हंगामा प्ले ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन करकरीत शो “धप्पाची” घोषणा

May 26, 2022

नाशिक – : हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने आज आपला नवा हिंदी ओरिजनल शो धप्पाची घोषणा केली. या शोमध्ये पाहायला मिळणार भारतातल्या लहान शहरांत राहाणाऱ्या पाच अशा जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या कथा, जे नातेवाईकांपासून आपला रोमान्स लपवण्यासाठी वाट्टेल ते करतात. या अँथॉलॉजीमध्ये टीव्ही आणि सिनेमा क्षेत्रातले दिग्गज कलाकार दिसणार असून त्यात मोनालिसा, जय भानुशाली, अबिगेल पांडे, क्रिस्नन बॅरेटो, विशाल सिंग, सनम जोहर, स्मृती खन्ना, अभिषेक कपूर, सम्रिध बावा, दिशांक अरोरा, साक्षी शर्मा, वरूण जैन आणि मोहित दुसेजा यांचा समावेश आहे. धप्पामध्ये पाच अनोख्या प्रेमकथा एक अनोखा ट्विस्ट आणि विनोद- नाट्यासह रंगवण्यात येणार आहेत. शोचे दिग्दर्शन केले आहे अनिल व्ही कुमार आणि साकेत यादव यांनी, तर अनिल व्ही कुमार प्रॉडक्शन्स यांची निर्मिती आहे .

प्रेम हे पवित्र आणि अनंत असतं, मात्र सगळ्याच रोमान्सच्या स्टोरीज या सहजसोप्या नसतात. विशेषतः संशयी नजरा असलेल्या आणि खूपदा गॉसिप बनणाऱ्या प्रेम कहाण्याही असतात. धप्पा हा अशा रोमान्सच्या पाच गोष्टीचा संग्रह आहे. मग, त्या गावात जिथे सगळे सगळ्यांना ओळखतात, तिथे गर्भनिरोधक खरेदी करणारं जोडपं असो किंवा आपल्या तरुण विद्यार्थीशी मैत्री करणारे प्रोफेसर असो किंवा अपेक्षेपेक्षा जरा लवकर गर्भधारणा करणारी नववधू असो किंवा कुटुंबीयांकडून लग्नाचा आग्रह केला जाणारे मित्र- मैत्रिणी असो, नाहीतर लग्नाच्या रात्रीच्या आदल्या रात्रीचा आनंद घ्यायचं ठरवणाऱ्या परंतु अचानक उद्भवलेल्या एका अंत्यसंस्कारामुळे वैतागलेलं जोडपं असो… ही सगळीच जोडपी नाक खुपसणारे शेजारी आणि नातेवाईकांपासून आपलं नातं जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करत असतात. ते यशस्वी होतात की नाही हे फक्त काळच सांगू शकेल. आपल्या प्रेमाच्या रस्त्यात येणारा प्रत्येक अडथळा ते कसे पार करतात हे जाणून घेण्यासाठी हा शो पाहायलाच हवा.

या शोविषयी हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, ‘प्रेक्षकांना आवडतील अशा चांगल्या कथा आणि अभिनयाच्या मदतीने प्रयोगशीलता जपण्यावर आमचा कल असतो. धप्पा हा अशाच गोष्टींचा संग्रह आहे. विनोद आणि रोमान्स एकत्र आणल्यानंतर कायमच मनाला गुदगुल्या होतात, जुन्या आठवणी ताज्या होतात आणि चेहऱ्यावर हास्य फुलतं. या अँथॉलॉजीमुळे जोडप्यांना समाजात तोंड द्याव्या लागत असलेल्या गोष्टींवर हलक्याफुलक्या पद्धतीने चर्चा घडून येईल. प्रेक्षकांना या गोष्टी आवडतील अशी आशा आहे.’

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News