’ सहित ७० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स आहेत. हे नमूद केलेले फीचर कारच्या सभोवतालचा व्ह्यू आणि हिंग्लिश आदेश देते, ज्यामुळे सोनेट चालवण्यास सर्वात आरामदायक ठरते. १९ वेगवेगळ्या व्हेरीयन्टमध्ये उपलब्धतेसह, नवीन सोनेट ड्रायव्हिंग अनुभवाची वैविध्यपूर्ण श्रेणी ऑफर करते. यात ५ डिझेल मॅन्युअल व्हेरीयन्ट ९.७९ लाख रु. पासून सुरू होतात. डिझेल आणि पेट्रोल इंजिनच्या सर्वात वरच्या क्रमांकाच्या व्हेरीयन्टमध्ये १० स्वायत्त फंक्शन्स असलेली या सेगमेन्टमधली सर्वोत्तम एडीएएस लेव्हल १ आहे. जीटी लाइन आणि एक्स-लाइन व्हेरीयन्टची किंमत पेट्रोलमध्ये अनुक्रमे १४.५० लाख रु. आणि १४.६९ लाख रु. आहे, तर डिझेलमध्ये १५.५० लाख आणि १५.६९ लाख रु. आहे. ग्राहक किया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन तसेच किया इंडियाच्या अधिकृत डीलरशिपकडे २५००० रु. प्रारंभिक बुकिंग किंमत देऊन नवीन सोनेट बुक करू शकतात.
किया इंडियाचे चीफ सेल्स आणि बिझनेस स्ट्रॅटजी अधिकारी श्री. म्युंग-सिक सोन म्हणाले, “नवीन सोनेट दाखल करून आम्ही पुन्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेन्टला प्रीमियम बनवत आहोत. जुन्या सोनेटने आपल्या असामान्य डिझाईनने आणि तांत्रिक क्षमतेने या सेगमेन्टमध्ये खळबळ माजवली होती. आणि नवीन सोनेटच्या मदतीने आम्ही तो विजयाचा प्रस्ताव आणखी उंच घेऊन जात आहोत. अत्यंत प्रगत एडीएएस तंत्रज्ञानासह कमीत कमी देखभाल खर्च आणि टॉप-टियर सुरक्षा प्रस्तावाच्या पाठबळावर आम्ही किंमतीचे लक्षणीय मूल्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवाय या सेगमेन्टमधली ही सर्वाधिक कनेक्टेड कार आहे. त्यात मजेदार हिंग्लिश कमांड आणि सराऊंड व्ह्यू मॉनिटर सारखी भविष्यवेधी फीचर्स आहेत. ही सर्व संरचना लहान आणि मोठ्या पल्ल्याच्या प्रवासात कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा श्रेष्ठ ड्रायव्हिंग अनुभव देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.”

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर च्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपला ठसा उमटवला

Nashik : दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) महाराष्ट्र स्टेट सेन्टर राज्य शाखेच्या  मॅनेजिन...

read more
Breaking News