Nashik : यंग इंडियन्स (Yi) नाशिक चॅप्टरतर्फे, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (IEI)यांच्या सहकार्याने“रेस्पॉन्सिबल एआय – बिल्डिंग इनोव्हेशन दॅट वर्क्स फॉर ऑल” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता आयईआय हॉल येथे होणार आहे.
या सत्रामध्ये स्टुडिओ+ या संस्थेच्या पार्टनर आणि ‘जनरेटिव्ह एआय फॉर कम्युनिकेशन्स’ विषयात पीएच.डी. संशोधक असलेल्या हेलन बेंटली मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल स्ट्रॅटेजी, संवाद व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयांवर काम करण्याचा त्यांचा जागतिक अनुभव आहे. जबाबदार आणि समावेशक पद्धतीने AI ची रचना व अंमलबजावणी कशी करावी, याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानात AI मुळे संवाद धोरणांमध्ये होत असलेले परिवर्तन, समावेशक डिझाइनची प्रगती तसेच डिजिटल नवकल्पना आणि नैतिक जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा, यावर सखोल चर्चा होणार आहे. तरुण व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांना शाश्वत व लोककेंद्री नवोपक्रमासाठी AI चा प्रभावी वापर कसा करता येईल, याविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे.
उदयोन्मुख तंत्रज्ञानाविषयी अर्थपूर्ण संवाद घडवून आणणे आणि युवकांना भविष्याभिमुख ज्ञानाने सक्षम करणे, या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या उपक्रमाचा हा एक भाग आहे.
सदर कार्यक्रमासाठी सदस्य आणि निमंत्रितांना उपस्थित राहता येणार आहे.
कॅनरा रोबेकोचा ‘कॅनरा रोबेको बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ लाँच
नाशिक : भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन संस्था असलेल्या कॅनरा रोबेको...


