स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितले ” त्या प्रेताला येथे घेवून या.. आणि त्याला भरपूर हळद लावा..’ पुढे काय चमत्कार घडला पहा आजच्या स्वामी वाणींमध्ये

Jun 1, 2022

आपले स्वामी प्रेताला थोपटत म्हटले ‘ काय रे , तुला गाढ झोप लागली कि काय ? चल उठ ब्राम्हणांना विडा दे !!

|| स्वामी लीला ||
मुरगोड गावात मल्हार दीक्षित म्हणून एक सदाचारी शिवभक्त रहात होते.. मल्हार दीक्षितांना मुलगा होत नव्हता.. त्यांनी शिवाची आराधना केली.. आणि शिव शंकराने ‘मीच तुझ्या उदरी जन्म घेतो ’ असा दृष्टांत देवून आशीर्वाद दिला.. आणि पुढे त्यांस मुलगा झाला.. मल्हार दीक्षितांनी त्यांचे नाव चिदंबर ठेवले.. बाल वयातच चिदंबर दीक्षितांनी अनेक लीला केल्या.. आणि त्यांच्या लीला बघुन हे ईश्वरीय अवतार आहेत अशी सर्वांना खात्री पटली.. असो. चिदंबर दीक्षित मोठे झाले.. ते अनेक मोठे मोठे महायज्ञ करत.. यज्ञासाठी –भोजनासाठी अति भव्य असे मंडप बांधण्यात येई.. तोरण – झालर – रांगोळी आदी गोष्टींनी कार्यक्रमाची शोभा वाढत असे.. भोजनाची व्यवस्था सुद्धा भव्य दिव्य असे.. कढी,आमटी,खीर ,पाणी अशा पातळ पदार्थांसाठी स्वतंत्र हौद असत.. ते नित्य धुवून स्वच्छ पुसून पदार्थांनी भरलेले असत.. एके दिवशी एक तरुण ब्राम्हण हौदातून गरम आमटी काढत असतांना पाय घसरून हौदातच पडला..अचानक झालेला प्रकार बघुन सर्व गोंधळले.. आणि त्याला बाहेर काढले.. परंतु उकळत्या गरम आमटीच्या हौदाच्या पडल्याने तो जागीच्ग गतप्राण झाला.. तेव्हा चिदम्बर दीक्षितांचे जेष्ठ पुत्र दिवाकर ह्यांनी हि घटना आपल्या वडिलांच्या कानावर घातली.. तेव्हा चिदम्बर दीक्षित चिंताग्रस्त झाले.. आणि स्वामींकडे आले..आणि घडलेला सर्व प्रकार सांगून ‘स्वामी आपणच ह्या यज्ञाची लाज राखा ’ अशी विनंती केली..तेव्हा स्वामी बोलले ‘ घाबरू नका.. त्या प्रेताला येथे घेवून या.. आणि त्याला भरपूर हळद लावा..’ त्या प्रमाणे इतर मंडळीने त्यांस स्वामींकडे आणले आणि त्याच्या सर्वांगास भरपूर हळद लावली.. त्या नंतर स्वामींनी त्या शवावर पांघरून घातले.. आणि त्याला थोपटत म्हटले ‘ काय रे , तुला गाढ झोप लागली कि काय ? चल उठ ब्राम्हणांना विडा दे !! ’ स्वामी भक्त हो !! स्वामींनी असे बोलताच चमत्कार झाला.. तो मृत झालेला ब्राम्हण खडबडून उठून जागा झाला.. सर्वांना आश्चर्य वाटले.. त्या नंतर स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांस स्नान घातले.. आणि स्वामींनी त्याचे ‘यज्ञदत्त’ म्हणून नामकरण केले.. त्यानंतर तो यज्ञदत्त सर्वांना वंदन करून पंक्तीत बसलेल्या ब्राम्हणांना विडा आणि दक्षिणा देवु लागला.. स्वामी भक्त हो !! स्वामीं लीला अतर्क्य आहेत.. खरोखर आपण जितकी मनन चिंतन करू.. बुद्धी कुंठीत होते… चला तर मग आपण सर्व मिळून स्वामी नामाचा जयजयकार करू या..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

