लहान मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी लोकांना छोट्या छोट्या कृती करण्याचे आवाहन
Nashik : सध्याच्या काळातील सर्वात स्पष्ट संकट असलेल्या हवामान बदलाच्या कारणांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने टाटा टीने आज # जागो रे ची नवीनतम आवृत्ती सादर केली. गेल्या काही दशकांमध्ये हवामान बदलाचे परिणाम अभूतपूर्व दिसून येत आहेत. २०२१ मधील सेव्ह द चिल्ड्रनच्या अहवालानुसार जर पृथ्वी सध्याच्या दराने गरम होत राहिली तर गेल्या दशकात आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलांना आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि वणव्याचा सामना करावा लागेल. युनिसेफच्या याच प्रकारच्या समान अहवालात असे म्हटले आहे की अंदाजे १ अब्ज मुले अशा देशांमध्ये राहतात ज्यांची नोंद हवामान बदलामुळे ‘अत्यंत उच्च-जोखीम’ म्हणून करण्यात आली आहे. जर आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याचे रक्षण करायचे असेल तर हवामान बदलाशी लढा देणे ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट बनते. गेल्या काही वर्षांमध्ये, टाटा टीचे # जागो रे उपक्रम हे ब्रँड आणि प्लॅटफॉर्मसह समाजातील वास्तविक बदलांना प्रेरणा देणारे आणि सामाजिक प्रबोधन सुलभ करण्यासाठी एक स्पष्ट आवाहन बनले आहेत. सध्याच्या आवृत्तीसह, टाटा टीचे # जागो रे चे उद्दिष्ट आहे की हवामान बदलाचा सामान्य नागरिकावर कसा परिणाम होतो आणि त्याचा आपल्या भावी पिढ्यांवर कसा परिणाम होईल हे स्पष्ट करणे. ते वैयक्तिक आणि प्रत्येकाला आपल्याशी संबंधीत आहे असे वाटेल अशा प्रकारे बनवून लोकांच्या वर्तनात लहान छोटे बदल करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधात एकत्रितपणे उभे ठाकून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या वसुंधरेला अधिक चांगले बनविण्यासाठी प्रेरित करण्याची आशा करते.
या उपक्रमावर भाष्य करताना पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया)चे अध्यक्ष पुनीत दास म्हणाले, “टाटा टी जागो रे नेहमीच केवळ संभाषण सुरू करून नव्हे तर योग्य कृती सुनिश्चित करून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सामान्य माणसाने एकत्रितपणे मोठ्या सामाजिक बदलाला चालना देणारी कृती करणे हे जागो रे चे खरे सामर्थ्य आहे. हवामानातील बदल आणि त्याचे नकारात्मक परिणाम यावर दीर्घकाळ चर्चा केली जात असली तरी, या संदर्भात मुले सर्वात असुरक्षित कशी आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. टाटा टी ची वर्तमान आवृत्ती टाटा टी जागो रे आमच्या मुलांचे संरक्षण करण्याच्या आणि त्यांना चांगले भविष्य देण्यासाठी आम्ही सर्व काही करतो याची खात्री करण्याच्या सर्वात मूलभूत पालकत्वाच्या अंतर्दृष्टीवर आधारित आहे. म्हणूनच ते पालकांना आणि व्यक्तींना शाश्वत ऊर्जा पद्धती, पुनर्वापर सामग्री निवडण्यासारख्या लहान कृती करण्यास प्रोत्साहित करते. त्याचा परिणाम म्हणून पुढील पिढ्यांसाठी ही वसुंधरा अधिक सुरक्षित आणि चांगली जागा बनू शकते.”
मदतीचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांबद्दल आणि तुमच्या समर्थनाची शपथ घेण्यासाठी अधिक जाणून घेण्याकरता www.jaagore.com वर लॉग इन करा.