|| बोध ||     आजची लीला म्हणजे बोधांचा खजाना आहे.. आजच्या लीलेत अनेक बोध दडलेले आहे.. बघा !! उकळत्या गरम आमटीच्या हौदात पडून मृत झालेल्या व्यक्तीला स्वामींनी जिवंत केले.. ह्यातून ‘आज्ञेंविना काळ ना नेई त्यांना !! परलोकी हि ना भीती तयाला !! ’ ह्या स्वामी तारक मंत्राची प्रचीती येते आहे.. आणि स्वामींच्या असीम सामर्थ्याचे दर्शन होते आहे.. ह्या सह आजच्या लीलेच मनन चिंतन केले तर आज हि आपल्या बाबतीत त्या ब्राम्हणासारखे घडत असते.. आपण पृथ्वीवर ह्या जीवन यज्ञात सहभाग घेतला आहे.. स्वामींनी आपल्या शरीररुपी हौदात अनेक उपजत कला गुण कौशल्याचा खजाना दिलेला आहे.. जसे आपण उत्तम गायक असाल.. आपणास छान वक्तृत्व असेल.. शिक्षक असला.. वा सामाजिक क्षेत्रात उच्च मान्यवर असाल.. किवां इतर काहीही असाल कि, ज्याने इतरांचे भले होते आहे.. इतरांना आनंद देत असाल.. असे आपणात कला गुण कौशल्य असतील.. आणि आपण ह्या शरीररुपी हौदाला निमित्त करून कला गुण कौशल्यांचा प्रसाद इतरांना वाटत सुद्धा असाल.. हा प्रसाद वाटत असतांना.. अनेकांना आनंद भेटतो.. आणि हि सर्व मंडळी आपली स्तुती सुरु करतात.. आणि आपण ह्या स्तुतीला भुलतो.. आणि त्या नंतर ‘मीच’ सर्व करतो आहे.. हा खोटा कर्ता भाव आपल्यात जागृत होऊन.. शरीर रुपी हौदाच स्त्रोत आहे.. हि अहंकारी समज ठेवून आपण हौदातच पाय घसरून पडतो.. आपले मन अहंकारी बनते.. ह्या अहंकाराने मानवाचा विवेक मृत होतो.. त्या नंतर शरीर-मन-बुद्धी वर अज्ञानाचे अहंकाराचे राज्य सुरु होते.. मग ह्या डोळ्यांना प्रेमाची नाती दिसत नाही.. कानाला प्रेमाचे शब्द ऐकू येत नाही.. त्वचेला प्रेमाचा स्पर्श समजत नाही.. थोडक्यात हा अहंकार मानवाला जिवंतपणी मृतवत बनवतो.. त्याच्यातील सद्विवेकाचा ह्रास होतो..असो. परंतु स्वामी भक्त हो !! आपण पृथ्वीवर स्वामींची सेवा करण्यासाठी आलो आहे.. ना की ह्या अहंकारची सेवा ? आपण आपल्यातील मनाचे वा विकारचे गुलाम नाही तर फक्त आपल्या स्वामींचे गुलाम आहोत.. परमानंदाचे गुलाम आहोत.. आपले शरीर स्वामी गुणांच्या अभिव्यक्तीसाठी निमित्त आहे.. आणि हा मृत झालेला विवेक जिवंत करण्यासाठी स्वामी महाराज स्वतः विविध घटना प्रसंगाच्या रूपाने आपल्या जीवनात येतात… जसे आजच्या लीलेत त्या ब्राम्हणाच्या अंगास हळद लावण्यास सांगितले अगदी तसे स्वामी आपणास अनन्य भक्तीची पिवळी हळद लावतात.. विश्वासाची-प्रेमाची पिवळी हळद लावतात.. आपणास स्वानंदाचा अनुभव देवून.. आपला विवेक जागृत करून.. अहंकाराच्या.. विकाराच्या जाळ्यातुन आपली सुटका करतात.. आपणास नवीन जन्म देतात.. आणि त्या नंतर पुन्हा पुढील जीवनयज्ञात स्वामी महाराज आपणास स्वामी गुण कला कौशल्याच्या निमित्ताने भक्ती आनंदाचा.. परमानंदाचा विडा वाटण्यास सांगतात.. म्हणून आज आपणास आजच्या पिढीसाठी साठी आजच्या लीलेतून बोध घेता… आपल्या शरीररुपी हौदात भेटलेले कला गुण कौशल्य हे स्वामी प्रसाद म्हणून वाटण्यासाठी दिलेले आहे.. मी – माझे- मला ह्या सारख्या गोष्टीत अडकायचे नाही.. ह्याला निमित्त करून आनंदाची अभिव्यक्ती करायची आहे.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परम ईश्वरा !! ह्या जीवनरुपी यज्ञात ह्या अंहकारी मनाचा स्वाहाकार करवून घे.. आणि तुझ्या नामाची कृपा कर.. हे दत्तात्रेया !! तुझ्या नामाचा महिमा असीम आहे.. तुझ्या नामात खूप शक्ती आहे.. जेव्हा तुझे नाम मुखात येते तेव्हा हृदयातून अनन्य भक्तीचा भाव दाटून येतो.. डोळ्यातून आनंदाश्रू येतात.. आता हे का घडते..? कसे घडते ? हे आम्हाला समजत नाही.. फक्त घडून जाते इतकेच समजते.. हे आई !! तुझे नाम असेच आमच्या मुखात ठेव.. आमच्याकडून प्रामाणिक कर्म कष्ट करवून घे.. आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती कर !! हे गुरुराया !! तु माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर !!! “
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

अजून बातम्या वाचा..

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

22 जानेवारी रोजी पहा ‘श्रीमद् रामायण’मध्ये भगवान श्रीरामाचा आत्तापर्यंतचा प्रवास

नाशिक : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News